विवाह संस्कार

विवाह संस्कार

आपण बयाचवेळा संस्कारांच्या गोष्टी करतो, पण हे संस्कार म्हणजे नक्की काय ?

संस्कारांची गरज काय ?

या संस्कारांची गरज काय ? यावर आज आपण विचार करू. मूलत: संस्कार म्हणजे काहीतरी चांगलं करणे, अशी जनसामान्यात भावना आहे. ज्याने माणूस स्वतःची, कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाची प्रगती साधू शकतो.

शास्त्राने संस्कारांची परिभाषा अगदी समर्पकपणे अशी केली आहे, ‘माणसाचे अंगी असलेले दुर्गुणादी दोष काढून टाकून त्या जागी सद्‌गुण निर्माण करणे व एखादे हिनांग असेल तर ते भरून काढणे म्हणजे संस्कार’

उदाहरणार्थ लाखो वर्षे कोळसा जमिनीत राहून त्याचा हिरा बनतो. पण तो हिरा मौल्यवान बनवण्यासाठी त्यावरची माती, अशुद्धता काढावी लागते, त्याला पैलू पाडावे लागतात तरव त्या हिन्याला आपण दागिन्यांच्या स्वरूपात परिधान करू शकतो म्हणजे अगदी मौल्यवान दिसणाया वस्तूचेही हिनांग काढून त्याला संस्कारित केल्याशिवाय त्याला प्रतिष्ठा मिळत नाही. तसेच सोने, चांदी यांचे संस्कारित केलेले भरम, त्यांच्या शुद्ध रूपापेक्षा जास्ती गुणकारक असते.

जेव्हा या निर्जीव वस्तू संस्काराने इतक्या मौल्यवान आणि उपयोगी ठरू शकतात तर आपण माणसे तर या संस्कारानी कुठच्याकुठे तरून जाऊ ! तसे तर आपल्या शास्त्रात एकूण ४८ संस्कार सांगितलेले आहेत पण त्या सगळ्याचे अनुसरण करणे अवघड, म्हणून त्यातून १६ संस्वार महत्वाचे सांगितलेले आहेत. त्यातील एक अति महत्याचा ‘विवाह संस्कार, शास्त्र असे सांगते विवाह संस्काराने ऐहिकच नव्हे तर पारमार्थिक प्रगतीही साधता येते.

विवाह संस्कार

शस्त्रा नुसार एकूण ८ पद्धतीचे विवाह आपल्या हिंदू संस्कृतीत व्हायचे, त्याबद्दल अगदी थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रत्यन करु

1. ब्रह्म विवाह: या पद्धतीच्याविवाहाला विशेष महत्व दिलं गेलंय यात सर्वदृष्ट्या अनुरूप असणाऱ्या दोन कुटुंबातील वधू – बरांचे लग्न होते. यात वर पक्ष लग्नासाठी यचुपित्याकडे मागणी घालत असे. वरास सालंकृत वधूचे कन्यादान करणे हे या विवाहाचे खास वैशिष्ट्य. आपल्याकडे सर्वात जास्त विवाह ब्रड पद्धतीनेच होतात.

. दैव विवाह: या प्रकारच्या लभात वधू पक्ष जर वधूला एका ठराविक वयापर्यंत योग्य वर मिळाला नाही तर देवालयातील पुजारी बरोबर तिचे लग्न लावून देत असत.

३. आर्ष विवाह: यामध्ये वरपक्षाने वधूपक्षाला गोदान व म्हैशीची जोडी भेट म्हणून द्यायची पद्धत होती.

४. प्रजापत्य विवाह: ब्रह्म विवाह आणि प्रजापत्य विवाह यात बरीचशी साम्यता दिसून येते, फक्त या विवाहात वधूपक्षाने पहिली लम्मासाठी मागणी घालावी लागे. या पद्धतीत कन्यादान नव्हते. ‘पानिग्रहण’ नावाचा विधी होत असे, ज्यात वराला वधुपिल्यासमोर पाणी सोडून संकल्प करावा

लागे की तो आयुष्यभर आपल्या वधूला सांभाळेल, तिचे रक्षण करेल, तिला सुखी ठेवेल आणि पाणिग्रहणानंतरच विवाह विधीला प्रारंभ होत असे.

५. गांधर्व विवाह : यधू – वरानी स्वतःच्या पसंतीने परस्परांना निश्वित करून विवाह करने

६. आसुर विवाह: या प्रकारच्या विवाहामध्ये वधू पक्षाकडून लग्नाला संमती मिळवण्यासाठी वरपक्षाकडून बऱ्याचशा भेटवस्तू दिल्या जातात आणि मग हा दिवाह होतो.

७. राक्षस विवाह: या प्रकारच्या विवाहात वधूपक्ष लम्माच्या विरुद्ध असताना वरपक्षाकडून मुलीला पळवून घेऊन जाऊन त्यांचा विवाह केला जाई.

८. पिशाच्च विवाह: या प्रकारच्या लम्माला धमनि मान्यता दिलेली नाही. यामध्ये वधूची विवाहाला संमती नसताना तिच्यावर जादूटोणा प्रयोग करून जबरदस्तीने विवाह केला जाई. या सर्व विवाहामध्ये ब्रह्म विवाह सर्वश्रेष्ठ होय आणि हीच विवाह पद्धती आपल्या समाजात जास्त प्रचलित आहे.

Leave a Comment