आली लग्न घटी समीप नवरा
नीलेश पंडित
ज्यांनी यथासांग पार पडणारी लग्न पाहिलीत, त्यांना मंगलाष्टका नक्कीच आठवत असेल; पण आताशी मुहूर्त अचूकपणे साधणे आऊटडेटेड होत चालल्यामुळे घटका भरणे’ ही गोष्ट फक्त वाक्प्रचारातच एकायला मिळते. जेव्हा मनगटावर बांधायची किया भिंतीवर टांगायची पड़चाळ आपल्याकडं यायची होती तेव्हा वेळ पाहण्यासाठी घटिकापात्र’ नावाचे एक साधं सोपं उपकरण आपल्याकडे वापरल जायचं. पाण्यानं भरलेल्या घंगाळ्यासारख्या मोठ्या भांड्यात एक विशिष्ट आकाराची छिद्र पाडलेली वाटी अलगद सोडली जायची, वाटीला छिद्र असल्याने त्यातून हळूहळू पाणी आत शिरून वाटी बुडली की एक घटका भरली असे म्हणत. या वाटीला परिका तर मोठ्या भांडद्याला पात्र असे मिळून घटीकापात्र असे उपकरण तयार होई.
भारतीय कालगणनेप्रमाणे दिवस सूर्योदयापासून सुरु होत असल्याने या घटिका सूर्योदयापासून पाण्यात सोडल्या जायच्या. त्या भरल्या की रिकाम्या करून पुन्हा पाण्यावर सोडाव्या लागायच्या हे फार जिकिरीचं काम होतं आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं. त्यामुळे त्याच्यासाठी उन्हात पडणाऱ्या सावल्या हेच काय ते वेळ जाणून घेण्याचे साधन होतं, पण लग्नकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमात जियं मुहूर्त साधायचा असेल त्यावेळी या घटिकापात्र आवर्जून भरली जायची. इतकच काय तर एखादा मरणासन्न अवस्थेत असला तर त्याचीही मृत्यू घटका अचूक टिपून ठेवत अस जुने जाणते सांगतात. शेवटची घटका भरणे’ हा वाक्प्रचार हवूनच आला असावा.
वेळ विचारायची असल्यास ‘किती वाजले’ असं सहज विचारून जातो. वाजणे हे क्रियापद आवाजाशी संबंधित आहे. ते वेळेसी कसा जोडलं गेलं, या मागचा इतिहास मोठा रंजक आहे. वेळ मोजण्याच्या एककास मराठीत तास तर हिंदीत घंटा असं म्हटलं जातं. जेव्हा वर सांगितलेली घटिकापात्रे वापरात होती तेव्हा अडीच घटिका भरली की तास नावाच एक वाय वाजवल जायचं, हा तास म्हणजे कास्थ धातूचा एक गोलाकार वाळा असायचा, ज्यावर लाकडी दांङ्गानं प्रहार करुन वेळेची सूचना दिली जायची. हा वेळ आजच्या साठ मिनिटांएवढा असल्यानं वेळ मोजण्यासाठीच्या एककास तास असे संबोधन प्राप्त झाले. आणखी एक विशेष म्हणजे इंग्रजीत घड्याळास क्लॉक म्हणतात. हा शब्द ज्या लॅटीन शब्दावरुन आलाय त्याचा अर्थसुद्धा घंटी असाच होतो.
प्राचीन काळात चालू कालगणनेतील सेकंद, मिनिट, तास याप्रमाणे निमिषार्थ, निमीष, पळ, विपळ, घटिका, प्रहर अशी एकक वेळ मोजण्यासाठी वापरली जात. सर्वात लहान एककांचा वापर खगोलीय गणितात व्हायचा, पण ती मोजायला काय वापरायचे? हे आजघडीला समजत नाही. ‘डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच’ अशी वाक्ये आपण बऱ्याचदा एकतो किंवा ‘चुटकी सरशी अशीही ऐकतो. ही वाक्ये आज जरी वाक्प्रचार म्हणून वापरत असले तरी कधी काळी हे सुद्धा वेळ मोजायचे एकक म्हणून वापरले जायचे.
जेव्हा घड्याळे प्रचारात यायची होती तेव्हा मंदिराचे नगारखाने, मस्जिदीतील आझान, चर्चच्या घंटासारखी साधनं झोपेतून जागे करण्यास पुरेशी होती. कारण तेव्हा माणूस घड्याळ चालवायचा. माणसानं मनगटावर पडताळ काय बांधली घड्याळं माणसाला चालवायला लागली. अहोरात्र
