मुलगी देता का मुलगी गावोगावी लटकले भावी

मुलगी देता का मुलगी गावोगावी लटकले भावी

शेकडो नवरदेव लग्नाच्या प्रतिक्षेत, वय वाढतंच चाललंय; बाशिंग जड की जुळून येणं अवघड ?

दत्ता पाटील माळेगाव

यंदा कर्तव्य आहे म्हणत म्हणत दिवाळी गेली, उन्हाळा जातोय,अनेक वर्षे झालीत, वय वाढतच चाललंय, ग्रामीण भागात गावोगावी व शहरात चित्र भावी नवरदेव वधु च्या प्रतिक्षेत आहेत.

मागील तीन वर्षापासून करोनाच्या संकटामुळे शहराकडे गेलेले त परत गावी आले होते. त्यातील अनेक इकडेच थांबले तर काही परत गेले. पण अनेकांच्या नोकर्या गेल्या, त्यामुळे बेरोजगारी वाढली असून परिणामी लग्न जमणे अवघड असत्याची प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, मजूर अशा कुटुंबातील पोरांची वय वाढत चाललंय, मुली पाहण्यास आल्यानंतर मुलीचे पालक विचारतात, मुलाला सरकारी नोकरी आहे काय? आणि यामुळे का मुलांचे लग्न जमवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

अर्धवट शिक्षण सोडून इतर उद्योग शेतीत काम करणारे तरुणांना विवाहासाठी अडथळे येत आहेत, सगळे जवळच्या नात्यातील मुलगी शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कौटुंबिक परिस्थितीमुळे मुलगी फुकट करायला तयार असले तरी जवळचे नातेवाईक ही मुलगी द्यायला चौकशी करतात, त्यातून जर निर्व्यसनी आहे अशी माहिती मिळाली तरच या स्थळांचा विचार केला जातो. जर त्यातून तो व्यसन करतो असे कळले तर नाही म्हणून निरोप पाठवला जातो.

जावई नोकरदारच हवा हा निर्णय

मुलीचे वडील जावई नोकरदारच हवा असाच निर्णय पका करून बसलेले आहेत. मग कोणतीही नोकरी असो पण तो नोकरदार असावा अशी त्यांची मानसिकता तयार झालेली आहे. परंतु त्यांचा मुलगा नोकरी असल्यामुळे अनेक दिवसापासून तासाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे खूप चांगली मुलेही आहेत ज्यांना नोकरी नाही, जे उत्तम व्यवसाय करतात, निर्व्यसनी आहेत, यांना मुलीच्या वडिलांनी मुली दिल्या पाहिजेत तरच त्यांस मुरा मिळतील.

मुलगा काय करतो ?

स्थळाची शोधाशोध सुरू असताना मुलीच्या पालकांचा महत्वाचा प्रश्न पुढे येतात, मुलगा काय करतो? जर मुलगा सरकारी नोकरी किंवा व्यवसायात स्थिर असेल तर विचार करू असे सांगितले जाते. मात्र, फक्त शेती आहे आणि मुलगा शेती पाहतो असं सांगितल्यानंतर पुन्हा पाहुनी परत फिरकत नाहीत, असे चित्र वारंवार पाहात आहे.

शेतकरी मुलाला कोणी मुलगी देता का मुलगी?

हुंडा नको मामा फक्त मुलगी द्या मला
चौपूर्वी तिच्याकडून वरदक्षिणा, मानपान, कपडेलते, भांडीकुंडी, संसार काही मागणी जायची. मात्र आता काही देऊ नका फक्त तुमाची मुलगी घ्या.

टुकारांच्या लग्नांचे वांदे
गावोगावी आणि शहरात काही न करता आई-वडिलांच्या जीवावर ऐशो आराम करणारे फुकटचे खाऊन फिरणारे टुकार पोरांची लग्न होणे खूप कठीण आहे.

Leave a Comment