बायको म्हणजे बायको असते

बायको म्हणजे


बायको म्हणजे बायको असते

खरं सांगू,बायको म्हणजे बायको असते,
घरात असते तेव्हाही ती असतेच असते,
नसते तेव्हाही कानाकोपर्यांत  भरलेली असते,
दरवाज्यावरील बेल,बायकोचीच वाटते.

तारांबळ उडते ,अस्ताव्यस्त घर ताळ्यावर येते,
बेलवर बेल दरवाज्यावर वाजू लागते,
याची दारुची बाटली अडगळीत जाते,
दारावर खोडकर मित्रांची फिदीफिदी दिसते.


बायको नावाच्या आवलियाची दहशत असते,
नवरोबा नावाचे गलबत संसारसागरात स्थीर असते                          भरकटत कोणत्या किनाऱ्यावर धडकले असते?
म्हणून खरचं बायकोची दहशत चांगली असते.


बायकोला परक्यांचा सल्ला पटकन कळतो,                                हे धादांत  नाटक असते ,नवरोबाचच ती ऐकते,
म्हणून माय नंतर तिचाचतर  आधार असतो,                                        म्हणून तर आवडीचे  ताटात बरोबर वाढते.

तुझं माझं जमेना,तुझ्याशिवाय करमेना,
म्हटलेले अगदी  खरेच,मान्य करावेच लागते,
म्हणून बायको माहेरी गेल्यावर चार दिवस बरे वाटते,
अस्ताव्यस्त घर पांचव्या दिवशी खायला उठते.

सर्व दांपत्य धारींना मान्यच करावे लागेल,
नवराबायकोचे भांडण वार्यावरची वरात असते,
बायको नसेल विसरत तर नवर्याने  पुढे येत,                                   चेकमेट करुन, जास्त आणि मस्त जेवायचे असते.

कवी प्रा.मगन सुर्यवंशी

Leave a Comment