लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता marriage shayari marathi
“वचन” वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको
एक वचन, नात्याच्या विश्वासाचं, जाणुनी भावना एकमेकांच्या, आंतरिक साद घालण्याचं.
एक वचन, स्वप्नात जगण्याचं. हरवूनी सहवासी एकमेकांच्या, गुलाबी विश्वात विहरण्याचं.
एक वचन, आठवणीत राहण्याचं, असता दूर एकमेकांच्या, अधीरतेने वाट पाहण्याचं.
एक वचन, एकत्र राहण्याचं, हृदयात विसावूनी एकमेकांच्या, जीवापाड प्रेम करण्याचं.
![लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला 2 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2024/05/cropped-fb_img_17161033691707504014010834221780.jpg?resize=640%2C853&ssl=1)
स्पंदने बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
“स्पंदने”
क्षणात मोहून जावे, अशी छानशी कल्पना तू.
भाव बेधुंद व्हावे, अशी वाऱ्याची झुळूक तू.
मन चिंब भिजावे, अशी पावसाची सर तू.
दिसताक्षणी हरवून जावे, अशी फुलांची पाकळी तू.
सोबतीस सदैव रहावे, अशी जीवाची आस तू.
दुराव्याचे आयुष्य नसावे, माझ्या हृदयाची स्पंदने तू.
![लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला 3 बायको शायरी](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2024/03/indian-7273331_12807347541670267639656.jpg?resize=900%2C600&ssl=1)
Happy Annivary to Bayako
“सल”
प्रेम तुझे निरागस, समजले होते मला. आसवे माझीही वाहिली, दूर करताना तुला.
बोलणे तुझे स्वच्छंद, भावले होते मला. यातना हृदयात रुतली, साठवून ठेवताना तुला.
भेटणे तुझे घटकाभर, आवडत होते मला. नजर शोधतच राहिली, भेटींच्या जागेवर तुला.
मागणे तुझे सोबतीचे, स्वीकारावयाचे होते मला. पण, सल कायमची स्वीकारली, नकार देताना तुला.
भावना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
“भावना”
करताना काही तुझ्यासाठी, चूक न कोणती घडावी. न देता क्षणभर दुःख, तुझी दुःखेच वाटावी.
व्हावेस खूप मोठे तू, हीच इच्छा मनाशी. न समजावे एकटे स्वतःस, नेहमीच आहे मी सोबती.
निरपेक्ष प्रेम माझे, मागे न काही तुजपाशी. न थांबावे क्षणभरही तू, करीत विचार मजसाठी.
पाहुनी तुजला सुखी, होईल मी आनंदी. गेलीस जरी खूप दुर, असेल तोच मी तुझ्यासाठी
![लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला 5 नवरा बायकोतील नातं](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2024/03/face-to-face-3141317_12806838299116820990812.jpg?resize=900%2C599&ssl=1)
सोबत Happy Marriage Anniversary Bayko
सोबत
हवी सोबत सौख्याची, आनंदाने उधळणाऱ्या लहरींची, सोडूनी रुसवा मनाचा, धुंद होऊनी विहरण्याची.
हवी सोबत प्रेमाची, न तुटणाऱ्या बंधनाची, राहुनी गोड स्वप्नात, सर्व काही विसरण्याची.
हवी सोबत विश्वासाची, दुःखात एकमेकांना सावरण्याची, आली कितीही संकटे, राहुनी संगतीने झेलण्याची.
हवी सोबत जीवनाची, शेवटपर्यंत चालणाऱ्या प्रवासाची, न मागता काहीही, सर्व काही देण्याची.
प्रशांत सिनलकर
1 thought on “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला”