मराठा सेवा संघाच्या खान्देशस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याला मान्यवरांसह हजारो पालकांची उपस्थिती

मराठा सेवा संघाच्या खान्देशस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याला मान्यवरांसह हजारो पालकांची उपस्थिती


मराठा सेवा संघ प्रणित वधु वर सुचक व सामुदायिक विवाह कक्ष आयोजित वधुवर पालक परिचय मेळाव्यात हिरे भवन येथे जवळपास दोन हजार पालक व वधू-वरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे हे होते. तर उद्घाटन अॅड उज्वलजी निकम साहेब हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ न शकल्याने त्यांनी उपस्थित समाजबांधवांना मोबाईलवर संवाद साधत शुभेच्छा दिल्या.

माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील हस्ते वडाच्या वृक्षाला पाणी टाकून कार्यक्रमाचे के उद्घाटन प्रा. रवींद्र निकम, मधुकर चपाटील, डॉ. राहुल बच्छाव डॉ. योगेश ठाकरे, डॉ चेतन ई पाटील, डॉ अमोल पवार, डॉ सुशिलजी महाजन, सी एन देसले उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, ,शशिकांत भदाणे, साहेबराव देसाई, सुरेंद्रदादा मराठे, पत्रकार अतुल पाटील, सुनील पाटील, अतुल सोनवणे, अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मराठा सेवा संघाच्या खान्देशस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याला मान्यवरांसह हजारो पालकांची उपस्थिती

आमदार बाबासाहेब कुणाल पाटील व उपस्थित मान्यवरांचे हस्ते रेशीमगाठी मराठा अनुरूप या अत्यंत आकर्षक व उपयुक्त अशा वधुवर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सदर पुस्तिकेत १००० च्या पुढे नोंदणी झाल्या होत्या, त्यानंतर मेळाव्याचे प्रसंगी ऐनवेळी झालेल्या नोंदणी ची पुरवणी सुची फेब्रुवारी महिन्यात प्रकाशित करण्यात येणार असून नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मराठा सेवा संघाच्या खान्देशस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याला मान्यवरांसह हजारो पालकांची उपस्थिती

शुभेच्छा देताना कुणाल बाबा म्हणाले की वधू वर मेळावा घेणे काळाची गरज असुन वधुवर पुस्तिकेतुन अधिकाधिक विवाह जुळून यावे, एकमेकांशी संवादानेच एकमेकांचे प्रश्न सुटतील. ग्रामीण भागातील विवाहयोग्य मुलांचे प्रश्न कठीण झाले आहेत.

खा. सुभाष भामरे म्हणाले की, सेवा संघाने अनिष्ट प्रथा विरूद्ध केलेले ठराव समाजासाठी निश्चितच अतिशय आवश्यक अभिनंदनीय समाजातील हा ज्वलंत प्रश्न आहे. पालकांनी मुला मुलींना विश्वासात घेत विवाह जुळवण्यास भविष्यातील अनुचित घटना टळतील. मध्य प्रदेश बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा द्रवींद्र मोरे म्हणाले की मराठा सेवा संघाचे प्रबोधन कार्य समाजहितासाठी अतिशय आवश्यक व कौतुकास्पद आहे, तर आपल्या उद्घाटनपर भाषणात माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील म्हणाले की कुटुंब व्यवस्था टिकवत संस्कृती टिकविणे महत्त्वाचे आहे. आजी आजोबांचा सांभाळ करा घरातील आधार असतात. मुल मुली उच्च शिक्षित आहेत. त्यांनी देखील विवाह होणारा अनाठायी खर्चाचा विचार करावा.

मराठा सेवा संघाच्या खान्देशस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याला मान्यवरांसह हजारो पालकांची उपस्थिती
मराठा सेवा संघाच्या खान्देशस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याला मान्यवरांसह हजारो पालकांची उपस्थिती


वधू-वर पालकाची भूमिका

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले महाराष्ट्रातील प्रख्यात वक्ते शिवश्री गंगाधरजी बनबरे यांचं वधू-वर पालकाची भूमिका या विषयावरील व्याख्यान ते म्हणाले की कर्तबगार व निर्व्यसनी जावई शोधा. मराठा समाज सर्व दूर पसरला आहे.खान्देशच्या पलीकडे देखील सोयरीक जोडा. मुहूर्त व कुंडलीच्या नादी लागू नका. विवाहप्रसंगी खर्चाचा गांभीर्याने विचार करा.,९०टक्के मुलींना पुणे मुंबई हवे यावर देखील गांभीर्याने विचार करावा. परिवर्तन स्वीकारा. दिवसेंदिवस घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे त्याची कारणे शोधा. मराठा समाजाने कुप्रथांचा त्याग करावा. मराठा समाजामध्ये तोरण आणि मरण ही नवी समस्या निर्माण झालेली आहे. छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, महाराज सयाजीराव गायकवाड, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन समाजाने वर्तमानानुसार स्वतः बदल केला पाहिजे. त्याशिवाय समाजाचे अस्तित्व राहणार नाही. विवाहातील अनिष्ट प्रथा संपल्या पाहिजेत वैदिक पद्धतीने दोन-दोन विवाह करणे मराठा समाजाने थांबवले पाहिजे. आपल्या स्त्रियांचा व पूर्वजांचा हा अपमान आहे. मराठा समाजात मुलींची संख्या कमी आहे व त्या जास्त शिकल्या आहेत. त्यामुळे मुलांचे लग्न होणे अवघड झाले. त्यासाठी तरुणांनी उद्योग व्यवसाय व नव्या संधी शोधण्याची गरज आहे जास्त शिकलेली मुलगी व कमी शिकलेला होतकरू निर्व्यसनी मुलगा असे विवाह करण्याबद्दल समाजाने विचार करावा. राजमाता जिजाऊ मासाहेबांनी नातेसंबंध करताना आपल्यापेक्षा कमी श्रीमंत लोकांच्या मुली केल्या, आपल्या घरातील मुली आपल्यापेक्षा कमी श्रीमंत मुलांना देऊन त्यांना बरोबरीचे स्थान मिळवून दिले. समाजातील नवश्रीमंत व उच्चशिक्षित समाज बांधवांनी यातून बोध घेऊन नवा कृतीशील आदर्श समाजासमोर ठेवावा. मुलीच्या संसारामध्ये मुलीच्या आईचा आवश्यकतेपेक्षा जास्त सहभाग हा घटस्फोटाला कारणीभूत ठरत आहे मराठा समाजामध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे एकत्रित कुटुंब पद्धती नष्ट झाल्यामुळे त्याचे वाईट परिणाम घडत आहेत. सामाजिक व कौटुंबिक दडपण मुला-मुलीवर राहिलेले नाही संस्काराचा अभाव असून महापुरुषांचे विचार माहीत नाहीत. त्यामुळे शिकलेली मुलं मुली सुद्धा आपल्या इतिहास संस्कृतीपासून दूर जात आहेत विधवा महिलांचा सन्मान व विधवांचे पुनर्विवाह याला आज प्राधान्य देण्याची गरज आहे लग्नात होणारा अनावश्यक खर्च, कुंडली मुहूर्त, मंगळ यासारखे थोतांड नाकारल्याशिवाय मराठा समाजाची प्रगती नाही मराठा समाजातील सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रातील श्रीमंत व नामवंत लोकांनी आपल्या मुला-मुलींचे विवाह अत्यंत साध्या पद्धतीने कुंडली, पत्रिका नाकारून करावेत त्यांचा आदर्श इतर गरीब मराठा समाज घेईल असे आवाहन गंगाधर बनबरे यांनी केले.

सदर प्रसंगी मराठा समाजाने विवाह पद्धतीत प्रथेत सुधारणा करणेसाठी खालील बाबींसंदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आले.

प्रिवेडींग शुटिंग बंद करणे, वैदिक – पारंपरिक या दोन तिन पध्दतीने विवाह लावण्याची सुरू झालेली प्रथा बंद करणे, मेहंदी संगीत हळद या पध्दतीने तिन चार दिवस चालणारे खर्चिक विवाह पद्धती बंद करणे, आहेर देणे घेणे मुळ लावणे पत्रिका प्रत्यक्ष वाटप बंद करणे, समाज स्वास्थ्यासाठी प्रदूषण बंदीच्या नियमांचे पालन करणेसाठी कर्णकर्कश डी जे व फटाके आतिषबाजी बंद करणे, अन्नाची नासाडी थांबविणे साठी अक्षता म्हणून तांदूळ ऐवजी फुले पाकळ्या किंवा टाळी वाजवणे, लग्नात मोजके पदार्थ जेवणात ठेवणे, लग्नसमारंभात अवाढव्य अनाठाई खर्च कमी करणे, वाढलेले घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी सेवा संघाच्या समुपदेशन कक्षाचे मार्गदर्शन घ्यावे. असे ठराव वधू वर कक्षाच्या वतीने सर्वाच्या साक्षीने उपस्थित केले. सर्वांनी हात उंचावून एकमताने मंजूर प्रा. बी ए पाटील, एच. ओ पाटील, उमेश शिंदे यांनी वाचन केले.

रेशीमगाठी मराठा अनुरूप हे मोबाईल अप्लिकेशन लॉन्च

यापुढेही वर्षभर समाजबांधवांना नावनोंदणी करता यावी व सचिंग करता येईल यासाठी उपयुक्त असे रेशीमगाठी मराठा अनुरूप हे मोबाईल अप्लिकेशन लॉन्च करण्यात आले व समाजबांधवांना मोठ्या एल ई डी स्क्रीन वर त्याची माहिती दाखवण्यात आली. सदर प्रसंगी साधारणतः ४ वाजेपर्यंत ४०० पेक्षा अधिक मुलामुलींनी विचार मंचावर परिचय करून दिला, पुरवणी पुस्तिकेसाठी २५०पेक्षा अधिक नवीन नोंदणी झाली.

मेळाव्याचे यशस्वीतेसाठी राबणारे सर्व पदाधिकारी व संघटक तसेच देणगीदार जाहिरातदार यांचेही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व एस. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. वधुवर कक्षाचे जिल्हाध्यक्ष पी एन पाटील आणि त्यांचे सर्व संघटकांचे कौतुक देखील केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र मोरे, विजयकुमार ढोबळे, नितीन पाटील, प्रविण पाटील, छाजेंद सोनवणे, अविनाश पवार, दिवाण पाटील, गुलाबराव देवरे, संजय पाटील, मनोज पाटील, अनिल अहिरे, बी एम भामरे, ए बी मराठे, लहु पाटील, नरेंद्र पाटील, देवेंद्र गांगुर्डे, डी टी पाटील, नुतनताई पाटील, वसुमतीताई पाटील, सीमाताई वाघ मनिषाताई पवार, ज्योतीताई पाटील, ड तरुणा पाटील, पुजाताई भामरे, सुलभाताई कुवर, शुभांगीताई निकम यांनी मेहनत घेतली

प्रा डॉ सुनील पवार, बी ए पाटील, एस डी बाविस्कर, पुनमताई बेडसे यांनी सूत्रसंचालन केले. वधुवर कक्षाचे जिल्हाध्यक्ष पी एन पाटील यांनी आभार मानले.

मराठा सेवा संघाच्या खान्देशस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याला मान्यवरांसह हजारो पालकांची उपस्थिती
मराठा सेवा संघाच्या खान्देशस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याला मान्यवरांसह हजारो पालकांची उपस्थिती
मराठा सेवा संघाच्या खान्देशस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याला मान्यवरांसह हजारो पालकांची उपस्थिती
मराठा सेवा संघाच्या खान्देशस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याला मान्यवरांसह हजारो पालकांची उपस्थिती
मराठा सेवा संघाच्या खान्देशस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याला मान्यवरांसह हजारो पालकांची उपस्थिती
मराठा सेवा संघाच्या खान्देशस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याला मान्यवरांसह हजारो पालकांची उपस्थिती

4 thoughts on “मराठा सेवा संघाच्या खान्देशस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याला मान्यवरांसह हजारो पालकांची उपस्थिती”

Leave a Comment