जातीच्या भिंतींना तडा आंतरजातीय विवाह वाढले
आपल्याकडे विवाहाला करार नव्हे तर संस्कार या दृष्टीने पाहिले जाते म्हणून विवाहाला काही धार्मिक व सामाजिक परिणामही जोडले गेले आहेत. त्यातून मग विवाह ठरविताना तो जातीतीलच ठरवला जाण्याची परंपरा तयार झाली. आता मात्र, चित्र थोडे बदलले आहे. आजच्या तरुणाईने विवाहाच्या पारंपरिक चौकटीला छेद दिला आहे. लग्न करायचे असेल तर ते जातीतच करायला हवे, हा आग्रह या तरुणाईला मान्य नाही आणि म्हणूनच आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. सोलापूर जिल्ह्यातही ती मागच्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे.
घर परिवाराच्या मायेला पारखे होऊन सामाजिक रोप पत्करून बांधलेल्या लग्नगाठी वाढत असल्या तरी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना देण्यात येणारे अनुदान बऱ्याच जोडप्यांना न मिळाल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. जातीभेद विसरा आणि समाज जोडा या सामाजिक उपक्रमाला लाल फितीचाच फटका बसल्याचा अनुभवही त्यांना येऊ लागला आहे.
अनुदान उपलब्ध
संसाराच्या गाड्याला चाल देण्यासाठी शासनाने सुरू केलेली अनुदान योजनेची रक्कम मिळत नसल्याने आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आर्थिक खाईचे चटकेही सहन करावे लागत आहेत. आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्याला सुमारे ५० हजार रुपयांचे प्रापंचिक साहित्य तसेच रोख रक्कम देण्याची योजना सरकारने सुरू केली आहे.
समाज कल्याण विभागामार्फत उपलब्ध
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत ही योजना संबंधितांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. आंतरजातीय विवाह करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला राज्य व केंद्र शासनातर्फे ५० हजारांचे अनुदानदिले जाते. सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या १५० जोडपी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षी फक्त ५० जणांना याचा लाभ मिळाला; वर्ष उलटले तरी अनुदानाचा अद्याप पत्ता नसल्याचे विवाहित जोडप्यांनी सांगितले. या अनुदानातील ५० टक्के रक्कम केंद्र व ५० टक्के रक्कम राज्य सरकारकडून अनुदान स्वरुपात दिली जाते. सुरुवातीच्या काळात १५ हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जात होते. त्यानंतर त्यात वाढ करून ५० हजारांचे अर्थसाहाय्य देण्यास सुरुवात केली आहे.
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना
समाजामधील अस्पृश्यता नष्ट व्हावी, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केली आहे. आंतरजातीय विवाह करून शासनाच्या प्रोत्साहन योजनेचासुद्धा मोठ्या संख्येने जोडपी लाभ घेत आहेत. त्यामुळे या योजनेची सकारात्मक्ता वाढत आहे. आंतरजातीय विवाह व्हावे, यासाठी काही सामाजिक संघटना कार्य करीत आहेत. अशा संघटनांचे बहुतांशी काम हे शहरी आणि विकसित भागात सुरू आहे. त्यामुळे शहरी भागात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण जास्त आहे.
महादेव आवारे
समाजानेही स्वीकारला बदल
भारतीय समाजात जातीकडे पाहाण्याचा दृष्टिकोन आधी वेगळा होता. आपल्या जातीपेक्षा कमी प्रतिष्ठा असणाऱ्या जातीकडे पाहाण्याचा बहुतांशी लोकांचा दृष्टिकोन दूषित स्वरूपात होता. अशा जातीशी लग संबंध करणे कमीपणाचे समजले जायचे. आपल्याला घालून दिलेले संस्कार जपले जायचे. जायचे. आता मात्र, या सर्व चालीरीतींना जाणीवपूर्वक तडा दिला जात आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मदत करणारी प्रभावी सामाजिक यंत्रणा निर्माण झाली नसली तरी सरकारी पातळीवरून अल्पस्वरूपात का होईना मदत मिळत आहे
प्रस्तावानुसार प्राधान्य
कोरोनानंतर अधिक विवाह झाल्याने अनुदानाच्या प्रस्तावात वाढ झाली आहे. आधी आलेल्या प्रस्तावाला प्रथम प्राधान्य दिले जात आहे.
2 thoughts on “जातीच्या भिंतींना तडा आंतरजातीय विवाह वाढले”