नवरा बायकोतील नातंनवरा बायकोतील नातं

बहिणाबाईच्या या ओळी किती सार्थ आहेत

नवरा बायकोतील नातं

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर

आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर!

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हणू नये

राउळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये

अरे, संसार संसार, नाही रडनं, कुढनं

येड्या, गळ्यातला हार, म्हणू नको रे लोढणं!

अरे, संसार संसार, दोन जिवांचा विचार

देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार

बहिणाबाई चौधरी जन्म ११ ऑगस्ट १८८० | मृत्यू ३ डिसेंबर १९५१

बहिणाबाईच्या या ओळी

लग्र पवित्र बंधन नवरा बायकोतील नातं

आपल्याकडे लग्राच्या पवित्र बंधनाला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. लग्ना मुळे दोन व्यक्तीच नाही तर अनेक नातेसंबंध जुळतात. नवरा-बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं. या नात्यात संशयाची ठिणगी पडली की दोघांच्याही आयुष्याची राखरांगोळी होते. खान्देशी मराठा वधू वर सूचक मंडळ

नवरा-बायकोच्या नात्यात प्रथम आपुलकी, जिव्हाळा, प्रेम निर्माण होणे आवश्यक आहे. जर या गोष्टी नसतील तर नवरा बायकोचं नातं फक्त नातंच उरतं. त्यात कुठलीही भावना नसते. दोन व्यक्ती फक्त एकमेकांसोबत शरीराने राहत असतात.

असे कोरडे नाते निर्माण होऊ नये याची काळजी नवरा बायकोने निश्चितच घेतली पाहिजे. शिवाय नवर्याच्या घरातील किंवा बायकोच्या घरातील लोकांनी त्या दोघांच्या नात्यात नाक खुपसू नये. त्यामुळे दोघांमध्ये मधुर संबंध आपसूकच निर्माण होतील.

नवरा बायको नात्यातील भांडण, रूसवा, फुगवा

नवरा-बायकोचं नातं म्हटलं की त्यात भांडण, रूसवा फुगवा हा आलाच. पण या गोष्टी जास्त ताणल्या जाणार नाहीत याची काळजी बेळीच दोघांनीही घेणे आवश्यक आहे. दोघांनीही एकमेकांवर अवास्तव अपेक्षा लादू नये.एकमेकांना नीट समजून घेतले तरच संसाररूपी रथ पुढे चालत राहतो.

नवरा बायको नात्यात एकमेकांचा सन्मान

दोघांनीही एकमेकांचा सन्मान करणे खूप महत्त्वाचे आहे.बऱ्याच ठिकाणी नवरे मंडळी बायकोला कुठल्याही प्रकारची मदत करीत नाही. आम्ही पुरूष आहोत, आम्ही का घरातील कामे करायची? असा भ्रमाचा भोपळा अनेक नवरे आपल्यासोबत बागवत असतात. पण बायकोचाही विचार त्यांनी करायला हवा. कमीतकमी जेवढे शक्य आहे तेवढी मदत बायकोला करायला काय हरकत आहे ?

नवरा बायको नातं आणी त्यांच्या चुका

चुकणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. संसारात दोघांकडून काही ना काही चुका होतच असतात. त्याकडे थोडे दुर्लक्ष करून छोट्या गोष्टींना लगेच संपवून टाकणे इष्ट ठरते.अन्यथा वादावादी होऊन मने खराब होतात.

नवरा बायको नात्यातील नियम

नवरा-बायकोच्या नात्यात काही नियमही पाळले जातात. लग्नाच्या वेळी वर-वधू एकमेकांना वचन देतात की ते आयुष्यभर एकमेकांना साथ देतील. पण आयुष्यात पुढे जाताना बऱ्याच नवरा-बायकोकडून हे वचन पाळले जात नाही,पण दोघांनाही त्यांच्या नात्यात प्रेम नांदावे असे वाटत असेल तर एकमेकांसाठी त्या नवरा-बायकोने असणं गरजेचं असतं.

कित्येकदा नवरा बायकोला किंवा बायको नवर्याला घालून पाडून बोलत असते. असे न बोलता नीट समजावून सांगणे बरोबर आहे. कित्येक घरांमध्ये नवरा- बायकोचे नाते नाममात्र असते. एकाच घरात, एकाच छताखाली राहून त्यांच्यात बोलचाल पूर्णपणे बंद असते.

बायको पण एक माणूस

लोक काय म्हणतील किंवा मुले असतील तर त्यांच्यासाठी ती दोघे घटस्फोट घेत नाहीत. पण मनाने ती दोघे केव्हाच दूर गेलेली असतात. नोकरीवर जाणारी बायको असेल तर तीही संध्याकाळी दमून भागून घरी येते. अशावेळी नवर्याने तिच्याकडे हे पाहिजे, ते पाहिजे असे म्हणून तिला फर्मान सोडणे बरोबर नाही. तीही एक माणूस आहे यांची जाणीव तिच्या नवन्याने आणि घरातील इतर मंडळींनी ठेवायला हवी.

नवरा बायको नात्यातील विश्वास

नवरा-बायकोने एकमेकांना विश्वासात घेऊन आपली दुःखे, आपला त्रास, आपला आनंद एकमेकां सोबत वाटून घ्यावा. त्यामुळे त्यांच्यातील प्रेम अधिकच वृध्दींगत होते. काही नवरे आपल्या बायकोला तिच्या मित्र मैत्रिणींसोबत गप्पा करू देत नाही. पण त्याचवेळी पुरुष मात्र तासन तास आपल्या मित्र मैत्रिणी सोबत फोनवर गप्पा, चॅटिंग करत असतात.

बायको वस्तु नाही

बायको म्हणजे काही कोणी वस्तू नाही. तिलाही मन आहे, भावना आहेत बायको गृहिणी असली तरी ती संपूर्ण घर सांभाळते. ती घरातील लोकांना काय हवं, काय नको ते बघते. ती घराकडे लक्ष ठेवते म्हणून नवरा आरामात नोकरी करू शकतो. घरातील बारीकसारीक कामे ती आनंदाने करत असते.

नवरा बायकोतील नात टिकण्यासाठी

कित्येकदा नवर्याच्या आई वडीलांशी बायकोचे विचार जुळत नाहीत. अशावेळी फक्त बायकोला दोष न देता तिला आणि आपल्या आई वडिलांना विश्वासात घेऊन योग्य मार्ग काढणे उचित ठरते.

पती-पत्नीने एकमेकांना आधार देऊन, एकमेकांच्या चांगल्या बाईट गोष्टींचा स्विकारकेला तर नक्कीच त्यांचं नातं आयुष्यभर टिकेल, हे नातं टिकवण्यासाठी काही.

One thought on “नवरा बायकोतील नातं”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *