वयात आलेल्या मुलां मुलींना लग्न जुळवतांना स्वातंत्र्य द्या
लग्न ही प्रत्येक मानवाच्या जीवन प्रवाहातील अविभाज्य घटना असते.मुलगा अथवा मुलगी वयात आली की त्यांना त्यांच्या भवितव्याची जाणीव करुन द्यावी . जबाबदारी समजून सांगावी. जिच्या बरोबर, ज्याच्या
बरोबर संसार करायचा तो किंवा ती कशी असावी हे, मुलामुलीला
समजून सांगावे व तद नंतर
त्यांनाच त्यांचा जीवन प्रवाहाचा
जोडीदार निवडू द्यावा ,जिथ आपल्याला, अर्थात आईवडिलाना, खटकेल तिथे त्यांच्या लक्षात आणून द्यावे.
मुलगा किंवा मुलगी पसंतीचे
अधिकार आई वडिल गाजवायला लागलेकी, एकतर , मुलगी कसलाही विचार न करता आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर
निघुन जाते किंवा आयुष्याच नुकसान करुन बसते.
मुलाचही तसच असत,
आई वडिल आपल्या अटी मुलावर लादु लागले की मुलगाही परस्पर पसंतीच्या मुली बरोबर
लग्न करुन मौकळा होतो. किंवा
आयुष्यभर कुवारा रहातो.
….. जी मुले केवळ आई वडिलाच्याच मना प्रमाणे लग्न करु ईच्छीतात, त्यांना नंतर
पश्छातापाची पाळी येते. तेव्हा मुला.मुलुंनी आईवडिलांचा मान राखावाच पण लग्न आपल्याच पसंतीच्या जोडीदारि बरोबर करावे. तर लग्न सुयोग्य वयात होते व संसारही सुखाचा होतो.
महेशबाबा घुगे.
