लग्न गीते

लग्न गीते


खांदेशी लोकगीते खेसरना लग्न गीते

पयला टाईमले खान्देशमा 15/15 दिन लग्ने चालेत. त्यांना पयले लगीन घर महिना, महिना बायास्ना नाच, गानाना धुमाया चालेत. घरे माटीना र्‍हायत. सारा पोतारा फाईन ते थेट गहु तांदूय दाय साय निसा लोन्ग गाव म्हान्या बाया मदत करेत. दयन कुटन बठा कामे गावन्या बाया करेत. शेवटला टप्पामा तयन मयन. शिया, सांजर्‍या, भातभातना लाडू, कूल्लाया, पापड, खापर वरन्या पुर्‍या, हाई बठ काम गाव म्हान्या बाया करेत. नी या कामे करता करता बाय गाना म्हणेत.

या सयपाकमा बी एक थट्टा करतीस बाया. नवरदेवले चगाडा गुंता, सांजा जागांवर एक मीठ भरेल नी एक चिंचोर्‍या भरेल सांजरी तई ठेयत. मारुतीना पारवर जवय नवरदेवले सीया सांजर्‍यासन ताट जाये. त्यामा मीठ चिचोंरीन्या दोन सांजर्‍या बी ठी देयत. नवरदेवनी जर इसर या सांजर्‍या फोड्यात ते साल्या त्याले पोट धरी हासेत.

लग्न गीते
लग्न गीते

गानास्मा नवरदेव नवरीना नावे येयत. त्यांसना माय बाप मामा मावशा काका चुलता यास्ना नावे येयेत. काही मनोरंजनना गमतीदार गाना र्‍हायत. त्यामा नाट्य र्‍हाये. संवाद र्‍हायेत. नी मुख्य म्हणजे खेसरना गाना र्‍हायेत. खेसरना नातान्या बाय एराएरले असा गाना म्हनेत. मानसेसनी बी खेसर करेत. कालदिन एक कडव टाक व्हत. लाल बंगालामा का धव्या बंगलामा? आते ते गाण पूर गाण धाडेल से.

खान्देशात लग्न हा एक पवित्र सोहळा आहे. खान्देशात ज्या घरात लग्न आहे त्या घरात सव्वा महिना मांसाहार करत नाहीत. त्या घरातील चुलीवर सव्वा महिना मटण शिजत नाही. पण हल्ली खान्देश बाहेरील चाली रितीची घुसखोरी झाली आहे. इतरांचे पाहून खांदेशी लोक हळदीच्या दिवशी मटणाच जेवण द्यायला लागले आहे. मटण आल की पाठोपाठ दारू येतेच. हे अवैध आहे. आपली उज्वल संस्कृती भ्रष्ट करण्याचा तो प्रकार आहे.

खान्देश हा कान्हदेश म्हणजे कृष्णाचा देश आहे. वैदिक धर्मा विरुद्ध पहिले बंड श्रीकृष्णाने केले आहे. त्याने इंद्र, वरुण, अग्नी या वैदिक देवतांची पूजा बंद करून निसर्ग आणि गोपूजा सुरू केली आहे. वैदिक धर्मात स्त्री, शूद्र, बहिष्कृत आणि निषाद यांना मौजीबंध करण्यावर बंदी आणून त्यांना जानवे घालायला बंदी केली होती. श्री कृष्णाने ही बंदी उठविली. सर्वाना जनाव घालण्याचा अधिकार दिला.

जानव्याला संस्कृत मध्ये यज्ञोपवीत म्हणतात. यालाच अहिराणी भाषेत पोयत म्हणतात. श्रीकृष्णाने खान्देशात लग्न विधीत हे पोयत (यज्ञोपवीत) घालण्याचा अधिकार सर्वाना दिला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, बहिष्कृत, निषाद आणि स्त्री व पुरुष यांच्यात भेद नाही. या सर्वाना पोयत घालण्याचा अधिकार आहे.

वैदिक धर्माच्या विरुद्ध बुद्धाने केलेले बंड हे दुसरे बंड आहे. बुद्धाची पूर्व पिठीका कृष्णाने तयार केली आहे. हे सर्व संस्कार टिकून राहावेत, समता टिकून राहावी. खान्देशची संस्कृती जगा समोर यावी म्हणुन आपण बापू हटकर प्रस्तुत खान्देश दर्शन युट्यूब चॅनेल सुरू केल आहे. त्यावर आपण खान्देश बद्दल सर्व प्रकारची माहिती देत राहु. यातील नव्या व्हिडिओ आपल्या पर्यंत त्वरित याव्यात म्हणुन चॅनेल सबस्क्राइब. लाईक, शेअर करा!.

बापू हटकर