भविष्याची काळजी वाटणं आणी आजच्या धोकादायक काळामूळे लग्नासाठी मुलीच्या जास्त अपेक्षा असण तितकंसं चुकीचं नाही

भविष्याची काळजी वाटणं आणी आजच्या धोकादायक काळामूळे लग्नासाठी मुलीच्या जास्त अपेक्षा असण तितकंसं चुकीचं नाही

आज लग्नासाठी मुली मिळत नाही किंवा मुलीचं जास्त अपेक्षा ठेवतात असे सल्ले (टोमणे ) मुलींना सतत देत असतात पण मुली अश्या का वागतात हे पण विचारात घ्यावे लागेल.

मुला कडील लोकं हे फक्त मुलीचा होकार मिळेपर्येंत आदर्श अन आधुनिक कुटुंब असल्यासारखे वागतात पण एकदा का लग्न ठरलं की मग हे नको ते नको अन हे च हवं आणि असचं हवं,असं सगळं सुरु करतात परीणामी मुली जास्त घाबरतात.

प्रत्येक मुलीची एकच मुख्य अपेक्षा असते

आपल्या लग्नामूळे आपल्या आई वडिलांना काहीच त्रास होऊ नये

होकार मिळाल्यावर साधारण बोलणी सर्वांसमोर होते पण रोज छोट्या मोठया मागण्या फोन वर गोड बोलून सांगितल्या जातात ह्यात मुलाच्या आईचा सगळ्याच बाबतीत पुढाकार असतो.

आजचा सुशिक्षित तरुणही आपल्यासाठी कोण योग्य जोडीदार असेल हे स्वतःन ठरवता आई ला आवडली ना मग झालं ,इतका वर-वर चा विचार करतात.

मुली स्वप्नातल्या राजकुमारची वाट बघत असतात आणि हा फक्त तिला घरातील बायको, सून ,काकी ,मामी, वहिनी अश्या इतर पदांवर नेमण्यासाठी आईच्या आवडीची मुलगी पसंत करत असतो.

कित्येक मुलं गोंधळून गेली आहेत की; आपल्याला नेमकं कोण हवंय
लग्न म्हणजे काय हे मुलींना जितकं जास्त शिकवलं जास्त तितकं मुलांना शिकवले जात नाही.

मुलीला मात्र दोन्ही घरात सुवर्णमध्य साधायचा असतो सगळ्यांना खुश ठेवायचं असत काहीही चूक झाली तर आजही आपला समाज तिलाच दोष देत असतो म्हणून मुली जरा जास्त विचार करतात.

स्वतःच्या भविष्याची काळजी वाटणं अन आजच्या धोकादायक काळामूळे अपेक्षा जास्त असण तितकंसं चुकीचं नाही

आजही मुलाकडच्यां बद्द्ल विश्वास वाटत नाही.काही बाबतीत वर-वर दिसत असेल पण मुळापासून समाजा मध्ये बदल झालेला नाही.

सगळेच असे असतात असं नाही, हे मान्य आहे अपवाद आहेत पण लग्नाच्या बाजारात खूप मोठी संख्या ही खोटं बोलून लग्न करणाऱ्यांची असल्याने आजची स्त्री जास्त प्रॅक्टिकल विचार करते म्हणून की; काय आज लग्नासाठी मुली जास्त अपेक्षा ठेवतात.

1 thought on “भविष्याची काळजी वाटणं आणी आजच्या धोकादायक काळामूळे लग्नासाठी मुलीच्या जास्त अपेक्षा असण तितकंसं चुकीचं नाही”

Leave a Comment