दारू पिणाऱ्यांशी आपल्या मुलीचा विवाह करू नका केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर

दारू पिणाऱ्यांशी आपल्या मुलीचा विवाह करू नका केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर

माझ्या मुलाचा दारूच्या व्यसनापायी मृत्यू झाला. त्याला आम्ही वाचवू शकलो नाही. आमच्या कुटुंबातील हा अनुभव लोकांनी लक्षात घ्यावा. दारूचे व्यसन असलेल्या मुलाशी माता-पित्यांनी आपल्या मुलीचा विवाह करू नये असे कळकळीचे आवाहन केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर यांनी लोकांना केले आहे.

एका कार्यक्रमात ते म्हणाले की, दारुचे व्यसन असलेल्या सरकारी अधिकाऱ्यापेक्षा निर्व्यसनी असलेला एखादा रिक्षाचालक किंवा मजूर चांगला जीवनसाथी ठरू शकतो. मद्यपी माणूस खूप कमी काळ जगतो. माझा मुलगा आकाश किशोर याला त्याच्या मित्रांमुळे दारूचे व्यसन लागले. मी खासदार व माझी पत्नी आमदार असूनही आम्ही त्याचा जीव वाचवू शकलो नाही. आमची ही कथा तर सामान्य माणसांचे किती हाल होत असतील याचा विचार करा. देशात व्यसनांमुळे दरवर्षी २० लाख लोकांचा मृत्यू होतो.

२ वर्षांच्या मुलाने काय करायचे?
आपल्या मुलाबद्दल बोलताना कौशल किशोर भावुक झाले. ते म्हणाले की, माझा मुलगा आकाशचे दारूचे व्यसन सुटेल या आशेने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. त्याचे लग्न लावून दिले. पण लग्नानंतर तो पुन्हा दारू प्यायला लागला, दोन वर्षापूर्वी आकाशचा मृत्यू झाला त्यावेळी त्याचा मुलगा फक्त दोन वर्षांचा होता.

Leave a Comment