आधुनिक विवाहाला पगाराचे मोजमाप पैशाच्या तराजूत विवाह तोलण्याची गल्लत

आधुनिक विवाहाला पगाराचे मोजमाप पैशाच्या तराजूत विवाह तोलण्याची गल्लत



आजच्या काळातील विवाहसंस्थेचे वास्तव अतिशय डोक्याला त्रासदायक बनले आहे. विवाहासाठी मुलाची/मुलीची संस्कार, स्वभाव, शिक्षण हे निकष बाजूला पडत चालले आहेत आणि त्याऐवजी “पगार किती आहे?” हाच प्राथमिक प्रश्न झाला आहे.

पैशाला दिले जाणारे अवास्तव महत्त्व

आजकाल विवाह ठरवताना मुलाचा किंवा मुलीचा फोटो किंवा गुणधर्म नंतर येतो, आधी येते फक्त “पगार किती आहे?” हेच विचारले जाते. उदाहरणार्थ:

मुली म्हणतात, “माझा पगार १० लाख आहे, मला २० लाख पगार असलेला नवरा हवा.” मुलांचे पालकही मुलासाठी स्थळ शोधताना मुलींच्या भरमसाट पगारामुळे हतबल झाले आहेत.

यातून संसाराचा मूळ गाभा हरवत चालला आहे. संसार म्हणजे केवळ भौतिक सुख आणि पैशाची देवाणघेवाण नाही; ते दोन जीवांचे आयुष्यभरासाठी एकत्र येणे आहे.

संसाराचा खरा अर्थ हरवत चालला आहे

भूतकाळात विवाह कसे ठरत होते हे आठवून बघा:

कांदेपोहे किंवा पारंपरिक पद्धतीने स्थळे ठरत होती. प्रेम, सहजीवन, एकमेकांच्या भावनांना प्रोत्साहन देणारा जोडीदार शोधला जात होता.

आज, पैशाचे महत्त्व इतके वाढले आहे की, मुलगी जरी सक्षम, स्वावलंबी, आणि हुशार असली तरी ती देखील आपल्या जोडीदारासाठी अवाजवी अपेक्षा ठेवते, ज्यामुळे विवाहाचे गणित बिघडते.

“पैसा हाच निकष” हे समीकरण चुकीचे का आहे? सुखी संसारासाठी पैसा आवश्यक आहे, पण प्राथमिक निकष नाही.
जर पैसालाच महत्त्व दिले, तर नातेसंबंधांमधील प्रेम, आपुलकी, आणि सहजीवनाचा आनंद हरवेल. “सर्वच राजकुमार BMW मधून येणार नाहीत!”
प्रत्येक जण परीकथेतला राजकुमार नसतो. जो तुमचं मन जिंकतो, तुमचं प्रेम आणि आधार देतो, तोच तुमचा खरा जोडीदार आहे. विचारसरणीत बदल आवश्यक आहे

पालकांनी आणि मुलांनी वास्तव स्वीकारावे.

मुला-मुलींच्या आवडी-निवडी समजून घेत नवीन दृष्टिकोन विकसित करावा. भौतिक सुखांपेक्षा नात्यांवर लक्ष केंद्रित करावे.

पैशाच्या गणितांपेक्षा सहजीवन महत्त्वाचे आहे.

पैसा आयुष्यभर मिळेल, पण गेलेले वय परत येणार नाही. ज्या वेळेस भान येईल, त्या वेळी अनेक उत्तम स्थळे हातातून निसटलेली असतील. वास्तव स्वीकारा आणि परिवर्तन करा

आज आपण पैशाच्या तराजूत विवाहाचे मोजमाप करून अनेक चांगली स्थळे गमावत आहोत. विचार बदला, नाती जपण्यावर भर द्या, आणि सहजीवनाचा आनंद मिळवा.

“आईवडिलांसाठी मुलांच्या डोक्यावर अक्षता पडणे हाच सर्वोच्च आनंद असतो.”
हे सत्य ओळखा आणि विवाहाच्या गोंधळलेल्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडवा.

परमेश्वरा, आमची डोळ्यांची पट्टी काढा आणि आम्हाला खऱ्या अर्थाने विवाहसंस्थेचे महत्त्व कळू द्या!