छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह

छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह

१७ एप्रिल १६४० 

आनंदाने मनात काही आडाखे बांधून मोठ्या निश्‍चयाने भोसल्यांच्या घरात प्रवेश केला होता.

शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेबांच्या त्यागाकडे जाते .सईबाईराणीसाहेब म्हणजे शिवाजी महाराजांच्या गृहिणी ,सचिव ,सखी व प्रिया होत्या. सईबाई राणीसाहेबांचे स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांशी लग्न झाले होते. दहा वर्षाचे राजे तर सात वर्षाच्या सईबाई राणीसाहेब होत्या. सईबाई राणीसाहेब या आपले दु:ख गिळून दुसर्यांच्या सुखात विरघळणार्या राणी होत्या.त्या अत्यंत शांत ,सोशिक व सामर्थ्यवान होत्या. त्यांचे बालपण फलटणमध्ये नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यात गेल्यामुळे त्या आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात, जिजाऊसाहेबांचे व राजांचे मन सांभाळण्यात समर्थ होत्या.

                 त्यांनी शिवाजीराजांच्या राजकीय, सामाजिक व कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाल दृष्टीने नवे क्षितिज आपल्या नजरेपुढे उभे केले होते. स्वराज्या विषयी कर्तव्य पार पाडण्याचे काम जिजाऊ माँसाहेबांच्या बरोबर सईबाई राणीसाहेबांनी तितक्याच समर्थपणे पार पाडले. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या आपल्या पतीच्या सुखातच त्या आपले सुख मानत होत्या.फलटणचे रघुनाथराजे नाईक निंबाळकर (पिटुबाबा )म्हणतात “शिवाजीमहाराज राम असतील तर सईबाई राणीसाहेब सीता असतील, जर शिवाजीमहाराज विष्णू असतील तर सईबाई राणीसाहेब लक्ष्मी असतील, जर शिवाजी महाराज शंकर असतील तर सईबाईराणीसाहेब पार्वती असतील इतके घट्ट प्रेम या दोघांचे होते.”  

             छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई साहेब यांच्या विवाहाने राजमाता जिजाऊसाहेब कृत्य कृत्य झाल्या व नाईक निंबाळकर आणि भोसले यांचे नातेसंबंध आणखीनच दृढ दृढ झाले.


            लेखन ✒️   
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर ,पुणे ( इतिहास अभ्यासक)
संदर्भ शिवपत्नी महाराणी सईबाई



छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह
छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह

Leave a Comment