लग्न सराई लेख लोक काय म्हणतील
“”ना घोड्यावर बसू दिले””,, ‘”‘ना पाई चालू दिले,,
मुलीच लग्न कमी वयात लग्न केल तर लोक म्हणतात; “”तुम्ही घाई केली अजुन मुलीला शिकवले असते””,
मुलगी शिकवली तर लोक म्हणतात ; “”मुलीच लग्नाच वय निघत आहे तीच लवकर लग्न करा””,
शेतकरी मुलाला मुलगी दिली तर लोक म्हणतात; “”तुम्ही घाई केली तुम्हाला नोकरीवाला जवाई भेटला असता”
शेतकरी मुलांना मुलगी नाही दिली तर लोक म्हणतात;””तुमच्या अपेक्षा जास्त आहेत””,
गुण आणी कूड़ली काढली तर लोक म्हणतात;””तुम्ही अंधश्रद्धा ठेवतात””,
गुण आणी कूड़ली काढली नाही तर लोक म्हणतात;””लग्नात आणि लग्नानंतर तुम्हाला फार अडचणी येतील””,
लग्नाच्या अनिष्ट चाली-रिती मोड़ल्या तर लोक म्हणतात;””तुम्ही लग्नात रितीरिवाज पाड़ला नाही””,
लग्नाच्या अनिष्ट चाली-रिती पाडल्या तर लोक म्हणतात;””अजुनही जुन्या विचाराचे लोक आहेत””,
लग्नात मुलाने हुड़ा घेतला तर लोक म्हणतात;””पैशाचे लालची लोक आहेत””,
लग्नात मुलाने हुड़ा घेतला नाही तर लोक म्हणतात;””तुम्हाला काय घाई झाली होती? मुलाच्या लग्नाची, हुड़ा घेतला नाही तर””,
एकच प्रश्न कोण आहेत ही लोक? ज्यांना तूम्ही ऐवड़े घाबरतात
म्हणून; “”तुकाराम महाराज म्हणाले ऐकावे जणांचे आणि करावे मनाचे”” कारण लोक तुम्हाला घोड्यावर पण बसु देणार नाही आणि पाई पण चालू देणार नाहीत.