लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
अवघाची संसार
सकाळचा सहाचा गजर झाला. आणि प्रिया जागी झाली. खरे तर तिला रात्री झोपच आली नव्हती. कारण ही तसेच होते. दुसऱ्या दिवशी ची रम्य सकाळ तिच्यासाठी खास आनंद घेऊन येणार होती. आज तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. आजच्या दिवशीच म्हणजे एक मे रोजी तिचे प्रविणशी अतिशय थाटामाटात लग्न झाले होते.
तिच्या आई वडिलांनी कशाची म्हणून कसर ठेवली नव्हती. खूप हौस मौज केली. होती. कां नाही करणार प्रिया होतीच तेवढी लाडाची. तर या प्रिया प्रविणची लग्न गाठ बांधून आज एक वर्ष झाले होते. प्रविण व्यवसायाने डॉक्टर होता. तर प्रिया गृहिणी. प्रविण शहरातील एका मोठ्या हाँस्पिटल मध्ये डाॅक्टर होता. शहरात प्रविण ने एक छोटासा बंगला विकत घेतला होता. तिथे हे दोघेच राहत होते. दोघांचा अगदी राजा राणी चा संसार होता. खुप प्रेम होते त्यांचे एकमेकांवर.
आणि आता लवकरच त्यांच्या घरी नवीन पाहुणा येणार होता. त्यामुळे दोघे ही खुप आनंदात होते. सातवा महिना लागला असल्याने प्रियाचे डोहाळे जेवण करण्याचे तिच्या आई वडिलांनी योजले होते. त्यासाठी आणि नंतर बाळंतपणासाठी तिला माहेरी नेण्यासाठी ते लवकरच शहराला येणार होते.पण….
सध्या प्रियाच्या तब्बेतीने कूरबूर काढल्या होत्या. अशक्तपणा होता. प्रविण आॅर्थोपेडीक डॉक्टर असल्याने त्याच्या वर हाॅस्पिटलमधे खूप प्रेशर होते. अत्यवस्थ रूग्णांची सेवा करत होता. हाँस्पिटल ने त्याची सोय कामाच्या ठिकाणीच वरच्या मजल्यावर केली होती. गेली कित्येक दिवस तो घरी पण गेला नव्हता. हाँस्पिटल त्याचे घर झाले होते. दिवस रात्र तो तहान भुक विसरून आय.सी.यू. मधील रूग्णांची सेवा करित होता. प्रिया बरोबर हि त्याचे बोलणे क्वचितच होत असे. त्यामुळे ती खुप काळजीत असायची. आणि राजाराणीचे स्वतंत्र राहणीमान त्यामूळे कूणी मदतीला नव्हते.
हाॅस्पिटलचे वातावरण संसर्गजन्य असल्याने तिला प्रविणची खुपच काळजी असायची. तिचे आणि प्रविण चे ही आई वडील वयोमानामुळे गावाहून शहराला प्रियाकडे येऊ शकत नव्हते.
ते प्रियाला फोन करुनच तिची समजूत घालत असत. प्रियाचे डोहाळे जेवण करण्याचे पण आता रहित झाले होते. तिचे मन काही शांत होत नव्हते. सारखे वेडेवाकडे विचार तिच्या मनात येत असत. दिवसभर ति प्रविण च्या फोन ची वाट बघत असे. त्याच्याशी बोलणं झाले कि तिला बरं वाटत असे. प्रियाला आताच हाँस्पिटल मध्ये शिफ्ट करण्याचे प्रविण ने योजले होते. तसे तो त्यांच्या गायनाक्लाँजिस्ट शी बोलला पण होता.
आणि आज त्याचा फोन येतो . उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना मी नक्की येईल तुला भेटायला. प्रविण ने असे म्हणताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. खरं तर तिने प्रविण आपल्याला लग्नाच्या वाढदिवशी सुद्धा भेटणार नाही म्हणून स्वतः च्या मनाची समजूत घातली होती. पण जेव्हा तो म्हणाला की मी उद्या येतो तुला भेटायला तेव्हा. तिला काय करू आणि काय नको असे झाले होते. खूप आनंद झाला होता तिला. एवढ्या व्यस्त शेड्युल मधून सुद्धा प्रविण आपले मन जपत आहे म्हणून ती मनोमन सुखावली होती.
१ मे चा दिवस उजाडला आणि प्रिया ची धावपळ सुरू झाली. प्रविण च्या आवडीची प्रत्येक डीश ती बनवणार होती. आमरस पुरी चा झक्कास बेत आखला होता तिने. तसेच एक छोटासा केक ही ती बनवणार होती. तोही प्रविण च्या आवडीचा चाँकलेट फ्लेवर चा. सकाळ पासून नातेवाईक मित्र मैत्रिणी यांचे शुभेच्छांचे फोन मेसेजेच सुरू झाले होते. प्रविण येणार आहे हे तिने सगळ्यांना सांगितले होते. आणि आपण काय काय करणार आहोत हे ही सांगायला ति विसरली नव्हती.
प्रविण दुपारी २ वाजता येणार होता. तो पर्यंत तिला सगळा स्वयंपाक करायचा होता. केक बनवायचा होता. घरात जे उपलब्ध आहे त्या सामानातुनच तिने हाँल सजवला होता. हे सगळं तिने एकटीनेच केले होते. या अवघडलेल्या स्थितीमध्ये खरतर तिला खुप दमल्यासारखे झाले होते. प्रविण ने तिला काही ही करु नकोस मी फक्त तुला भेटायला येणार आहे म्हणून निक्षून सांगितले होते. पण प्रिया वेगळ्याच दुनियेत वावरत होती.
ती सकाळपासून आपल्या लग्नाचा वाढदिवस अतिशय छान पैकी साजरा करायचा याच विचारात हरवून गेली होती . अगदी आनंदाने सगळी तयारी करत होती. दोन वाजले आणि प्रविण च्या गाडीचा हाँर्न वाजला. ती लगेच धावतच दाराकडे पळाली. पंचारती करून ति प्रविण ला घरात घेणार होती. दारासमोर तिने रांगोळी काढली होती, बागेतली गुलाबाची फुलं तोडून तिनं पाकळ्यांचा सडा दारासमोर अंथरला होता. पंचारती चे ताट घेऊन ती दारात उभी राहिली. प्रविण गाडीतून उतरला अन प्रियाला न्याहाळत राहिला गर्भारपणामूळे एक वेगळच तेज तीच्या कांतीवर चढलेले होते. थोडीशी थकलेली दिसत होती पण चेहे-यावर प्रचंड हास्य विलसत होते ती अगदी आनंदून गेली होती.
तिथुनच तो प्रियाला न्याह्याळत होता. प्रियाने त्याला आवाज दिला …
अरे पवू …..आत ये ना. मी कधिची तुझी वाट पहात आहे. आणि तु आहेस कि गेटजवळच थांबला आहेस आता प्रवीण आंत आला त्याच्या डोळ्यात अश्रू होते. नव्हे तो आता ओक्साबोक्शी रडु लागला होता. आता मात्र प्रिया घाबरली. प्रविण कां रडत आहे हे तिला कळतच नव्हते.
ती प्रविण ला आवाज देऊ लागली. तु कां रडत आहेस मला सांग काय झाले असे कां करतो आहेस. पण प्रविणचे रडणं थांबत नव्हतं. प्रिया प्रविण ला म्हणत होती तु घरात ये आपण बोलू. प्रविण ने तिच्याकडे पाहिले.
तो म्हणाला प्रिया मी तूझा अपराधी आहे. तूझी काळजी घ्यायला हवी हवं नको ते पाहायला हवं पण मी ते करू नाही शकलो कामातच व्यस्त राहिलो. तू खूपच विलोभनीय दिसत आहेस माझीच नजर लागेल गं तूला अन बाळाला माझ मन कातर झालय.
आता मात्र प्रिया भानावर आली. परिस्थिती नक्की काय आहे हे तिच्या लक्षात आले. प्रविण ला वाटले आपण तीच्यासाठी काही करू शकत नाही. प्रियाला आता खूप त्रास होईल. त्यात ति दोन जिवांची जर तिला काही झाले ना तर मी स्वतः ला कधी माफ करू शकणार नाही. पण प्रिया स्तब्ध उभी होती. तिने स्वतः ला खूप लवकर सावरले. प्रविण पण आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला.
प्रिया म्हणाली तु माझी काळजी करू नकोस पवू. मी आधी तु येणार म्हणून खूप एक्साईट झाले होते. पण मला आता परिस्थिती ची जाणीव झाली आहे. आपण दोघे एकमेकांना आहोत. काळजी घेऊ. आपले प्रेम एवढे कमजोर नाही पवू…
आपण आपला पहिला लग्नाचा वाढदिवस साजरा करू. मी तुला ओवाळते. केक ही तुझ्या समोर कापते, तु टाळ्या वाजव आणि सगळं जेवण आपण दोघे जेऊ. तुझ्या आवडीच बनवलय केक अन जेवण सगळं तुझ्याच पसंतीचे आहे. प्रविण अजूनही स्तब्धच उभा होता. प्रिया मध्ये एवढे धैर्य आले कुठुन हेच त्याला कळत नव्हते. एका नविनच प्रियाला अन एका आईला तो बघत होता. प्रियाने ठरवलेल्या प्रमाणे सगळं काही केले खुप छान प्रकारे वाढदिवस साजरा केला.
प्रविण ही लग्नाचा वाढदिवस मनापासून अनुभवत होता. प्रत्येक क्षण न क्षण मनात साठवत होता. एक नवीन ऊर्जा त्याला यातून मिळत होती. आपण केलेल्याचे चिज झाल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याला खुप काही बोलायचे होते प्रियाबरोबर. पण तो फक्त एवढच बोलू शकला.
माझी गृहस्वामिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शूभेच्छा
अवघाची संसार सूखाचा करीन.