झालं लग्न एकदाचं Married Once

झालं लग्न एकदाचं Married Once

हुश्श!! झालं लग्न एकदाचं

लेखक नानाभाऊ माळी

कसं वाटतंय लग्नाच नाव काढल्यावर?

आनंद!हुरहूर!दडपण!धावाधाव!आर्थिक बजेट!नातेवाईक!स्नेहीजन!आप्त!स्वकीय!मित्र-मैत्रिणी!व्यावसायिक संबंध!तडजोड!हेवेदावे!कुरबुर!चुकून भांडण!….कसं वाटतंय लग्न!लग्न म्हणजे एक दिव्य पार पाडणे असतें!सर्वांच्याच शब्दाला मानपान देत लग्नाची तारीख जवळ येत राहते तशी हृदयातली धडधड गतिमान होत असते!मुलगा-मुलगी नवरदेव नवरी बनून आपल्या विश्वात दंग होतात!तर आई-वडील सर्वांना सांभाळीत तंग होतात!मुलांची लग्न पार पाडणे म्हणजे परीक्षा असते!मोठी परीक्षा असते!…त्यातून जे यशस्वी पास होतात ते समाजात मॅनेजमेंट गुरू म्हणून नावलौकिक मिळवतात!लग्न पार पाडणे म्हणजे आय ए स परीक्षा पास होणे असतं!आय पी एस परीक्षा पास होणे असतं!उत्तम मॅनेजमेंट सांभाळतो तो कलेक्टर असतो!ते आई वडील असतात!…..कसे ते बघा!..

मराठी मंगलाष्टक 

लहानपणी घर,शेती, मजुरी, शाळा,खेळ, क्लास,ट्युशन,असा सासुरवास सहन करीत मुलं शिकत असतातं!कधी घर,गल्लीत,दंगा मस्ती करीत मनसोक्त तणावमुक्त दिवस पळत असतात!पुढील शिक्षणासाठी मग पाऊले बाहेर पडतात!..शब्द घासतात!नडतात!अडतात!अनेक अडथळे पार पाडीत एकदाच शिक्षण संपत!मुलं हुश्श करतात!आई-वडील आर्थिक बेडीतून सुतात!

मुलं मोठी कधी झाली कळतच नाही हो!खुशाल पंख लावून व्यवसाय,नोकरीसाठी घराचा बंदिस्त पिंजरा उघडून!दरवाजा उघडून!उंबरठा ओलांडून बाहेर पडतात!आई-वडिलांच्या आनंदी चेहऱ्यावर डोळ्यातील हळवे थेंब उगीचंच नखरे करीत गालावर ओघळत असतातं!समाधानाची हलकीशी झुळूक मनाला प्रफुल्लित करीत असते!मुलं घराबाहेर पडलेली असतातं!दुडूदुडू!रडारड!दडदड!खडखडणारा आवाज घेऊन मुलं दूर निघून गेलेली असतात!डोळ्याला दिसणारी आणि कानाला ऐकू येणाऱ्यां पावालांचा आवाज कानावर पडेनासा होतो

आई वडीलांचं हृदय मुलांच्या त्याचं आवाजासाठी कासावीस होत रहातात!मुलं करीयरसाठी बाहेर शहरात दूर निघून गेलेली असतात!भास होत रहातात!मुलं आज येतील,उद्या येतील अशी हुरहूर मनाला लागून राहिलेली असते!आई-वडील मनावरील भावनांना आवर घालीत मुलांच्या दूर गेलेल्या पावलांकडे टक टक लावून पहात असतातं!मुलांसाठी रिकामे घरट खायला उठत असतं!एकटेपणा नकोसा वाटू लागतो!मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी स्वतःच्या काळजावर दगड ठेऊन घरातील मुलांचं दप्तर ठेवायची जागा,बसायची जागा,झोपायचं ठिकाण हेच पहात राहतं असतातं!

प्रत्यक्षात वर्षातून पाच-सहा वेळा घरी येणारी मुलं नंतर नोकरीच्या, व्यवसायाच्या व्यापामुळे येईनासे होतात!आई-वडिलांच्या कोमल हृदयावर याचा परिणाम होत असतो!पण मुलांच्या करीयरचा प्रश्न असतो!छातीवर दगड ठेवीत मुलांच्या भवितव्यासाठी स्वतःच्या आशा,अपेक्षांना मुरड घालीत जगणं सुरू असतं!

मुलं स्थिरस्थावर झाल्यावर

मुलगा किंवा मुलगी वयात आल्यावर!विवाह योग्य वय झाल्यावर.. आई वडिलांना समजत,आपलं अपत्य शिकून नोकरीला लागलेल आहे!शेती करतो!कायमची नोकरी आहे!पगार-पाणी व्यवस्थित आहे!स्वभाव पाहून झाला आहे!आई-वडील आणि मुलामुलींच्या घरची परिस्थिती!आणि योग्य स्थळासाठी चाचपणी सुरू होते!नात्यातील म्हणा!जवळचे ओळखीचे म्हणा!निरोप देणे घेणे सुरू होतं!योग्य वेळ पाहून एकेदिवशी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो!पसंती नापसंती कळवली जाते!

आई-वडीलांची मुलांच्या विवाहासाठी धावपळ सुरू होते!आपल्या पसंतीचं,मुलांच्या पसंतीचं!…अलीकडे नातेवाईक, ओळखीचे,शिक्षण,घरदार,शेती या गोष्टी सेफ डिपॉजीट म्हणून पाहायला लागले आहेत!अलीकडे याचं बाबी लग्न न जुळण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत!सर्वंच मिळेल असं नसतं!तडजोडीतून मानाजोगतं स्थळ पसंत केलंत तर विवाहितांचे भावी जीवन सुख समाधानी अन उज्वल होत जाणारे असंतं!

मराठा सोयरीक मराठा सेवा संघ

तडजोडी स्वीकारून पुढे जाणारी व्यक्ती यशस्वी होत असतो!सर्वंच माझ्या मनाप्रमाणे मिळेल, होईल हे शक्य नसतं!जीवनाच्या खऱ्या तडजोडीची सुरुवात,प्रारंभ.. लग्न असतं!या जगात१००%समाधानी कोण आहे बरं?..समाधान मानण्यावर असतं!लग्न देखील व्यावहारिक गुंतागुंतीची तडजोड असते!ती आनंदाने स्वीकारली तर त्यांच्या सारखा सुखी संसार कोणाचा नाही!….तर आचार, विचार,मन सांभाळीत जगणं सुंदर करण्याची स्वप्न पाहणारी मुलं-मुलींनो तडजोड आनंदाने स्वीकारा!…”मी जास्त शिकलो मग माझ्या सारखेच सर्व मला मिळाले पाहिजे असं काहीही नसतं!एखादी निवडक भाग्यवान जोडी असेल ज्यांना१००% मनासारखं सर्व काही मिळतं!..अशी टक्केवारी फक्त ४ते५टक्के आहेत!

मन जुळलं!परिस्थिती जुळली!आई-वडील,नातेवाईकांना पसंत पडलं!..पाहण्याचा कार्यक्रम!..साखरपुड्याचा कार्यक्रम!सर्वांना घेऊन जा!घेऊन या!मन सांभाळा!हाजी हाजी करत रहा!…असं करता करता आई-वडिलांची दमछाक होत असते!हे का बरं कोणाला दिसत नसत?उद्या तोच लग्नाचा खेळ आमच्याकडे देखील खेळला जाईल हे आपण विसरत असतो!आपण मजा बघत असतो!..काही मंडळी हृदयातून हातभार लावीत असतात त्यांचं कौतुक करावेसे वाटते!साखरपुड्यात देणं घेणं होतं!..काही मध्यस्थ मंडळी मदत करता करता शब्द टाकतात!आर्थिक बजेटबारगळतं तरीही हिम्मत खचू न देणारी मंडळी देखील असतात!

साखरपुडा पार पडल्यावर लग्नाची तारीख पक्की होते!पत्रिका छापून सर्वांना पोहोचते केल्या जातात!फोन करून पुन्हा आठवण दिली जाते!बजेट नसतांनाही महागड्या मंगल कार्यलयात मंगल ध्वनींचा आवाज कानी पडू लागतो!नवरा नवरीचं लग्न कधी लागतंय हे ताटकळत वाट पहात वऱ्हाडी मंडळी टाळीची वाट पहात एक डोळा जेवणावर आणि दुसरा डोळा टाळीवर ठेऊन लग्न लागण्याची वाट पहात असतात!अखेर मंगल ध्वनींचा सूर कानी पडतो!मंडपाच्या बाहेर

बँडवाज्याचा आवाज होतो!कधी फटाक्यांची आतषबाजी होते!ताण तणावात असलेले मुला-मुलीचें आईवडील एकदाचा मनसोक्त आनंदाने मनोमनी म्हणत असतातं!….”हुश्श!! लागलं बुवा लग्न एकदाचं!”

नानाभाऊ माळी

हडपसर,पुणे-४११०२८

मो नं-७५८८२२९५४६

९९२३०७६५००

दिनांक-२०एप्रिल२०२२

JOINMYWEDDING
झालं लग्न एकदाचं Married Once

1 thought on “झालं लग्न एकदाचं Married Once”

Leave a Comment