आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास

कायद्यातील तरतूद पाहून बसेल धक्का लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास

आमंत्रण नसताना लग्नसमारंभात शिरून जेवणावर ताव मारणाऱ्यांना २ ते ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

भारतीय लग्नांमधील जेवण चर्चेचा विषय असते. मात्र, कधीतरी लग्नांमध्ये ‘बिन बुलाऐ मेहमान’ म्हणजेच आमंत्रण नसलेले आगंतुक हजेरी लावून जेवणावर ताव मारून जातात. हे लोक ना मुलीकडून असतात ना मुलाकडून. वाहत्या गंगेत हात धुवून घेऊया म्हणत हे असे लोक जेवण आवडेल त्या लग्नाला हजेरी लावतात.


हल्ली अनेकदा मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित केलेली लग्न, रिसेप्शन किंवा पोस्ट वेडिंग पार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येने लोक हजेरी लावतात. मात्र, येथील गर्दीचा फायदा असे आमंत्रण नसलेले, ओळखपाळख नसलेले लोक घेतात. न बोलावता कार्यक्रमांना येणाऱ्यांची संख्या कमी नाही. बऱ्याचदा असे लोक म्हणजे ‘थ्री इडियट्स’मध्ये दाखविल्याप्रमाणे हॉस्टेलमध्ये राहणारी मुले असतात. अनेकदा तर संपूर्ण कुटुंब काही ना काही ओळख काढून लग्नांमध्ये येऊन ताव मारून जाते. जेवणावर ताव मारणे या एकमेव उद्देशाने अशी लोक आलेली असतात.

आमंत्रण नसताना लग्नाला जाणे हा कायद्याने गुन्हा आहे

आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास असे लोक पकडले गेल्यास कलम ४४२ आणि ४५२ अंतर्गत त्यांना किमान दोन तर जास्तीतजास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. न बोलावता लग्नात जाणे हे ट्रेसपासिंग करण्यासारखे आहे. त्यामुळेच या कलमांतर्गत कारवाई केली जाते.

मुख्य सोयरीक लेख आणी बातम्या

विवाह सोहळ्यातील अनाठायी खर्च अनिष्ट प्रथा रद्द

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्न शायरी मराठी

What is marriage? लग्न लग्न म्हणने काय असतं ?

फरार झालेल्या नवरदेवाला पोलिसांनी परत आणुन लग्न लावले

लग्नात खुर्चीवरून भांडण झाल्यामुळे लग्न रद्द

लग्नाच्या बातम्या

Marathi Matromony

Maratha Soyrik