मुलगा शेतकरी चालेल पण व्यसनाधीन नको

मुलगा शेतकरी चालेल पण व्यसनाधीन नको

लुनेश विरकर म्हसवड Marathi Matrimonial

आज लाखो रुपये खर्च करुन मुले शिक्षण घेत आहेत, पण शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळणे दिवसेदिवस अवघड बनत चालले आहे. वाढत्या स्पर्धा मुळे अन्य व्यवसाय व करीयरमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा घालावा लागत आहे.

पैसा घालूनही त्यातही यशाची खात्री कमीच असते. त्यामुळे शिक्षण घेऊनही नोकरी मिळेना आणि नोकरी नाही म्हणून लग्नासाठी मुलगी मिळेना या विवंचनेत सापडलेला तरुण आज व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे मुलगा शेतकरी असला तरी चालेल पण निर्व्यसनी असावा असा हट्ट मुलींचे पालक हे वरपक्षाकडे करताना दिसत आहेत.

व्यसनाच्या आहारी गेलेला नवरा मुलगा भविष्यात काय दिवे लावणार याचा विचार करून मुलीही शेतकरी मुलाला पसंती कळवत आहेत

जुन्या काळी मुलांना बोलवून नोकरी देत होते असे असले तरी त्याकाळी मुलगा नोकरीवर गेला मग मागे शेती कोण करणार असाही प्रश्न घरातील मंडळी उपस्थित करीत होती. मात्र काळ बदलत गेला, शिक्षण घेवून आज मुले, मुली नोकरीसाठी घराबाहेर पडत आहेत शासनाने सध्या नोकर भरती थांबविली आहे.

याउलट तर खाजगी कंपनीत यापेक्षाही बिकट परिस्थिती आहे. एका जागेसाठी हजारो पदवीधारक अर्ज करत आहेत. तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असो, त्याला नोकरीसाठी भटकावे लागत आहे. आज कोणत्याही मुलांच्या आई, वडिलांना आपल्या मुलाला नोकरी असावी असे वाटणे स्वभाविक आहे, पण शिक्षण घेवून नोकरी नाही. शेती नाही अन्य व्यवसाय करण्यासाठी तेवढे पैसेही नाहीत अशा बिकट परिस्थितीत पालकवर्ग आहे.

लग्न करताना मुलीला मुलगा मात्र नोकरदारच हवा. ही वस्तुस्थिती एका बाजूला असताना आज सुशिक्षित मुलगी मात्र होणारा पती हा शेतकरी चालेल पण व्यसनी नको अशी मानसिकतेत आहे.

मुलीच्या लग्नाची पालकांना चिंता

आज मुलापेक्षा मुलीच सर्व क्षेत्रात पुढे आहेत मात्र मुलांना शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे बेकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नोकरी नसल्यामुळे लग्नासाठी मुलगी मिळणे अवघड बनले आहे तर दुसरीकडे नोकरीवला नवरा पाहिजे, अशी मुलीची अपेक्षा आहे. नोकरी किंवा उच्च शिक्षित असणारा मुलगा शोधण्यातच मुलींचे वय वाढत चालल्याची चिता पालकांना लागली आहे. शेवटी मुलीचे वय वाढुन गेल्यामुळे मुलगा शेतकरी चालेल पण व्यसनी नको अशी म्हणण्याची वेळ वधु पालकांवर आली आहे.

Maratha Marriage

शेतकरी नवरा का नको गं बाई? नवरी मिळेना नवऱ्याला

Leave a Comment