बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
आभारपुष्प
रम्य पहाटेच्या क्षणी
स्वर रसाळ ऐकले
शुभ सदिच्छांचे सुर
कर्णी मधाळ गुंजले..!
आली सुखद झुळूक
स्नेहस्पर्श लेवलेली
विवाहाच्या वाढदिनी
बाग मनाची फुलली..!
सडा शब्दसुमनांचा
आम्ही हुंगला दोघांनी
प्रेमगंध शुभेच्छांचा
खोल गंधाळला मनी..!
भेट दिली सदिच्छांची
माझ्या ज्ञानपाखरांनी
दिले स्थान दैवताचे
काळजात लेकरांनी ..!
माला सुंदर मोहक
काव्य फुलांची गुंफली
प्रिय साहित्य रत्नांची
प्रिती मनाला भावली..!
रोप लाविले अंतरी
प्रेमवृक्ष ते बनले
आज मायेच्या उद्यानी
मन डौलदार झाले..!
माझ्या व सौ.भावनाच्या २८ व्या विवाह वाढदिनी सोशल मिडिया व भ्रमणध्वनीच्या माध्यमातून सदिच्छा देणाऱ्या सर्व क्षेत्रातील बांधवांचे,माझ्या आजी-माजी विद्यार्थ्यांचे आमच्या दोघांच्या वतीने मनापासून आभार..!
सुगंधानुज
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
![बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता 3 बायको शायरी](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2024/03/indian-7273331_12807347541670267639656.jpg?resize=900%2C600&ssl=1)
![बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता 4 बायको म्हणजे](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2024/03/pexels-skg-photography-6685151.jpg?resize=900%2C599&ssl=1)
![बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता 5 लग्न शायरी मराठी](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2024/02/teddy-4825509_12808317966961339030779.jpg?resize=900%2C599&ssl=1)
![बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता 6 लग्न शायरी मराठी](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2024/02/love-2012531_1920281292333992891509757646.jpg?resize=900%2C900&ssl=1)
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्न शायरी मराठी
1 thought on “बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता”