लाडकी लेक योजना
भातखंडे ग्रामपंचायतीतर्फे ‘लाडकी लेक’चा लाभ
विवाह सोहळ्यात नववधूला भेटवस्तु.दहा हजारांच्या संसारोपयोगी भांड्यांची भेट; अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांमधून कौतुक
भातखंडे बुद्रुक ग्रामपंचायत लाडकी लेक योजना
भातखंडे बुद्रुक (ता. भडगाव) ग्रामपंचायतीने सुरू केलेत्या ‘लाडकी लेक’ योजनेचे पंचक्रोशीत सध्या कौतुक होत आहे. या योजनेंतर्गत गावातील मुलीच्या लग्नात नववधूला दहा हजार रुपयांची संसारोपयोगी भांडी भेट म्हणून दिली जात आहेत. भातखंडे ग्रामपंचीयतीने ही योजना राबविण्याचा नुकताच ठराव करुन घेतला.
विवाह सोहळ्यात नववधूला भेटवस्तु देण्यात वधुच्या वडिलांना किमान आर्थिक मदत हा उद्देश
विवाह म्हटला, की वधुच्या वडिलांना बरेच सोहळे पार पाडावे लागतात. अनेकदा लग्नातील अवाढव्य खर्च न पेलवणारा असतो. त्यात बस्ता, मूळ लावणे, सोने, जेवण, मंडप, घोडा, बॅन्ड, परतीचा आहेर आर्दीसाठी मोठा खर्च करावा लागतो. अशा खर्चिक मंगल कार्यात गावाचाही खारीचा वाटा असावा व वधुपित्यास किमान काही ना काही मदत व्हावी, या उद्देशाने ‘लाडकी लेक’ ही योजना सुरू केल्याचे सरपंच किरण पाटील यांनी सांगितले.
यासाठी सरपंच किरण पाटील व उपसरपंच राहुल सोनवणे यांनी पुढाकार घेऊन हा ठरावच सर्वानुमते संमत करुन घेतला.त्याला ग्रामपंचायतीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी मान्यता देऊन या योजनेचे स्वागतही केले.
लाडकी लेक योजनेच्या लाभार्थीसाठी पात्रता
ज्या मुलीचे लग्न आहे. तिचे आई-वडील भातखंडे गावचे रहिवासी असावेत. मुलीने कुटुंबातील सदस्यांच्या मान्यतेने विवाह केलेला असावा. मुलीच्या वयाचा दाखला व लग्नपत्रिका ग्राम प्रशासनाला सादर करणे बंधनकारक असेल. या योजनेमुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करुन नवनियुक्त ग्रामपंचायतींच्या सर्व पदाधिकान्यांचे कौतुकही केले जात आहे.
विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप
यासोबतच गावातच शिक्षण घेणाऱ्या पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप देखील ग्रामपंचायतीतर्फे केले जाणार आहे. त्यासाठी लागणारा पैसा ग्रामनिधी फंडातून खर्च करण्याची तरतूद व नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे. इतरही गावांनी भातखंडे ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाची प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या या माहेरच्या भेटीमुळे मुलीला आपल्या ग्रामपंचायतीची सदैव आठवणही यानिमित्ताने राहणार आहे. गावातील भावी वधूसह त्यांच्या पालकांमधून या अभिनव योजनेचे कौतुक होत आहे.
विवाह सोहळ्यात नववधूला संसारोपयोगी भांड्यांची भेट
येथील शांताराम पाटील व विजया पाटील यांची कन्या रोहिणी हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या योजनेच्या रोहिणी या पहिल्या लाभार्थी ठरल्या, त्यांना ग्रामपंचायतीचे सदस्य प्रा. योगेश पाटील, विकास सोसायटीचे संचालक कैलास पाटील, सरपंच किरण पाटील, उपसरपंच राहुल सोनवणे, महेंद्र सोनवणे, अनिता पाटील, गायत्री पाटील, निकिता महाजन, अर्चना महाजन, संगीता पाटील, मुकुंदा गायकवाड व सदस्यांनी संसारोपयोगी भांडी प्रत्यक्ष लग्नात जाऊन भेट दिली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामसेवक चंद्रकांत सोमवंशी यांच्यासह पदाधिकारी व कर्मचान्यांचे सहकार्य लाभले.
![विवाह सोहळ्यात नववधूला भेटवस्तु 2 विवाह सोहळ्यात नववधूला भेटवस्तु](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2024/03/inshot_20240312_142614676281295553705663516248484.jpg?resize=900%2C505&ssl=1)
1 thought on “विवाह सोहळ्यात नववधूला भेटवस्तु”