कधी होईल तुझं लग्न

कधी होईल तुझं लग्न

गावोगावी लग्नाला होणारा तरुणांची संख्या वाढत चालली आणि ही एक सामाजिक समस्या आहे. असं मराठवाड्यात राहणाऱ्या रमेश यांना वाटतं विनंतीवरून आम्ही त्यांची ओळख गोपनीय ठेवत आहोत. त्यांच कापड दुकान आहे ते गेल्या तीन वर्षांपासून लग्नासाठी मुली पाहत आहेत. पण त्यांना परत नकार येत आहे त्यामध्ये नाकार यायचं कारण हेच की नोकरी नाहीये. म्हणजे मुख्य सांगण्याचे कारण की तुम्हाला नोकरी नाही आणि मग नोकरी नाही पण व्यवसाय आहे ना पण व्यवसाय आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ किंवा आमच्या गरजा पूर्ण होणार नाही.

आमची मुलगी खेड्यात राहणार नाही. तुम्ही तिचा खर्च पुर्ण करु शकत नाही हेच उत्तर जनरली 90% लोकांकडून येतात. लग्नाला होत नसलेल्या विलंबामुळे आपप समाजाचे घटक नाही आहोत. अशी भावना त्यांच्या मनात तयार झाल्यास ते सांगतात.

“मी जर कुठे बसलेलो असलो आणि एखाद्या गोष्टीची चर्चा सुरू असेल आणि जर मी जर का माझं मत मांडलं तर लोक मला म्हणतात, “तुला काय कळते, तुला कुठे संसार पाणी आहे.अजून तर तू कुवारा आहे”. कधी-कधी अस वाटतं की मी या समाजाचा घटकच नाही आहे.”

दुसरीकडून लग्नात होणारा उशीर यामुळे रमेश यांच्यासाठी त्यांचे पालकही चिंतेत आहेत. नेहमी जर बघितलं तर आई सदैव टेंशन मध्ये दिसते.स्वतःशीच बोलून रात्री बे रात्रीचं उठणं काहीतरी स्वतःशी मनातच बडबडत असते.अनेक वेळेस विचारलं की काय झालं? तर सांगत काहिच नाही आणि कधी-कधी असं म्हणते की; “कधी होईल तुझं लग्न लवकर करून टाक एखादी मुलगी पाहुण” म्हणजे या टेन्शनमध्ये ती सातत्याने असते.

रमेश सांगतात की; आता गावागावात बिना लग्नाच्या पोरांची एक आणि लग्न झालेल्या पोरांची एक अस्या दोन वेगवेगळ्या स्वतंत्र डोळ्या बसलेल्या आहेत. “तुझं कधी होईल लग्न?आता तू कधी आम्हाला वरणपोळी खाऊ घालतो?” लग्नाची भावना तयार होते आणि जर लग्नाचा माहोल जरी असला तर मनात वाटतं की आपणही त्या जागी असायला पाहिजे.

महाराष्ट्रातल्या गावांमध्ये असं चित्र पाहायला मिळेल तरुणांना लग्न तर करायचे पण काही कारणास्तव ते लांबणीवर पडते.

कधी होईल तुझं लग्न
कधी होईल तुझं लग्न

Leave a Comment