मंदिरात अंगणात लग्न करण्याचे फायदे
मुलींनो लग्न मंदिरातच करा किंवा घरच्या अंगणातच करण्याचा आग्रह धरा. कारण ही गोष्ट तुमचे वडील पाहुण्यांना सांगु शकत नाहीत. कारण, एक वडील आपल्या मुलीच्या आनंदासाठी काहीही करू तिचे लग्न करून देतो. विचार करा, मुलींनो, आपले वडीलांनी नोकरी, व्यवसाय करून कष्टानं कमावलेल्या लाखो रूपयांचा चुराडा 24 तासात होतो ते कसे पहा.
आजकाल मुला कडची एकच मागणी असते की, “चांगलं करून द्या” या तीन शब्दांचा खर्च कमित कमी 3 लाख रुपये इतका होतो. कार्यालयाचे भाडे किमान 1 ते 1.5 लाख रूपये व केटरिंग चा खर्च, वऱ्हाडी आलं की, श्रीमंत पुजन / हळदीच्या दिवशी चहा, नाष्ता, जेवण. लग्ना दिवशी सकाळी चहा, नाष्ता व जेवण. याचा किमान 1.5 दीड लाख रूपये.
फोटोग्राफर 25 हजार, 25 ब्युटी पार्लर, (सोनं, कपडा, आहेर इ. खर्च वेगळा) फक्त तेही 24 तासाकरिता. आदल्या दिवशी 5 वाजता कार्यालय ताब्यात मिळते आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजता कार्यालय सोडावे लागते. आई-वडीलांची आयुष्य भराची कमाई 24 तासात उडविली जाते.
पुर्वी लग्न अंगणात होतं नव्हती का?. पुर्वीचं जाऊ द्या काल, परवाच्या लाॅक डाऊन मध्ये लग्न झाली नाहीत का.? अंगणात झालीत, खोलीत झालीत, गच्ची वर झालीत, ऑनलाईन झालीत. मुलांचे 5, मुलीचे 5 लोकांमध्ये लग्न झालीत. मग आता का होत नाहीत?. कारण, दोघे एकमेकांना पसंद केल्यानंत, मुलाच्या कडून येत असलेली मागणी.
आम्हाला काही नको, देवाने दिलेले भरपूर आहे. फक्त लग्न चांगलं करून द्या.. बस एवढीच अपेक्षा. बाप लगेच हो म्हणतो. बापाने व मुलीने कधी हिशोब घातलाच नाही.
लग्न मंदिरात किवा घरच्या अंगणात करा
1). सोने साठ हजार रूपये तोळा. दोन-तीन तोळे घातले तरी 1.5 लाख रूपये होतात.
2). कपडा लत्ता 1 लाख, कार्यालय 1 लाख, जेवण 1 लाख. किमान 4 ते 4.5 लाख रूपयांचा खर्च आहे.
श्रीमंतांची गोष्ट वेगळी परंतु गरीबांनी, मध्यमवर्गीयांनी 24 तासांसाठी एवढा खर्च करणे योग्य आहे का,? मुलींनी विचार करावा. त्यासाठी तुमच्या गावाजवळ असलेल्या प्रसिध्द देवस्थानात पवित्र स्थानी, देवी देवतांच्या सानिध्यात, साक्षीने, मंगलमय वातावरणात लग्न करा. देवाचे आशीर्वाद भेटतील संसार सुखाचा होईल.
अशी
विनंती मुलाकडच्यांना करा. तेही सहमत होतील. कारण, त्यांच्या घरात मुलगी असणारच आहे.
मुलींनो, महागड्या फोटो, विडीओ ची काय गरज आहे. आज सर्वा कडे मोबाईल आहेत. फोटो काढा, विडीओ काढा, प्रिंट काढून आणा वडिलांचे पैसे वाचतील.
मुळातच तुम्ही सुंदर आहात. लव्हली व पावडर लावूनही खुप सुंदर दिसतात. त्यासाठी महागड्या मेकपची काय गरज आहे.
तुम्हाला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी नातेवाईक, पाहुणे, मित्र, आलेले असतात आणि तूम्ही एका खोलीत ब्युटीशियन समोर तासन् तास बसलेले असतात. लग्न हा माहेरच्या मायेचा शेवटचा दिवस आहे. सर्व सोडा, सर्वांशी बोला, लग्नाचा आनंद घ्या.
उदा. लग्नाचे ठिकाण श्री ज्ञानेश्वर मंदिर आळंदी अशा पत्रिकेत उल्लेख करा.
● मुलाकडच्यांना सांगा तुम्ही आणि तुमचे पाहुणे, नातेवाईकांना आळंदी येण्यास सांगा.
● मुलीकडच्यांनी आपल्या पाहुण्यांना नातेवाईकांना लग्ना दिवशी किंवा आदल्या दिवशी आळंदी लायेण्यास सांगा.
● कोणत्याही देवस्थानात चांगल्या प्रकारच्या धर्मशाळा व खोल्या उपलब्ध आहेत. दोन दिवस अगोदर बुकिंग करू शकता. किंवा हाॅटेलही बुक करू शकता.
●जेवणासाठी चांगले हॉटेल्स व हाॅल उपलब्ध आहेत. प्रति भोजन करून मुलीला विदायी देता येईल.
● मंदिरात लग्न केल्यामुळे अनेक फायदे होतात एक देवाच्या सानिध्यात लग्न होते. 2.) मुलीचा वडिलांचा खर्च कमी होतो. 3.) सर्वांना देवदर्शनाचा लाभ घेता येईल. 4.) देवस्थानाचा गावच्या आर्थिक उलाढालीत, दळणवळणात वाढ होईल.
●पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर अशा मोठ्या शहरातल्या मुलींच्या पाल्यांनी जवळचे देवस्थान, पर्यटन स्थळे, गडकिलल्यांच्या ठिकाणी आपले लग्नकार्य लावावे, म्हणजे सर्वांना त्या ठिकाणचे महत्व कळेल, तीर्थक्षेत्र पाहण्यात येईल.