मुला मुलींची लग्न जमणे अवघड अन टिकणेही मुश्कील

मुला-मुलींची लग्न जमणे अवघड अन टिकणेही मुश्कील

एकविसाव्या शतकातील गंभीर समस्या

बदलती मानसिकता
दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र रहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही, असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे.

सामाजिक बदल
आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते.

बदलती जीवनशैली
सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे. त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याचीअजिताब तयारी दाखवली जात नाही.

संवाद कमी
टीव्ही, मोबाइल,व्हॉटस्अप, फेसबुक यांच्या सतत वापरामुळे पती-पत्नचे एकमेकांबारेवरचे संवादच कमी झाले आहेत. पती- पत्नीच्या मोबाईलवरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद होत नाही तर वादच वाढत जातात

पालकांचा हस्तक्षेप
मुलीच्या सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो. आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलांचे आई-वडील सतत लक्ष घालतात.

अहंकार
पती पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदल ावे, मी बदलणार नाही अशा अहंकारामुळे नातेवाईकांमध्ये तणाव निर्माण होतो.

इतर कारणे
एकमेकांबाबत गैरसमज / संशय, व्यसन, दुसऱ्याला त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारिरीक व मानसिक आजार आदी कारणांमुळे समस्या निर्माण होतात.

उपाययोजना

कुटुंब टिकविता येते
मेड फॉर इच अदर.. या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात. ते अवघड व अशक्य असते. परंतु मोल्ड फॉर इच आदर कारयचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात

मनमोकळा संवाद
पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतूक करणे, ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दात मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.

स्पर्धा टाळावी
पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी अशी स्पर्धा टाळावी, तू माझ्या आईवडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीत, आता मोही तुमच्या आई, वडिलांशी, नातेवाईकांशी चांगली वागणार नाही.

स्वीकार महत्वाचा
अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही, तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.

बदल करण्याची तयारी
मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.

जबाबदारीची जाणीव
लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टीकोनांमध्ये बदल करावेत.

तडजोडीची तयारी
कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच; पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.


थोडक्यात Marathi Matrimonial

आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही. पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होईल Maratha Matrimony

प्रा. किरण पाटील
मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशक

Leave a Comment