धास्तावलेल्या वर माया अचंबित वर
‘मुलीचं लग्न’ हा पालकांसाठी एके काळी चिंतेचा विषय होता. आज चित्र नेमकं उलट झालं आहे, आणि हा बदल पचवणं वरपक्षासाठी अवघड जात आहे. हे नेमकं काय आहे?
महेंद्र कानिटकर,
विवाह संस्थेचा पूर्ण वेळ संचालक म्हणून काम करायला मी एक जानेवारी २००१ पासून सुरवात केली. त्या वेळी मुलीचे लग्न (त्या वेळी म्हणणं बरोबर नाही वर्षानुवर्ष।) हा पालकांचा यक्षप्रश्न होता. दोन-तीन संस्थांत नावं घालायच संस्थेच्या गदर्दीत बसून वह्या रजिस्टर शोधायची आणि ‘वरपालकांकडे खेटे घालायचे, असा नित्याचा मामला होता.
विवाह संस्थेत अगदी जुजबी माहिती असे त्या आधारानं शोधत शोधत पत्ते काढत ‘वर’शोधन बोलू असे. त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही ‘वधु’ मुलींची, चिता पालकांची’ असा जाहीर कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमात ‘वधू पालकां’नी गार्हाण्याची यादीच वाचून दाखवली होती.
डॉ. आनंद नाडकर्णी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. “चर्चा करा आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी नकोत,” असं त्यांनी बजावलं, तेव्हा गाडी रुळावर आली. मला त्या वेळीच जाणवलं, मुलींच्या पालकांना काऊन्सेलिंगची गरज आहे आणि मार्गदर्शनाचीसुद्धा म्हणून ‘सकाळ’मध्ये ‘जोडीदार निवडताना’ ही लेखमाला लिहिली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
घाबरलेली वरमाई
हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, नुकतीच एक ‘वरमाई’ मला भेटायला आली होती. इतक्या तावातावानं बोलत होती, की बस। “हे मुलींचे पालक समजतात काय स्वतःला? पाच-पाच ई-मेल पाठवल्या तरी उत्तर नाही. मग एसएमएस केले. काही उपयोग नाही. आम्ही मुलीची पत्रिका पाहूनच त्यांना अप्रोच केला होतो. तरी ते म्हणतात, मुलीची पत्रिका जमत नाही. मला सांगा एम.टेक आहे, ऐंशी हजार रुपये पगार आहे, गाडी-घोडा सगळं आहे. हा उंचीत थोडा कमी आहे. पाच-सहा; पण पाच दोनच्या मुलीसुद्धा नकार देतात. त्याचा इंटरेस्टच संपलाय, मीच धडपडते. २९ पूर्ण होतील आता दोन महिन्यांनी, मी काय करू?” त्यांचा प्रश्न रास्त होता हे निर्विवाद। लग्न शायरी मराठी
विवाह संस्थेत नोंदणीचं प्रमाण
दहा वर्षापूर्वी विवाह संस्थेत नोंदणीचं प्रमाण दोनास एक असं होतं म्हणजे दोन मुलाच्या मागे एका मुलाची नोंदणी असे. मुलांचे पालक पत्रिका द्यायला नाखूष असत. वधू-वर मेळाव्यात मुलगे आणि मुलींचं प्रमाण एकास तीन असे आणि तुरळक मुलं स्वतः उपस्थित असत. Maratha Matrimony
२००५ मध्ये परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. तीन वरांच्या मागे चार वधू असं काहीसं प्रमाण होतं. विवाह संस्थेत वरमायांची वर्दळ वाढली. नवीन नोंदणी झाली, की पहिले तीन-चार महिने वधूपालकांकडून संपर्क होई; मग ‘बर’ कितीही ‘सोन्यासारखा’ असला तरी प्रतिसाद क्वचितच असे. “आम्ही एवढे आपणहून संपर्क साधला; पण वधु पालकांचाच तोरा किती।” असा अनुभव काही जणांना येत होता,
वरमायांची बिकट परिस्थिती
पण गेल्या वर्ष दोन वर्षात मी पाहतो की, २००० मध्ये वधुपालकांनी जी स्थिती होती, जवळपास किंबहुना कांकणभर बिकट परिस्थिती आज वरमायांची आहे. या साऱ्या बदलामुळे बरमाया गडबडून गेल्या आहेत.
एके काळी नकाराधिकार ही वरपक्षाची मीनोपॉली असायची.आता मुलांची ही मोनोपॉली मुलींनी मोडून काढली आहे. मुलींनी नकार द्यायचा अंतिम हक्क स्वतःकडे राखून ठेवला आहे. एका वर्षानं हा बदल अत्यंत स्वागतार्ह आणि छानच आहे, पण वर-बापांला हा बदल पचवणं अवघड जात आहे.
सगळं उत्तम असताना वरपक्ष संपर्क साधतो, तरीही वधूपालक दाद देत नाहीत, याचं त्यांना आश्वर्य वाटते पण पूर्वी वधूपालक करायचे त्याच चुकांची पुनरावृत्ती आपणही करीत आहोत, हे लक्षात घेतलं जात नाही.
एखाद्या शिकलेल्या मुलीचं प्रोफाईल पाहिलं, फोटो आकर्षक वाटला, की बाकी काही न बघता ते मुलीच्या पालकांशी संपर्क साधतात आणि घोटाळ्याला सुरवात होते. यंदा कर्तव्य असलेल्या मुलांची परिस्थिती अशी आहे.
1 thought on “धास्तावलेल्या वर माया अचंबित वर”