सासरी जाणाऱ्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र

सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र. असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा हीच बदलत्या काळाची गरज आहे

सासरी जाणाऱ्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र

●मतलबी जाळ्यात नव-याला फसवून अलिप्त संसार थाटू नको, स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने सासरच्या नात्यास छाटू नको.
● आई झाल्यावर मुली तुला आईपणाचे भान येऊ दे,एकत्रित कुटुंबाचे संस्कार तुझ्या बाळांच्या मनावर होऊ दे.
● सासूशी उडणा-या खटक्यात बाळांना उगीच ओढू नको, आजी नातवाच्या नात्यावर त्याचा राग काढू नको.
● सास-याच्या म्हातारपणावर रागेवैतागे घसरु नको, नव्या-जुन्या पिढीमधील दुवा तुच आहे हे विसरु नको.
●अगदी सख्ख्या भावासारखं दिराबरोबर तुझं भांडण होईल,पण तुझ्या लाडक्यांना खेळणीही तोच काका घेऊन येईल.
●लहान असो नाहीतर मोठी, नणंद तर चेष्टेने त्रास देणारच.मांडीवर घेत तुझ्या पिलांना चिऊ काऊचा घास भरवणारच.
●तुझं-माझं भेदभावनेने जावेच्या पोरांचा द्वेष करू नको, वेळ प्रसंगी तिच्या लाडक्यांना दोन घास जास्त देण्यास मागे सरु नको.
●घरातल्या क्षुल्लक कुरबुरींना द्वेषपूर्ण उत्तर देऊन काय करशील ? अग, जशास तसे उत्तर देऊन,  एक दिवस घराचे घरपण मारशील.
●नातेवाईकाना धरुन राहिली तर सर्वांच्या मनात घर करुन रहाशील, तुझ्या पाखरांची उंच भरारी.तु सर्वांबरोबर आनंदात पहाशील.
●शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत
आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही वृध्दश्रमात कधीच जाणार नाहीत.

सासरी जाणाऱ्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र
सासरी जाणाऱ्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र


Indian Matrimony
लग्न सराई लेख

नवरा बायकोतील नातं लग्न शायरी मराठी

Khandeshi Maratha Soyrik

Leave a Comment