लग्न समारंभात सैनिकांचा सन्मान

लग्न समारंभात राजकीय नेत्यांचा नाही तर सैनिकांचा सन्मान

निमगुळ

बहुतेक वेळा आपण पाहत असतो लग्न समारंभ असो की इतर समारंभ त्यामध्ये राजकीय नेत्यांना बोलावून त्यांचा फुलहार शाल श्रीफळ देऊन सत्कार केला जातो परंतु धुळे तालुक्यातील निमगुळ येथे एका वधु पित्याने गावातील तमाम भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त माजी सैनिकांचा मुलीच्या विवाह प्रसंगी सन्मान केला .

https://youtu.be/97msPhgY2ME?si=IIAuad3OzPEjDxu0
लग्न समारंभात सैनिकांचा सन्मान

आदर्श लग्न पध्दत

आदर्श लग्न पध्दत निमगुळ येथील प्रगत शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री मोहन सोनवणे यांनी आपल्या लाडक्या मुलीच्या विवाह प्रसंगी गावातील सर्व माजी सैनिक श्री पांडुरंग दत्तू मोरे श्री  संजय भिकन चव्हाण श्री अरुण पुंडलिक चव्हाण श्री विजय बुधा देसले श्री संजय काशिनाथ शिंदे श्री शांताराम हिम्मत मोरे श्री अशोक चिंधा सूर्यवंशी श्री दीपक धनराज बोरसे श्री प्रवीण भिकन चव्हाण श्री आबा दशरथ सोनवणे श्री शरद नारायण निकम श्री शांताराम अभिमन अहिरे श्री दादाभाऊ लोटन पवार श्री दिलीप निंबा देवरे कु. प्रवीण विजय मोरे.

लग्न समारंभात सैनिकांचा सन्मान
लग्न समारंभात सैनिकांचा सन्मान

लग्न समारंभात सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार वितरण

प्रा. वंदनाताई पाटील सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित यांना एक स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करून गावात एक नवीन आदर्श निर्माण केला . सर्व माजी सैनिकांनी गावात मोहन सोनवणे यांच्या द्वारे मिळालेला सन्मान नंतर आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की खरे तर प्रत्येकाला वाटते की माझ्या गावात माझा सन्मान व्हावा आणि तो पूर्ण गावाने पहावा.

आपल्या लोकांसमोर मिळालेला सन्मान अमूल्य

बाहेर कितीही मोठा सन्मान झाला तरी तो आपल्या लोकांसमोर नसतो आणि आपल्या गावात आपल्या लोकांसमोर मिळालेला सन्मान हा इतर कोणत्याही सन्माना पेक्षा मोठा असतो .आपल्या लाडक्या मुलीच्या शुभ विवाह प्रसंगी सर्व माजी सैनिकांचा सन्मान समारोह आयोजित करून मोहन सोनवणे यांनी एक नवीनच आदर्श निर्माण केल्या त्या बद्दल मोहन सोनवणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विवाह समारंभ नाही तर संस्कार म्हणून साजरा करा

2 thoughts on “लग्न समारंभात सैनिकांचा सन्मान”

Leave a Comment