विवाहातील नविन वाढ होत असलेल्या तथा पारंपारिक रूढी व प्रथांविषयी बंदि घालण्यासाठी मराठा समाजाचा ठराव

विवाहातील नविन वाढ होत असलेल्या तथा पारंपारिक रूढी व प्रथांविषयी बंदि घालण्यासाठी मराठा समाजाचा ठराव

आजच्या परिस्थितीत होत असलेल्या विवाहाबाबत विचार मंथन व्हावे असे समाजास वाटत आहे. म्हणून समाजबांधवांच्या मागणीवरून विवाहातील नविन वाढ होत असलेल्या तथा काही पारंपारिक रूढी व प्रथांविषयी समाज प्रबोधनासाठी खालीलप्रमाणे ठराव मांडण्यात येत आहेत. यानुसार सुधारणा व अंमलबजावणी घडवून आणण्यासाठी सुरूवात करावयाची पहिले पाऊल.

ठराव क्र. १ : प्रथेत सुधारणा करणे :

हौसेखातर पारंपारिक विवाह विधीमध्ये वाढ केली जात असून खर्चाचे प्रमाण देखील वाढत आहे. संस्कार व संस्कृतीबाह्य

) प्रीवेडींग (विवाहपूर्वीचे पर्यटन) मुळे अनेक कौटुंबीक समस्या निर्माण होत आहेत. शिवाय विवाहाचे दिवशी दाखविली जाणारी चित्रफित एक विडंबन ठरत आहे.

२) संगीत व मेहंदी रस्म हा विधी केवळ हौस म्हणून नव्याने अनावश्यक वाढविण्यात आला असून यामुळेही खर्चात वाढ झालेली आहे.

३) मुळ लावणे : सोशल नेटवर्कमुळे (मोबाईल) यामुळे मुळ लावण्याची प्रथा बंद व्हावी. फोनवरून सर्वांनी आमंत्रण स्विकारावे तसेच पत्रिका मोबाईल अॅपद्वारे स्विकारली जावे यामुळे खर्चात कपात होईल. तसेच आयोजकांची धावपळ कमी होईल. प्रसंगी रहदारी व अपघाताचे प्रसंग टाळले जातील.

४) आहेर देणे-घेणे : कोणत्याही प्रकारचा आहेर देणे घेणे आज संयुक्तीक वाटत नाही. ही प्रथा पूर्णतः कालबाह्य म्हणून थांबविली जावी.

५) वैदीक विवाह पद्धत बंद करणे :यात देखील वैदीक पद्धत व पारंपारिक पद्धत असा दोनप्रकारे विवाह लावला जातो यापैकी खरा विवाह कोणता ? फक्त दिखाऊपणा, फोटोसेशन, व्हिडीओ शुटींग यासाठीच वाढविण्यात आलेली पद्धत व विधी खर्च यामुळे खर्चात वाढ होत आहे. शिवाय सकाळी मोजक्या नातेवाईकांसह विवाह लावण्यामुळे दुपारी किंवा ‘ सायंकाळी होणारा पारंपारिक विवाह पत्रिकेत दिलेल्या वेळेपेक्षा दोन ते तीन तास उशिराने लावले जातात, त्यामुळे आलेल्या पाहुणेमंडळींना विनाकारण वेठीस धरले व त्यांचा आनंद व उत्साह कमी होत जातो. असे न करता विवाहाचा आनंद सर्वांना घेता यावा यासाठी ठरलेल्या मुहूर्तावरच विवाह लावले जावेत.

तरी कालबाह्य झालेल्या व नविन वाढविण्यात आलेल्या विधी कार्यक्रम

१) प्रिवेडींग २) संगीत व मेहंदी रस्म ३) मुळ लावणे ४) आहेर देणे-घेणे ५) वैदीक पद्धतीने विवाह लावणे ६) उशिराने विवाह लावणे याबाबत वधू-वरांनी ठरवून आई-वडीलांना खर्चात वाढ होणार नाही म्हणून दोन्हीही पक्षाच्या संमतीने याप्रथेस बंद करण्याचा प्रयत्न केला जावा असा ठराव सर्व उपस्थितीतांच्या संगतीने मंजूर करण्याची विनंती आहे.

विवाहातील नविन वाढ होत असलेल्या तथा पारंपारिक रूढी व प्रथांविषयी बंदि
विवाहातील नविन वाढ होत असलेल्या तथा पारंपारिक रूढी व प्रथांविषयी बंदि

ठराव क्र. २ : समाज स्वास्थ्यासाठी प्रदुषण बंदीच्या नियमाचे पालन करणे

विवाहप्रसंगी वाजविले जाणारे मंगलवाद्य कालबाह्य होवून नविन कर्णकर्कश व बधिरता निर्माण करणाऱ्या
वाद्याचा समावेश झालेला आहे. हळद कार्यक्रम प्रसंगी व विवाहाच्या वेळेस वाजविले जाणारे अमर्याद आवाजाचे
डिजे वाद्य तसेच फोडले जाणारे फटाके यांच्यामुळे ध्वनीप्रदुषण व वायु प्रदुषण तर होतेच परंतु याचा विपरीत परिणाम लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती व परिक्षा काळ असेल तर विद्यार्थ्यांच्या आभ्यासावर फार मोठा विपरीत परिणाम होतो यामुळे आपल्या विवाहामुळे समाजास आपण त्रास तर देत नाही ना ?
तसेच नष्ट न होणाऱ्या प्लास्टीकचा वापर होवून पर्यावरणास हानी पोहोचविण्याचे अशुभ काम आपल्या कुटुंबातील शुभकार्याप्रसंगी होणे उचित नाही. याकडे लक्ष वेधून ध्वनी प्रदुषण, वायू प्रदुषण व प्लास्टीक प्रदुषण नियंत्रीत करण्याचा दोन्ही पक्षाकडील आयोजकांनी प्रयत्न करावा असा ठराव आपणा सर्व उपस्थितीतांच्या संमतीने मंजूर करण्याची विनंती आहे.


ठराव क्र ३ : अनाठाई अन्नाची नासाडी थांबविणेबाबत

विवाहाच्या मुहूर्तावर टाळी लावणे म्हणजे वधू-वरांनी एकमेकांना सर्वांच्या साक्षीने जीवनाचा साथीदार

म्हणून स्विकृत करणे होय. वधू-वरांनी एकमेकांना पुष्पमाला परिधान करणे व उपस्थितांनी टाळी वाजवून

स्वागत करणे म्हणजेच टाळी लावणे होय. हा साधा व सोपा विधी आहे. याप्रसंगी अक्षतांचा वापर म्हणजे अन्नाची नासाडी व उधळपट्टी आहे. याऐवजी फक्त टाळी वाजवून किंवा फुलपाकळ्यांनी स्वागत करून शुभाशिर्वाद द्यावेत. तसेच याप्रसंगी आयोजित केलेल्या स्नेहभोजनात फक्त मोजके पदार्थ असावेत अनेक वा विविध

पदार्थामुळे बरेचसे अन्न वाया जाते. मोजक्याच पदार्थांमुळे अन्नाची व खर्चाची बचत देखील होईल. तसेच बुफे जेवणामध्ये अन्नाची बरीचशी नासाडी होते त्यामुळे शक्यतोवर वाढून भोजनाची व्यवस्था करावी. म्हणून दोन्ही पक्षांकडून अक्षता वापर बंदी व मोजक्याच पदार्थाचे भोजन आयोजीत केले जावे असा ठराव आपणा सर्व उपस्थितीतांच्या संमतीने मंजूर करण्याची विनंती आहे.


ठराव क्र. ४ : अवाढव्य व अनाठायी खर्च कमी करणे

विवाह हा एक शुभ संस्कार आहे दोन जीवांचे मनोमिलन आहे. मात्र हा संस्कार समारंभ पार पाडण्यासाठी दिखावूपणा बडजावपणा, व संपत्तीचे प्रदर्शन दाखवण्याचा प्रघात वाढत आहे. यामुळे काही कुटुंबियांना प्रसंगी घर, शेती, प्लॉट व इतर भांडवल विक्री करून विवाह खर्च केवळ कुणाच्यातरी हौसेखातर नाईलाजाने करावा लागत आहे. या खर्चामुळेच आज मुलीच्या जन्मदरात खूप घट झाली असून मोठी समस्या निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागात मुलांचे लग्न थांबले आहेत. मुला / मुलींच्या शिक्षणाचा खर्च सारखाच असतांना लग्नावर करावा लागणारा खर्च सर्व सामान्य कुटुंबास पेलवणारा नाही. परंतु विनाकारण कुणाचेतरी अनुकरण करण्याची जणु प्रथाच तयार झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब कर्जबाजारी झाले आहेत. म्हणून समाजाने वेळीच सावध होवून विवाह कमी खर्चात कसा होईल यावर उपाय म्हणून वर व वधू या दोन्ही पक्षांनी विवाहाच समान खर्च करावा. तसेच विवाहास मोजक्याच मंडळीची उपस्थिती राहिल व विविध अनाठायी कालबाह्य पश्न टाळल्यास कमी खर्चात विवाह करता येईल. खर्चाची बचत झाली तर मुला मुलींच्या भविष्यासाठी मुदत ठेव म्हणून रक्कम गुंतवण्याचा विचार व्हावा यामुळे सर्व सामान्यांना देखील विवाह करणे परवडेल व कुटुंबाची होणारी वाताहत थांबेल. यावर दोन्ही पक्षांकडील आयोजकांनी खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा असा ठराव आपणा सर्व उपस्थितीतांच्या संमतीने मंजूर करण्याची विनंती आहे.


ठराव ५ : घटस्पोटाचे वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी मराठा सेवा संघामार्फत आयोजित केलेल्या समुपदेशन कक्षाचा लाभ घेणेबाबत

विवाहातील नविन वाढ होत असलेल्या तथा पारंपारिक रूढी व प्रथांविषयी बंदि
विवाहातील नविन वाढ होत असलेल्या तथा पारंपारिक रूढी व प्रथांविषयी बंदि

हल्ली लग्नानंतर अगदी महिने दोन महिने तीन महिन्यात अंतर्गत मतभेद, गैरसमज व संशयांमुळे घटस्पोट होण्याचे प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. समाजाच्या दृष्टीने सदरची बाब योग्य नाही विवाह जुळवितांना मुला मुलींची संमती घेणे विवाहपूर्वी त्यांना एकमेकांना समजून घेण्यास पुरेसा वेळ देणे आपल्या प्रतिष्ठेकरता मुलांवर बळजबरीने विवाह करण्यास भाग पाडू नये.

तसेच सर्व उपाय करूनही विवाहनंतर काही दिवसात आपसात दोन कुटुंबात मने कुलुषीत झाल्याने दुरावा निर्माण होत असल्यास प्रोफेशनल समुपदेशक यांच्यामार्फत किंवा मराठा सेवा संघाच्या ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तींच्या समुपदेशक केंद्राच्या माध्यमातून विवाह टिकविण्यासाठी व आपसातील कलह मिटविण्यासाठी प्रयत्न करून पाहिले पाहिजे.

बऱ्याचदा किरकोळ गैरसमजातून अनावश्यक अहंकारांमुळे देखील संबंध दुरावतात पण योग्यरितीने समुपदेशन केल्याने गैरसमज दूर होण्यास मदत होते त्यामुळे समुपदेशन केंद्राचा उपाय करून लग्न व कुटुंब टिकविण्याचा प्रयत्न करावा. असा आपणा सर्व उपस्थितीतांच्या संमतीने मंजूर करण्याची विनंती आहे.

Leave a Comment