लगीन घाई एवढं सोपं असतं का लग्न लावणे?

लगीन घाई एवढं सोपं असतं का लग्न लावणे?

लगीन घाई

उद्या तुळसी विवाह संपन्न झाला की पर्वा पासून लगीन घाई सुरू.म्हणूनच थोडं का होईना लगीन घाई या विषयावर काहीतरी लिहावेसे वाटलं.


एवढं सोपं असतं का लग्न लावणे?

माझ्यामते नाही पण लोक सहज घाई करून मोकळे होतात.
मुलींना तर मुलं सहजपणे मिळत आहेत तरी सुद्धा आई-वडील एवढी घाई करतात कारण त्यांना मुलगी या जातीची भीती असते.आमच्या अहिराणी बोलीभाषेत एक म्हण आहे की मुलगी नांदती बरी नहीत मरती बरी.पण मायबापहो मुलगा तुमच्या जवळ असतो पण मुलींना सम्पूर्ण आयुष्य हे तुमच्या गैरहजेरीत जगायचं असत हे लक्षात घ्या.तीच्या सासरी छोट्या-मोठ्या अडी-अडचणी बघायला तुम्ही नसणार तिच्या सोबत.म्हणून मुलगा किंवा सासरची माणस कशी बघावीत ह्यासाठी तुमच्या हातात पूर्ण २१ वर्ष असतात.कुणाच्या बाबतीत १८ किंवा २५ अथवा त्याहून जास्त.पण किमान सरासरीने २१ वर्ष तुम्हा सर्व पालकांकडे असतातच. ती लहान असल्यापासून तुम्ही विचार करायला हवा की हीच सासर कस असावं.तुमचा काळजाचा तुकडा जरी मुलगा असला तर कुठं ना कुठं मुलीचीही जागा तुमच्या हृदयात आहेच म्हणून थोडा का होईना विचार करा.

लग्न कविता

मुलींसाठी जावाई व सासर कस असावं

मी याअगोदर तुम्हा पालकांना मुलींना सासरी पाठविताना रडून-खचुन न जाता सासरच्या लोकांसोबत व नातेवाईकांसोबत कस वागावं हे सांगितलं होतं.


पण आता थोडं मार्गदर्शन तुमच्या मुलींसाठी जावाई व सासर कस असावं याबाबतीत.

१.प्रथमत: जे तुम्हा सर्वांनाही वाटत की जावाई हा निर्वेसणी व शुद्ध शाकाहारी असावा.


२.आई-वडील हेच त्याच्यासाठी दैवत असावे सासू-सासरेही दैवत असावे ही अपेक्षा करू नका थोडा वेळेवर मान मिळाला तो हसत घ्या.


३.चार चौघात तुमचा किंवा तुमच्या मुलीचा अपमान होणार नाही हे चार चौघांना विचारा कारण त्याची वागणुक तिथंच कळेल.


४.जावाई हा तूमच्या मुलीला शोभेल असाच बघा,नाहीतर मुलगी तर म्हणतेच गुण हवेत बघायला सावळा असला तरी चालेल पण तीच मुलगी त्याला नंतर स्वीकारत नाही हेही कटू सत्य म्हणून तीच ऐकू नका.


५.तुमच्या मुलीला आयुष्यभर सांभाळ करेल एवढी संपत्तीची अपेक्षा न करता तिला दोन वेळेचं दोन घास व दोन शब्द सुखाने कानावर येतील एवढे संस्कार त्याच्यात शोधा.


६.गावाबाहेरील पान टपरी वर तपास न करता २ दिवस स्वतः फेरफटका मारत त्याची पूर्णतः चौकशी करा.
म्हणजेच शैक्षणिक पात्रता,गुणधर्म, व इतर.


७.राहणीमान साधी व सरळ असावी खूप महत्त्वाचे त्यावरून तुम्हाला त्याचा मोठ्यांच्या बाबतीतला आदर कळतो.


८.गळ्यात लॉकेट,हातात चैन,पायावर फाटलेली जीन्स,केसांना कलरमेट,हातावर टॅटू असं चित्र विचित्र बुजगावणे बघून मुलीचं आयुष्याचं कार्टून नेटवर्क करू नका.


९.शेतकऱ्याचा मुलगा असेल आणि नोकरी करत असेल तरीही त्याने शेती काम केलं असेल तरच मुलगी द्या कारण आजकाल नोकरीचा काही भरवसा नाही म्हणून गावावर येऊन शेती तरी करेल.


१०.तुमच्या मुलीच्या आवड निवड तुम्हाला माहीतच असतात म्हणून त्याच्याही आवड निवड जाणून घ्या संपूर्ण आयुष्य तोच तिच्या सोबत असेल म्हणून एकमेकांच्या आवड-निवड जुळणे खूप महत्त्वाचे.


११.त्याच्या मनात भाऊ बहिणीचा आदर असायला हवा.
उद्या उठून तुमच्या मुलीसोबत पहिल्या मूळला तुमची दुसरी मुलगी सोबत जाईल व तुमचा मुलगा (भाऊ) पदोपदी घ्यायला जाईल म्हणून त्याला त्या दोघांचाही तेवढाच आदर असायला हवा हे गरजेचे.


१२.मुलीचे सासू सासरे हेही संस्कारी व निर्वेसणी असणे तेवढेच महत्वाचे,तुमच्या नंतर तेच तिचे आई-वडील.


१३.सासू आजूबाजूला बायकांच्या घोळक्यात जास्त वेळ घालत असेल त्या घरी मुलगी देऊ नका लेगच भरल्या घरात आग लागेल.


१४.सासूचे आई-वडील जिवंत असतील तर त्यांची भेट घ्या ते अर्धा तास तुमच्यासोबत बोलले की त्यांच्या बोलत्यातून तुम्हाला त्यांच्या मुलीवर केलेले संस्कारही कळतील.


१५.सासरा हा मुलीच्या वयापेक्षा किमान ३० वर्ष मोठा असायला हवा अन्यथा आजकाल कधीही विनयभंग होऊ शकतो.


१६.सासू सासरे दोघांचा काही वाद असेल तर तो किती जुना आहे याची शहानिशा करा नेहमी भांडण होणाऱ्या घरात उगाच मुलगी देऊ नका.


१७.घराचा रंग न बघता त्यांच्या चेहऱ्यावरील रंग (हर्ष) बघा आजकाल चार सिमेंटच्या भिंती सर्व्यांच्याच आहेत म्हणून ते बघून शेणासारखे तुम्हीही फुलू नका.

मराठी मंगलाष्टक


तुम्हाला सांगायला बरच काही पण तुम्ही एवढं जरी पालन केल तरी तुमच्या मुलीचा संसार अगदी गुण्या गोविंदाने नांदेल.शेवटी मुलगीही काळजाचा तुकडाच अस गृहीत धरा आणि लागा तयारीला…..


लेख-हेमंत पाटील

विवाह समारंभ नाही तर संस्कार म्हणून साजरा करा
लगीन घाई एवढं सोपं असतं का लग्न लावणे?

2 thoughts on “लगीन घाई एवढं सोपं असतं का लग्न लावणे?”

Leave a Comment