लग्न म्हणजे नेमकं काय विनोदि कवीता



लग्न म्हणजे नेमकं काय विनोदि कवीता



‘लग्न’ हे सुंदर जंगल आहे.

जिथे ‘बहादुर वाघांची’ शिकार,

मोहक हरिणी करतात…

लग्न म्हणजे – ‘अहो ऐकलंत का ?’ पासुन ते
‘बहिरे झालात की काय ?’ पर्यंतचा प्रवास.

लग्न म्हणजेच –
‘तुझ्यासारखे या जगात
कुणीच नाही’ पासून ते,

‘तुझ्या सारखे छप्पन बघितलेत’
पर्यंतचा प्रवास…

लग्न म्हणजे –
‘तुम्ही राहू द्या’ पासुन ते

‘तुम्ही तर राहुच द्या’
पर्यंतचा प्रवास …

लग्न म्हणजे –
‘कुठे होती ग माझी राणी’ पासून ते

‘कुठे मेली होतीस’
पर्यंतचा प्रवास…

लग्न म्हणजेच-
‘तुमचे नशीब मी भेटले तुम्हाला” पासुन ते

‘मेलं माझंच नशीब फुटकं,
तुम्ही मला भेटलात”
पर्यंतचा प्रवास …



थोडक्यात काय तर –
वैवाहिक जीवन हे
कश्मीर सारखे आहे,
सुंदर तर आहेच,
परंतु दहशत पण आहे …


ही कविता लिहून कवी फरार आहे….

Leave a Comment