मराठी उखाणे

मराठी उखाणे

अनेकांनी लिहीली काव्ये, गायली सौंदर्याची महती काल होते युवती आज झाले …. ची सौभाग्यवती

सर्वांच्या आग्रहाखातर भरवते पुरी श्रीखंड

मराठी उखाणे
मराठी उखाणे

……च्या साठी मी सोडून चालले आशियाखंड.शारदेने छेडली सतार, मधुर उमटले झंकार

….चं सौभाग्य हाच माझा अलंकार.सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले

…… चे नाव घ्यायला सर्वांनी अडवले.झाले लक्ष्मीपूजन कृपा असो लक्ष्मीची

…… आणि …. सुखी राहो हीच आस मनीची.महादेवाच्या पिंडीवर बेल वहाते वाकून

….. चं नाव घेते सर्वांचा मान राखून.रूसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास

ला भरवतो मी जिलबीचा घास.पेटी वाजे वीणा वाजे सतार वाजे छान

……..चं नाव घेते सर्वांचा राखून मान.दत्ताच्या देवळात धुपाचा वास

…..ला भरवतो मी लाडूचा घास.श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य

……. आणि माझ्या संसारात होईल तुमचे आदरातिथ्यगाण्याच्या भेंडयांचा मूड आहे खास

……..ला भरवतो मी जिलबीचा / लाडूचा घास.सासरच्या कौतुकात राहिले नाही काळाचे भान

……..चं नाव घेते सर्वांचा राखून मान.सुखाचा होतोय इतका वर्षाव सत्य नव्हे की हा आहे हा भास

सत्यप्रचितीसाठी भरवते ….. ला ………. चा घास.शंकराची पूजा करते पार्वती खाली वाकून

……..चं नाव घेते सर्वांचा मान राखून.पंगतीत दरवळतो उदबत्तीचा सुवास

…………… ना भरवते मी ….. चा घास.राम गेले वनात, राज्य दिले भरता

….. चं नाव घेते सर्वांच्या करिता.दवबिंदूत होतो सप्तरंगाचा भास

………. ना भरवते मी ….. चा घास.शिवाजीला जन्म देणारी धन्य जिजाऊमाता

…… रावांचं नाव घेते आपल्या शब्दाकरिता.उटी, बंगलोर, म्हैसूर म्हणशील तेथे जाऊ

….तुला घास भरवतो पण बोट नको चाऊ.हरिश्चंद्र राजा, तारामती राणी, रोहिदास पुत्र

………… च्या नावाचे घातले मंगळसूत्र.जाई-जुईच्या फुलांचा मधुर सुटतो वास

……….. ला देते मी ….. चा घास.जीवनात ही घडी अशीच राहू दे

……….. ची प्रीत सदैव अशीच फुलू दे.भाद्रपद महिन्यात गणपती बसवतात शाडूचा

……… ला घास देतो / देते लाडूचा.माहेरचे निरांजन सासरची वात

……… चे नाव घेऊन करते संसाराला सुरूवात.कृष्ण-कन्हैयाला लागला राधेचा ध्यास

Khandeshi Marriage खान्देशी लग्न
Khandeshi Marriage खान्देशी लग्न

मराठी उखाणे

………. ना भरवते मी ….. चा घास.भाजीत भाजी मेथीची

……. माझ्या प्रितीची.भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची

…ला घास देते पंगत बसली मित्रांची.एका वाफ्यातली तुळस दुस-या वाफ्यात रूजवली

……… ची सारी माणसे मी आपली मानली.अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा

….. रावांना घास भरवते वरण भात तुपाचासडारांगोळीने सुशोभित केले आहे अंगण

……. चं नाव घेऊन सोडते मी कंकण.अंबाबाईच्या देवळात बिलवरी आरसा

…. ना घास घालते अनरसानिळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान

……..चं नाव घेते सर्वांचा राखून मान.कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास……….

ना भरवते मी ….. चा घास.पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता

……चं नाव घेते तुम्हाकरितासुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास

………. ना भरवते मी ….. चा घास.मंगळसूत्राच्या दोन वाटया सासर आणि माहेर

……………. नी दिला सौभाग्याचा आहेर.लग्नासारख्या मंगळदिनी कोणी नका रागावू नि रुसू

…….. ना घास भरवताना मला येते गोड हसू.आई-वडिल आहेत प्रेमळ, सासू सासरे आहेत हौशी

……. चे नाव घेते लग्नाच्या दिवशीभरलेल्या पंगतीत रांगोळी काढली मोरांची

……… ना घास देते पंगत बसली थोरांची.शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी

………. चं नाव घेते बारशाच्या दिवशी.हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी

….चं नाव घेते … च्या बारशाच्या दिवशी.मावळला सूर्य उगवला शशी

…… चं नाव घेते …… च्या दिवशीकोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी

….चं नाव घेते … च्या बारशाच्या दिवशी.शंकर-पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज

…… चं नाव घेते गौर बसली आज.नीलवर्ण आकाशात चमकतो शशी

….चं नाव घेते … च्या बारशाच्या दिवशी.गौरीपुढे हळदी-कुंकवाच्या राशी

….. चं नाव घेते चैत्रमासी.बनारसी शालूला आहेत जरतारी काठ

… च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.हिरवं लिंबू गारसं

… रावांच्या बाळाचं आज बारसं.नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण

… चं नाव घेते बारशाचं कारण.चांदीच्या वाटीत रूपये ठेवले साठ

…. चं नाव घेते केला डोहाळेजेवणाचा थाट.दशरथ राजानं केला पुत्रासाठी नवस आज

… च्या मुलाच्या बारशाचा दिवस.चांदीच्या भांडयांना असावा नाशिकचा घाट

……. चं नाव घेते …. च्या डोहाळेजेवणाचा थाट.सासूबाई आहेत प्रेमळ वन्स आहेत हौशी

…….. चं नाव घेते डोहाळेजेवणाच्या दिवशी.

Marathi Wedding Photos
मराठी उखाणे

Leave a Comment