लग्न समारंभात कोणत्याही प्रकारच अन्न वाया घालवू नका

लग्न समारंभात कोणत्याही प्रकारच अन्न वाया घालवू नका

नमस्कार मित्रांनो!!

तुम्हांला आमंत्रित करणाऱ्या व्यक्तीने तुम्हांला आठवून व आपले समजून तुम्हांला आमंत्रित केलेलं असतं.. त्याने एक-एक पै जोडून आणि तुम्ही प्रसन्न व्हावं म्हणून हे जेवणच आयोजन केलेलं असत..मात्र आपण कसलाच विचार न करता..हे महागडं जेवण वाया घालवतो. ज्यात दोन उपाशी लोक नक्कीच जेवण करू शकता!!

माणूस स्वतःच्या पैशाने आईस्क्रीम खाताना तो झाकणही चाटतो, वीस रुपये किमतीची बिसलेरी बाटलीतील पाण्याचा थेंबही सोडत नाही, मग एका बापाच्या मुलीच्या लग्नात एवढं ताट का भरता ? का मग फेकून देऊन निघून जाता ? कारण यासाठी की आम्हास मोफत जेवण मिळाले ? एवढं मौल्यवान अन्न आजूबाजूला फेकून देतो या विचाराची लाज वाटली पाहिजे!

एका मध्यमवर्गीय बापाची चुकी एवढीच कि त्याने आपल्या आनंदात तुम्हाला सामावून घेतलं. एक बाप या दिवसासाठी कित्येक वर्षं कमवतोय असा कधी विचार आपण केला आहे का ?

आपण सर्वांनी याचा विचार करावा आणि प्रतिज्ञा घ्यावी.

आयुष्यात कोणाच्याही लग्नात मौल्यवान अन्न ताटात उष्टे सोडणार नाही!!


डॉ विकास निकम
जीवन विकास केंद्र जळगाव
9850484722

Leave a Comment