लिव्ह इन रिलेशनशिप आणि डायव्होर्सच्या वाढत्या माॅडर्न ट्रेंड

लिव्ह इन रिलेशनशिप आणि डायव्होर्स इ.इ. च्या या वाढत्या माॅडर्न ट्रेंड च्या काळात अजुनही शहरी भागातील विवाहीतां साठी

तुम्हांला शहामृगाच्या बाबतीतली एक गोष्ट माहिती आहे का ??

नर किंवा मादी शहामृग आयुष्यात एकदाच आपल्या साथीदारची निवड करतात….
साथीदार मिळाला कि ते जिवंत असेपर्यंत एकमेकांबरोबरच राहतात, एकमेकांची साथ सोडत नाहीत,,,
पण जंगलात रहाताना जर एकाचा मृत्यू झाला, काही कारणाने आणि तो मृत्यू दुसऱ्याने पहिला तर तो जिवंत असलेला शहामृग अन्नत्याग करतो ताबडतोब आणि बरोबर वीस दिवसांनी मरतो…..


बापरे,,,,परवा मी पुण्यात गेलो होतो त्या वेळेस हि माहिती मला जगप्रवासी सुधीर नाडगौडा यांच्याशी बोलताना कळाली आणि मी अस्वस्थ झालो……
हा विषय मनातून जाईना….!
इतके प्रेम……!!
इतकी निस्सीम साथ पक्षाच्या विश्वात असते का…….????
Great……….¡¡
शहामृगाला आपल्या जोडीदाराचा मृत्यू सहनच होत नाही….
पण तो मृत्यू त्याला कळलाच नाही तर तो जगतो….


हे जग वेगळेच आहे…..
रोज सकाळी फिरायला जातो तेव्हा अशा माणसातल्या शहामृगाच्या जोड्या मला भेटतात….
मला खुप आवडत त्यांच्याकडे पहायला.
बरोबर साडेआठ वाजता एक आजोबा टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, स्वेटर घालून आपल्या केस पिकलेल्या सुरकुतलेल्या गोड आजीच्या हाताला धरून हळूहळू येतात…….
दोघांनाही कमी ऐकायला येते बहुतेक……..
मोठ्यांदा बोलतात.
आजोबा काहीतरी विचारतात…
आज्जी वेगळेच ऐकतात….
मग…
काहीतरी बोलतात….
ते ऐकून आजोबा आज्जीकडे बघून मस्त हसतात….
..मला त्यांच्यात शहामृग दिसतो.


मला पुण्यातले आज्जी आजोबा फार आवडतात, बालगंधर्व ला नाटक बघायला जातो तेव्हा अशा शहामृगाच्या जोड्या असतातच.
आज्जीच्या छोट्याशा अंबाड्यावर किंवा पोनीवर मोगऱ्याचा मस्त सुगंधी गजरा असतो…
आजोबांनी आपल्या थरथरत्या हातानी तो माळलेला असतो, आजोबा कडक इस्त्रीच्या शर्ट पॅन्ट मध्ये असतात.
आज्जी सलवार कमीज नाहीतर नाजूक किनार असलेल्या साडीत असतात……
मध्यंतरात एकमेकांचा हात धरून ते हळुहळु बाहेर जातात……
बटाटेवडा खातात…
कॉफी पितात मग परत नाटक पाहायला आत येतात….
नाटक संपलं की एकमेकांना सांभाळत रिक्षातून घरी जातात………
किती रसिक,
म्हातारपण आहे हे….!!


एकदा मिलिंद इगळेच्या गारवा या फेमस गाण्याच्या प्रोग्रामला गेलो होतो,
तर त्या प्रोग्रॅमला निम्याहून अधीक शहामृगाच्या जोड्याच होत्या……
यांना पिकली पानं म्हणणं म्हणजे त्यांच्यांतल्या तरुण मनाचा अपमान करण नाही काय…!
उद्या जर अरजितसिंगच्या गाण्याच्या कार्यक्रमात हे शहामृग दिसले तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही….
पुण्यातले आजीआजोबा अभीं तो,
‘मै जवान हूं’ या मानसिकतेतच राहतात नव्हे तसे जगतात…
माझं काय आता…. वय झालं.
संपल सगळं अस जगणं यांना मान्यच नाही,,,
my God,,,
इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येते कुठून यांच्यात…..

वृथ्दापकाळ असा गोङ असावा ; असे ज्यांना वाटत असेल , त्या पती पत्नींनी त्यांच्यातील नाते – तरुणपणापासूनच जपा . सुखी व्हाल
किती मस्त आहे ना हे शहामृगी प्रेम !!!!!!!!!!!

Leave a Comment