विवाह संसार परीस आहे

विवाह संसार परीस आहे

नानाभाऊ माळी

विवाह सुखाचं स्वप्न असतं!गुरफटण्याचं माध्यम असतं!पती-पत्नीने एकमेकांचा आदर- सन्मान देण्याची पवित्र रीत असतें!रेशीम गाठ असतें!वारसाला अधिकारीक जन्म देणारं माध्यम असतं!विवाह संसाराचा मुहूर्त असतो!विवाह बंधन असतं चरित्र्याचं!पावित्र्याचं सुगंधी चंदन असतं!पाप कृतीस स्थान नसतं,शुद्ध चारीत्र्याचा पक्का ठसा असतो!त्यातून संसार वेल वाढत असतें!दोन विश्वासू,श्रद्धाळू मनांचीं वाटचाल असतें,समर्पित भावनांची गुंफण असतें!शरीरासोबत भावनेचीं कदर असतें!भावना जपण्यासाठी त्याग जरुरी असतो! वैवाहिक जीवन शिवार्पित झालं तर शिवमृताचा आनंदिक पेला मुखी असतो!

विवाह म्हणजे सामाजिक सुरक्षितता प्राप्त करणे असतं!!विवाह म्हणजे श्रद्धापूर्वक समर्पण असतं!विवाह म्हणजे पती-पत्नीचं स्थान प्राप्त करणे असतं!एकमेकांनीं मन अन तनानें सामावून घेणे असतं!एकजीव होणे असतं!’स्व’लां समर्पित करणे असतं!माझ्या ऐवजी आपलं होणे असतं!मी ऐवजी आपलं होणे असतं!भवितव्याचं सुंदर स्वप्न पाहाण असतं, साकारासाठी कष्टाची जोड देणे असतं!दिव्यातल्या तेल अन वाती सारखं असत!दोघांनी संसार उजेड देत जगायचं स्वप्न असतं!संसार वेल वाढीचं माध्यम होणे असतं!’ती’ आणि ‘तो’चीं सुंदर मालिका सुरु होणे असतं!योग्य वयात विवाह होणे अत्यंत गरजेचं असतं!

विवाह मानवी जीवनाला आकार देत असतो!विवाह जन्म निर्मितीचं माध्यम असतं!विवाह पवित्र संस्कार असतो!विवाहातून दोन भिन्न श्वास एक होत असतात!विवाह लोक साक्षीनें होत असतो!विवाह लोक मान्यतेने होत असतो!विवाह पावित्र्याचा स्पर्श असतो!विवाह जगण्याचा आधार होत असतो!दोन जीवांच्या विश्वासातून विवाह टिकत असतो!विवाह भिन्न लिंगी आकर्षण असतो!सौंदर्यास पुरुषत्वाचीं ओढ असतें, त्यात विश्वास असतो!विवाह ‘स्व’समर्पित दान असतं!पारंपारीक चालीरीतींनीं विवाह टिकावू असतो!संसार बळकट अन आदर्श होत असतो!

विवाह शीघ्र घेतलेला निर्णय नसतो!विवाह संयमी मनाची कसोटी असतो!विवाहातून सदाचारी व्यक्तिमत्व जन्म घेत असतं!विवाहानें नजर येत असतें!नजरा बदलत असतात!विवाह विकावू नसतो,शिकावू असतो!विवाह दोन मनांची उत्तम सांगड असतें!कधी आनंदाने तर कधी मन मारूनही विवाह तडजोडीने टिकवायचा असतो!विवाह प्राशन केलेलं पवित्र जल असतं!त्यात ईश्वरी नाम असतं!त्यामुळे मन संयमी बनत असतं!म्हणून विवाह संसारी मंथन असतं!

विवाहरुपी पवित्र्य धाग्यांचीं गुफंण घट्ट होत चिरकाल टिकणारी संसार शाल होत असतें!शालितील ऊबदार क्षण विवाह गाठ घट्ट करीत असतात!विवाह आतुरतेला संयमाचा बांध बांधित असतो!ओढ प्रेमाची असतें!प्रेमात डुंबतांना लोकलाज जपत जगणं असतं!नातीगोती सांभाळून जगणं असतं!वैवाहिक शुद्धतेला पती-पत्नीच्या कोमल भावनांनी तोलायचं असतं!विवाह घरं जोडत असतो!माणसं जोडत असतो!घरं सांभाळत असतो!हृदयातले नाजूक अबोल शब्द जपत असतो!

विवाह माहेर-सासरचं नातं जोडत असतो!नव नात्यांचा,भिन्न कुळांचा उद्धार असतो!नव्यांशी नाते जोडत असतो!स्वयंवराची रीत पुरानी, मंगलमय रेशीम गाठ असतो!म्हणून विवाह मुहूर्त असतो!

नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-११ डिसेंबर २०२३


1 thought on “विवाह संसार परीस आहे”

Leave a Comment