लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुला बघितलं अन् लगेच आवडलास बघता बघता माझा झालास मी पण तुझी झाले हक्काने मिरवले लग्न जरा… लवकरच झालं पण काहीसुद्धा नाही बिघडलं तुझं, माझं… असं नाही काही राहिलं सगळं आपलं, आपल्या दोघांचं झालं सोबत सोबतच मोठे झालो एकमेकांच्या जास्त जवळ आलो सोबतीची तुझ्या मग सवयच झाली आणि तू सुद्धा ती मुद्दाम लावून दिली दोन पिल पिटुकली घरट्यात आली संसाराची सुरेख चौकट सजली दिवस उडाले भुर्रकन सोनपंख लावून नव्हाळी मात्र आहे अगदी तशीच अजून काळ्याचे आता हळुहळु रुपेरी झाले अधिकच देखणे नि रुबाबदार झाले आज झालेत तुझे राजा पुरे पन्नास पण अजूनही रोखतोस माझ्या काळजातला श्वास सातवा जरी म्हणतोस तू जन्म आपला खळीची गुलामी सदा मंजूर मला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
आनंदाची भरती ओहोटी, खारे वारे, सुख दुःख ही येती जाती संसाराचे डावच न्यारे रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे उमजुनि यातील खाच खळगे नांदा सौख्यभरे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… माझ्या प्रिय बायकोला लग्गाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी
नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली प्रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे, समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली, एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली, अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो… शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
नाते आपले नवरा बायकोचे माझ्या शुभेच्छांनी बहरून येऊ दे उधळण करीत रंग हे सदिच्छांचे तुम्ही दोघे एकमेकांना कवेत घेऊ दे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा
विश्वासाचे असेच बंधन असेच कायम राहावे दोघांच्या जीवनात तुमच्या प्रेमाचे प्रलय यावे एकच मागणी आहे परमेश्वर चरणी जीवन दोघांचे सुख-समृद्धी आनंदाने बहरून जावे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
एक क्षण मंगल प्रहराचा, एक क्षण मेहंदीच्या बहराचा, एक क्षण लगीन घाईचा, एक क्षण शुभ शहनाईचा, एक क्षण जन्मासाठीचा, एक क्षण लग्नगाठीचा.
लग्न म्हणजे दोन जीवांचे मधूर मिलन
लग्न म्हणजे दोन जीवांचे मधूर मिलन, सनई-चौघड्यांच्या स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण,सुख – स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन, सासर- माहेरच्या नात्याची मंगळसूत्रात केलेली पवित्र अशी गुंफण, यासाठी हवा तुमचा शुभाशीर्वाद, शुभेच्छांची सुखद रम्य पखरण, त्यासाठी तुम्हाला हे आग्रहाचे निमंत्रण
लग्न म्हणजे काय?
कुणाचा तरी विश्वास लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ, लग्न म्हणजे हळुवारपणे घातलेली कुणाला तरी साद, लग्न म्हणजे मैत्रीही, लग्न म्हणजे नात्यातला गोडवा आणि दोन कुटुंबाशी जोडणारा एकमेव दुवाही.
4 thoughts on “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”