मुलीच लग्न झालं

मुलीच लग्न झालं

भाऊंच्या मुलीच लग्न झालं
लग्नात लाखो रुपये खर्च झाले..
लग्न झाले..
पार पडले..
लग्नात हजार,दोन हजार लोकं आली..
लांब लांब चे नातेवाईक आले (सुट्या काढून)
मुक्कामही केले…
भाऊची कॉलर टाईट झाली…
वॉर्डातून, गावातून निघतांना वेगळाच  आनंद असायचा…. पोरीच्या लग्नानंतर भाऊ जवळपास दोन महिने लग्नाच्याच चर्चा करायचे…(जीवनभराची कमाई लग्नात निछावर करून…आटापिटा करून धुमधडाक्यात भाऊने पोरीचं लग्न लावले)……*

मग काय …
चर्चेत एकच .. “२००० लोकं आली,मुंबई,दिल्ली विदेशातून संबंधित नातेवाईक आले.. ….

पाहुनचार तर  बोलायचं कामच नाही…..



लग्न आटोपून दोन तीन महिने गेले…
पण भाऊ लग्न नाही विसरला……

  ” भाऊ आजारी पडला… गेल्या सात दिवसापासून भाऊ ICU मध्ये भरती आहे”
पण…
लग्नात आलेल्या २००० लोकांचा कुठं पत्ताच दिसत नव्हता”

कुठे गेली ती पाहुनचार करणारी लांब लांब ची माणसं?

भाऊ ने होती नव्हती कमाई लग्नात खर्च केली… कर्जही घेतले….. आणि आता ICU मध्ये भरती आहे सात दिवसाचा ICU चा खर्च …डॉक्टर सुट्टी देण्याचं नाव घेत नाही..

भाऊ ची पत्नी व्याजाने पैसे घेत आहे…. नातेवाईकांनाच पैश्याची अडचण ते तरी कुठून देतील…..????

भाऊ बेडवर पडून होते… मी गेलो भेटायला…. भाऊच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत होते… रडत रडत मला म्हणाले…

भाऊंच्या मुलीच लग्न झालं
भाऊंच्या मुलीच लग्न झालं



विनोदराव, तुमचं ऐकलं असत तर बरं झालं असत… तुम्ही म्हणत होता , मुलीच्या लग्नावर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी तिच्या शिक्षणावर पैसा खर्च कराल तर 100% return मिळेल
याला आमच्या बिजनेस लँग्वेज मध्ये Return On इन्व्हेस्टमेंट म्हणतात…
नातं असो की मैत्री सर्व सुखाचे भागीदार असतात… आपली समस्या आपल्यालाच सोडवावी लागते..

विनोदराव मी खूप मोठी चूक केली…. शान मारण्यासाठी मी सर्वच जमा पुंजी लग्नात खर्च केली…. आता माझ्यावर अगोदरच कर्ज आणि वरून मी हॉस्पिटलमध्ये आणि सर्वांनीच मदतीचा हाथ काढून घेतला…. त्यांना वाटत असेल की मी पैसे परत कधी आणि कसे करेल?

हे सांगताना भाऊ च्या डोळ्यातून अश्रू ढसा ढसा वाहत होते.

भाऊ म्हणाले ” विनोदराव, माझ्याकडे आता काहीच नाही.. पूर्णपने कंगाल झालो आहे”

हे सांगताना अचानक धडकन आवाज आला… आणि बाहेर आरडा ओरड सुरू झाला… मी दरवाजा खोलून बाहेर गेलो….

बाहेर पाहून माझं हृदय स्तब्ध झालं.. माझ्याही डोळ्यात आता अश्रू होते…. कारण,भाऊ ची पत्नी हार्टattak ने दगवल्या होते…..

( त्यांची पत्नी आमचं बोलणं  लपून ऐकत होत्या……. )

मी लगेच भाऊ कडे आलो… भाऊ तडफडत होता मी मोठ्याने डॉक्टर ला आवाज दिला…. शेवटी भाऊचा ब्रेन ह्यामरेज ने मृत्यू झाला……….

माझं मन अतिशय सुन्न  झालं…. …
रात्री झोप लागत नव्हती…
पत्नीने विचारलं काय झालं?

तिला संपूर्ण स्टोरी सांगितली….
तिचंही मन सुन्न झालं….

आणि म्हणाली …
” जर भाऊ ने लग्नात तोरा मिरविण्यासाठी अतिउत्साहात पैसा खर्च केला नसता तर भाऊ आज जिवंत असते “*
आणि म्हणाली …
मी आजपासून विनाकारणचा खर्च टाळण्याचा प्रयत्न करते ……”

भाऊ च्या अंत्यसंस्काराला मी जाऊ शकलो नाही…
पण मी माहिती घेतली तेव्हा कळले….
अंत्यसंस्कार च्या वेळी जवळपास तीनशे ते चारशे  लोकं उपस्थित होती…….

लग्नाच्या वेळी ही जवळपास २००० लोकं होती ….

मरणाला आणि लग्नाला जी लोकं होती तीच लोकं  रामभाऊ हॉस्पिटल ला ICUमध्ये असताना  कुठे गायब झाली ?

आताही भाऊ ची आठवण येते…. जिथंही थाटामटात लग्न दिसते…. फक्त भाऊ सारखं हाल होऊ नये हीच इच्छा.
भाऊ हे काल्पनिक पात्र आहे…… ही पोस्ट लिहिण्याचा हेतू एवढाच की  संकटाशी एकट्यालाच सामना करावा लागतो
लोकं काय म्हणतील याला बळी पडु नका…

अज्ञानाने आम्हीही कधीकाळी याला बळी पडलो आहे….

पुढच्याला ठेच मागचा शहाणा व्हाव्हा हाच उद्देश ठेवून ही पोस्ट लिहिली…

विसरू नका 

Leave a Comment