लवकर लग्न न जमण्याची काही प्रमुख कारणे

लवकर लग्न न जमण्याची काही प्रमुख कारणे


● एखादे स्थळ चालून आले आहे त्वरित प्रतिसाद न देणे.

● स्थळ पाहून झाल्यावर स्वतः काही न कळवता दुसऱ्याच्या उत्तराची वाट पाहणे.

● होकार /नकार कळविण्यात टाळाटाळ किंवा विलंब करणे.

● फोन आला असता -“मग सांगतो,विचारून सांगतो” असे म्हणून आशा लावून ठेवणे.म्हणजेच त्या स्थळाला दुसरीकडे जायला वाट करून देणे.

● वधू-वर केंद्राकडून कित्तीही बायोडाटे आले तरी आणखी काही नविन येताहेत कां ? याची वाट पहात राहणे.

● सगळं जुळत असतानाही याही पेक्षा आणखी कुठं चांगल स्थळ असेल कां…? हा शोध चालू ठेवणे.

● क्षुल्लक बाबींचा दोष काढणे. रंग’ उंची, पगारातील तफावत, शेती नाही आदी कारणे पुढेे करून जमवण्यापेक्षा फिस्कटवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे.

● अनेक वेळा अनेक फोटो मागवणे,प्रत्यक्ष मुलगा / मुलगी न पाहाता फोटोवरून रंग,चेहरा,बांधा, स्वभाव याचा ( खोटा )अंदाज बांधणे.

● प्रत्यक्ष भेट देवून पाहाणे, समक्ष मुलगा-मुलगी त्यांचे कुटुंबिय ह्यांच्याशी भरपूर बोलणे. वय,शिक्षण, नोकरीचे ठिकाण इ.बाबीकडे जातीने लक्ष न देता भलत्यानांच फोन करुन माहित्या काढणे, स्वतः घर सोडणे नाही.

● रजा नाही, वेळ नाही अशा अनेक सबबी साांगत चालून आलेले हातचे स्थळ घालवणे. पैं-पाहूण्यांच्या लग्नाला मात्र हजर तिथं मात्र अंदाज पंचे शोध सुरू.

● पालकांनी बऱ्याच वेळा फोन बंद ठेवणं, लवकर फोन न उचलणं, स्वतः पुन्हा फोन न लावणं.

● स्थळाची पसंती करणारे प्रमुख घटक म्हणजे;दोन्ही कडील आई,वडील,मुलगा व मुलगी आणि कुटुंबातील काही घटक.यांंनी सर्व चौकशी करुन विवाह निश्चिती करण्या ऐवजी अनेकांना बघण्यासाठी पाठवणे त्या बघ्या मंडळीवर अधिक विश्वास ठेवणे.

● मुलगी पहाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मुलगा व मुलीस आपसात संवाद साधणेसाठी काही अवधी देण्यास टाळाटाळ करणे.

● मुला-मुलीच वय अधिक वाढत असतांनाही बिनधास्तपणे राहाणे, मिळतात अशीसुद्धा स्थळं अशा फुशारक्या मारणे.लग्न जमविताना वय महत्व असते बाकी अपेक्षा दुय्यम.

● मुलां-मुलींनी वेगळ्याच विश्वात रममाण राहाणं. करिअरच्या नादात विवाह लांबणीवर टाकणं. वय वाढतं, सौंदर्य घसरू लागते. तब्बेत पसरू लागते. किंवा घटू लागते.वय वाढल्यावर काहीही पत्करण्यापेक्षा योग्य वेळेत निर्णय घ्यावा.

● कुटुंबातील व्यक्तीनी आपलं पद, प्रतिष्ठा, पैसा ह्यांची तुलना येणाऱ्या स्धळांबरोबर करणं.

● पत्रिका पाहाताना खूप खोलात शिरणे. चांगलं असलं तरी दोषच दिसतात. इतर ठिकाणी पत्रिका न तपासता पटकन नकार देणं, आता सगळ्यानांच सगळे ग्रह विशेषतः मंगळ कळायला लागलाय.पालकांच्या लग्नावेळी असं होत कां…? जन्म तारखा खऱ्या होत्या कां…?

● विवाह ठरत आला असतानाच कुठून तरी काहींतरी विपरित किंवा अफवा कळताच त्या बाजूच्या माणसांना भेटून खरं खोटं शहानिशा न करताच पटकन नकार देणे.

● वधू-वर,पालक मेळाव्यांना उपस्थित न राहाणे. वधू-वर सुचक केंद्राकडून स्थळांची यादी ,फोटो उपलब्ध होतात मात्र संपर्क करण्यास टाळाटाळ करणे, नको त्या कारणास्तव विलंब करणे. मुुला-मुलींच्या पालकांना एवढेच सांगणे आहे की, तुम्ही स्वतः थोडा पुढाकार घेणे गरजेचे आहे. स्वतःतील मी पणा व अहंमपणा बाजूला केला की सर्वकाही समस्या दुर होतील.

● मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या अपेक्षा कमी कराव्यात, काहीतरी तडजोड करुन कुठेतरी थांबायला शिकावे…!! कुणी फोन करून चौकशी केली तर एकमेंकाना झुलवत ठेवण्यापेक्षा जे कारण असेल ते स्षष्ट सांगावे.संसारात सगळ्याच गोष्टी मनासारख्या मिळत नाही. काहीतरी डावं उजवं होतच.

विचार खूप बदलले,थोडंस कुशलतेने काम करा,नशीब सुद्धा बदलेल

2 thoughts on “लवकर लग्न न जमण्याची काही प्रमुख कारणे”

Leave a Comment