कुंडली मिलन न झाल्याने लग्न सबंध का रद्द होतात ?

कुंडली मिलन न झाल्याने लग्न सबंध रद्द

समाज्यात आज ३५%सबंध केवळ गुण मिलन,पत्रिका,मुळे रद्द होतात

कुंडली मिलन न झाल्याने समाज्यात आज ३५% सबंध रद्द होतात.

शोकांतिका आहे सर्व सुशिक्षित समाजातील परीवारातील आपण  उच्च शिक्षीत जरुर आहे .परंतु  एक अशिक्षित ब्राह्मण, महाराज ,त्याच्या पोटाची खडगी भरण्यासाठी  किती लोकांना वेडे बनवीत आहेत.

कुंडली मिलन विद्वान गुण पत्रिका बघणारे ना खुले चँलेन्ज

आमचे अश्या विद्वान गुण पत्रिका बघणारे ना खुले चँलेन्ज आहे
●मानसाचा जन्म गर्भधारणा होत असताना तो दिवस मानसाचा जन्म दिवस अथवा गर्भाच्या बाहेर जन्माला येतो  तर या पैकी  कोणता दिवस खरा जन्माचा  समजावा.

●जन्म वेळ ,ठिकाण  वर जर १००% भविष्य ठरत आहे .मनुष्याचा  आयुष्यातील असंख्य गोष्टीचा जर उलगडा होत असेल तर म्रुत्यु ची तारीख का सादर करू शकत नाही.

●एकाच मोठ्या शहरात एका क्षणाला हजारो मुले जन्माला येत असताना  काही ,मंत्री ,संत्री ,उच्चशिक्षित मुले, अधिकारी, काही, राजकारणी,काही नोकरदार ,काही बेकार ,काही अठरा विश्व दारीद्र ,गरीबी ,चोर ,लफेगें असंख्य प्रकारचे का निर्माण होतात .एकाच प्रकारचेच का होत नसतात .ठिकाण एक ,वेळ एक याच कारण विचारा.

●जर ३६ गुण जमत असतानाही असंख्य घटस्फोट का होतात.

●पुर्वी ४०/५०वर्षा पुर्वी ९८%गुण ,प्रत्रीका   बघत नव्हते एकही घटस्पोट होत नव्हते ,वाद विवाद होत नव्हते आज गुण पत्रिका  बघूनही  अश्याचे घटस्फोट होत आहे . जर याचा आभ्यास ,विश्वास आहे ,खात्रीपूर्वक, भरोसा आहे .तर आम्ही एका गुण पत्रिका, मिलन जे बघणारेना किमाण एक हजार ते दहा हजारा पर्यंत रुपये देण्यासाठी तयार आहे .मग ते स्टँम्प पेपर वर लिहून देण्यासाठी तयार का होत नाही .तुमचा जर विश्वास आहे भविष्यावर  हस्त रेषावर  जन्मवेळ ,ठिकाणावर अचुक    भविष्य सागू शकणात तर मागे का सरतात.

●एक नाडी एक रक्त गट असेल तर  संतती दोष दाखवतात  आम्ही असे हजारो वरील दोषाचे असतानाही ९९%संतती उत्तम ,हुशार ,कोणताही व्यग नाही .असे असंख्य वरील दोष खोटे ठरलेले आढळलेले आहे.

●जगात परफेक्ट भविष्य सागणारे लाखात,कोटी मध्ये एक सापडणे मुष्कील आहे.ही साक्षात एखाद्यावर  भगवंताची क्रुपा असते.

● एकाच वेळेस दोन जुळे मुले जन्माला आल्यावर एक बुध्दीमान, एक बुध्दीहीन ,एक लखपती तर एक फकीर ,एक सुखी,एक दुखी असे का होतात.

●रामाची व सितेची पत्रिका मध्ये ३६ गुण मिलन उच्च पत्रीका असतानाही ,रामाला,सितेला वनवास झाला ,सितेच हरण झाले ,सितेला अग्नी परीक्षा द्यावी लागली .शेवटी सितेला भुमीत सामावण्याची का वेळ यावी,असे भविष्याचे का वर्णन का आधी करु शकले नाही.

●जर पत्रिकेत दोष असले तर ते कमी करण्यासाठी या निवारण्यासाठी त्याचेवर उपाय मंत्र ,पुजा ,हवन करून ते दोष दुर होवू शकतात .तर एखादा बुध्दीहीन मनुष्य  बुध्दीमान का बनु शकत नाही. हे ९८%  मनाचे समाधान ,शांती ,चा मार्ग आहे .पैसा लुबाडणूक चा मार्ग आहे

●समाज्यातील ज्ञानी लोक बुध्दीमान लोक  जर गुण पत्रिका ,दोष निवारण्यासाठी ,विवाहात अळथळे न होण्यासाठी खटाटोप करतात  तरी ते सक्सेस का होत नाही.

●मानसाच्या प्रारब्धात सर्वात मोठा वाटा असेल तर प्रथम कर्म श्रेष्ठ आहे .नंतर निती ,तिसरे आहे नशिबाचे मिलन . काहीचे हातात माती घेतली तर सोन होत असते .काही हातात सोन घेतात तर त्याची माती होते .
म्हणून मनुष्य जिवनात ह्या  वरील तिघ गोष्टी श्रेष्ठ आहेत.

●असंख्य समाज्यात लग्नाचा दिवस ,वेळ गुण पत्रिका टाईम काहीच न बघता मना प्रमाणे  तेच आपसात ठरवतात  आज पर्यंत ९९%कुटूबात काहीच घटणा घडल्या नाही.

●अश्या वरील ९०%घटणा अती शिक्षण, अती पैसा  या श्रीमंत परीवारातच   होत आहे .अशिक्षित ,गरीब ,परीवारात काहीच घटणा घडत नसतात.

●मी कोणत्याही तज्ञ ब्राम्हण ,विद्वान गुण पत्रीका बघणारे जोतीष्य यानां माझे राहीलेले आयुष्याची   १००% भविष्य वाणी ,जीवनक्रम ,सुख ,दुख ,
प्रगती अधोगती ,म्रुत्यु तारीख ,कश्याने कधी ,वेळ सागणारा असेल तर एक लाख रुपये दक्षिणा ,फी देवू शकतो ? काही  आधीच्या घटणा काही या पुढील सर्व ऐ टू झेड स्टँम्प पेपर वर देणारा असेल त्याने हजर व्हावे .असेल माईचा लाल त्याने हजर व्हावे व चँलेज स्विकारावे .

●मानसाने आपले कर्म ,आचरण ,निती बलवान श्रेष्ठ ठरवावे  होईल तेवढी स्वच्छ ,पारदर्शी  जिवन जगावे  होईल तेवढे शक्य शेजार धर्म , नाते कर्म , परीवार कर्माचे  पालन करावे .हरामाचा ,पापाचा पैसा घरात आनू नका ,कमवू नका बघा आपले ,परीवाराचे जिवन कसे सुखाचे कसे जाते ते बघा आपले मुल ,सुना कसे चांगले निघतात कसे आई बापावर मन भरुन प्रेम जिव्हाळा लावतात .

गुणपत्रीका ,मिलन बघण्यात आपला बहुमूल्य वेळ बरबाद

अहो बुद्धिमान ,ज्ञानी लोकानो का गुणपत्रीका ,मिलन बघण्यात आपला बहुमूल्य वेळ बरबाद करतात  व मुलाचे जिवन का बरबाद करीत आहे .चांगले चांगले स्थळे हातून निघून जातील  नतर आपलेच अनमोल आयुष्याचे वेळ ,महीने ,वर्ष का बरबाद करतात.

तुमच्यात दम असेल बुध्दीची घमेड असेल तर असे वरील प्रश्न, समश्या त्या गुण पत्रीका काढणारे ना विचारण्याची हिम्मत आहे का ?लेखी ज्या वेळेस सर्व  जनता मागायला लागतील त्यावेळेस सर्व गुण ,पत्रीका ,जोतीष्य ,ब्राह्मण पंडीत अँटोमेटीक घरी बसतील .

काय कामाचे आहात तुम्ही ज्ञानी ना तुमच्याकडे कोणी चुकीचे किवा योग्य  माहीती सांगतो आहे त्याचा पळताळा , विचाराची पात्रता ,लायकी आहात का? दोन पैसे कमवीत आहे तर रिकाम्या गोष्टी सुचतात.

लवकर लग्न न जमण्याची काही प्रमुख कारणे
लवकर लग्न न जमण्याची काही प्रमुख कारणे

जरा घामाचा कष्टाचा पैसा असता तर असे रिकामे प्रश्न सुचले नसते.मित्रांनो माझ्या लिखानाचा राग मानू नका .समाज्यात भरपूर फसवणारे ,लुबाडणूक करणारेची  साखळी वाढली आहे .तुमचे अज्ञान ,तुमचा पापाचा पैसा मुळेच रिकामे गोष्टी सुचतात.

कोणाच मन दुखले असतील तर मी माफी मागतो मला क्षमा करा.मी सर्व साधारण एक वेडा समाज सेवक आहे .माझ्या बुद्धीला योग्य जे पटते आहे ते समाज्या परत पोहचवीत असतो.

आपल्या सर्वाचा एक हित चिंतक ,जे आपल्या बुद्धीला पटले ते घ्यावे .जे नाही पडले ते सोडून घ्यावे. समाज्याला कळकळीची विनंती आहे .

आपल्या बुध्दीला हा लेख आवडला तर १००%शैअर करा आपल्या मित्रांना ,नातेवाईक याना.

Leave a Comment