लग्न म्हणजे नेमके काय?

लग्न म्हणजे नेमके काय?

लग्न’ हे सुंदर जंगल आहे जिथे ” बहादुर वाघांची ” शिकार मोहक हरिणी करतात !!

लग्न म्हणजे “अहो ऐकलंत का ?” पासुन ते “बहिरे झालात की काय ??” पर्यंतचा प्रवास .!!

लग्न म्हणजेच “तुझ्यासारखे या जगात कुणीच नाही” पासुन “तुझ्या सारखे छप्पन बघीतलेत” !! पर्यंतचा प्रवास

लग्न म्हणजे “तुम्ही राहु द्या” पासुन ते “मेहरबानी करून तुम्ही तर राहुच द्या” पर्यंतचा प्रवास

लग्न… म्हणजे “कुठे होती ग माझी राणी” पासुन तर “कुठे मेली होतीस” पर्यंतचा प्रवास

लग्न म्हणजेच “तुमचे नशीब मी भेटले तुम्हाला” पासुन ते “मेलं माझंच नशीब फुटकं, तुम्ही मला भेटलात” पर्यंतचा प्रवास

थोडक्यात काय तर

वैवाहिक जीवन हे कश्मीर सारखे आहे! सुंदर तर आहेच, परंतु आतंक पण आहे

लग्न म्हणजे काय असत ?

लग्न म्हणजे काय असत ?

त्याच्या मनातील विचारांचे, तिच्या चेहर्यावरच प्रतिबिंब असत !

तिच्या प्रश्न आधी त्याच उत्तर तयार असत !

लग्न म्हणजे काय असत ?

तिने चहा केला तरी त्याला सरबत हव असत, त्याने गजरा आणला कि, नेमके तिला फुल हव असत !

लग्न म्हणजे काय असत ?

त्याच्या बेफिकीरीकारिता तिच्या जाणिवांच कोंदण असत,

त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरून असत !

लग्न म्हणजे काय असत ?

कधी समझोता तर कधी भांडण असत, तोच चिडला तरी तिने शांत राहायचं असत, कपातल्या वादळाला चहासोबत संपवायचं असत !

लग्न म्हणजे काय असत ?

प्रेमच ते बंधन असत, कधी दोन मनाचं मिलन असत, तर कधी दोन जीवनच भांडण असत !

लग्न म्हणजे काय असत ?

घरच घरपण असत,

एकाने विस्कटले तरीही दुसर्याने ते सावरायचं असत , विध्यात्यला पडलेले ते एक सुंदर स्वप्न असत !

लग्न

लग्न म्हणजे काय असतं

दोन जीवांचा मेळ असतो

राजा राणीचा मांडलेला…

भातुकलीचा खेळ असतो

लग्न म्हणजे…..

एक अशी रेशीम गाठ

जशी सोनेरी किरणांची पहाट

कडू आणि गोड क्षणांची लाट

जन्मभर समजूतदारपणाची साथ

म्हणतात मुलीचं घर सोडणं

तिच्यासाठी खूप अवघड असतं

पण आपल्या जगात दुसऱ्याला आणणं

हे मुलांसाठी पण सोपं नसतं

हल्ली लग्न पद्धती बदल्या असतील

पण लग्नाचा अर्थ नाही

मग ठरवून झालं किव्हा प्रेमविवाह

त्याने फरक पडत नाही

मंगलअष्टकाचा गुंज झाला

जुळून आले नाते प्रेमाचे

दोघांच्या सुखी संसारासाठी

टाका आशीर्वाद अक्षताचे

लग्न म्हणजे……

एकमेकांना एकमेकांचा वेळ

आपुलकी आणि स्नेहाने भरलेला

दोन कुटुंबाचा मेळ

लग्न फक्त पाहिलं तर अर्धवट वाटतं

केलं कि सोपं वाटते अनुभवलं कि अवघड वाटतं

आणि जर ते निभावलं तर संपूर्ण वाटतं

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर

लग्न म्हणजे आयुष्य आयुष्य म्हणजे रुसवे फुगवे

रुसवे फुगवे म्हंटल कि समजुदारपणा

समजुदारपणा आला कि काळजी

सप्तसदीचे सात पाऊले

वचने देखील सात

प्रत्येक बचना सोबत

दोघांना एकमेकांची साथ

What exactly is marriage?
लग्न म्हणजे नेमके काय?

Leave a Comment