लव्ह मॅरेज Vs अरेंज्ड मॅरेज
Love Marriage Vs Arranged Marriage
लव्ह मॅरेज म्हणजे पुष्कळ दिवस प्रेम..
लव्ह मॅरेज म्हणजे पुष्कळ दिवस प्रेम.. आणि एक दिवस लग्न !
अरेंज्ड मॅरेज म्हणजे .. एक दिवस लग्न आणि पुष्कळ दिवस प्रेम !
लव्ह मॅरेज म्हणजे .. लग्नाआधी हातात हात घालून फिरायचे
अरेंज्ड मॅरेज म्हणजे.. चुटपुटत्या स्पर्शासाठी झुरायचे !
लव्ह मॅरेज म्हणजे .. रोज हॉटेलात एकमेकांची संगत ..
अरेंज्ड मॅरेज म्हणजे .. साऱ्यांसवे व्याही भोजनाची पंगत !
लव्ह मॅरेज म्हणजे .. जणू सारा तरुणाईचा खेळ ..
अरेंज्ड मॅरेज म्हणजे.. थोरामोठ्यांनी घडवून आणलेला मेळ !
लव्ह मॅरेज म्हणजे .. रोज घ्यायच्या नव्या आणा भाका..
अरेंज्ड मॅरेज म्हणजे .. उगा नाही मारायच्या थापा !
लव्ह मॅरेज म्हणजे .. तुझे तूच वाढून घे ताट ..
अरेंज्ड मॅरेज म्हणजे .. यांची बघायची जेवायला वाट !
लव्ह मॅरेज म्हणजे .. कल्पनेतली कविता असते छान ..
अरेंज्ड मॅरेज म्हणजे .. नेहमी वास्तवाचे असते भान !
प्रेम असेल जर क्षणिक .. तर लव्ह मॅरेजही तुटतातच ..
सांभाळून घेतले एकमेकांस .. तर अरेंज्ड मॅरेजही टिकतातच !
लग्न त्यात पोरींच्या अपेक्षांनी आडवं येतय
वय झालं तरी अजून जमत नाही लग्न
त्यात पोरींच्या अपेक्षांनी आडवं येतय विघ्न
काय तर म्हणे ..
“व्यावसायिक नको नोकरीवाला पाहिजे
पगार त्याचा सरकारी पाहिजे
काळा नको गोरा गोरापान हवा
सगळ्या बाबतीत कोरा करकरीत नवा
कुणाचा डिस्टर्ब नको जेव्हा गाईन गाणी
गर् गर् फिरणारा जो असेल भवरा
माझ्या तालावर नाचेल तोच करीन नवरा.”
संख्या कमी म्हणून मुलींचा रूबाब वाढलाय
आधीच्या पिढीचा राग त्यांनी आमच्यावर काढलाय
आमच्यासाठी आईबापानी मारल्या पोटातच मुली
सांगा आता कशा पेटतील आमच्या संसारात चुली
घरा पेक्षा दोन ताळी माडी दारात
त्याच्या चार चाकी गाडी खेड्या ऐवजी शहरात
असावा सासू सासऱ्याचा थोडाही त्रास नसावा
तो असेल राजा मी होईल राणी