लग्न पाहावे करून
🌹🌹🌹🌹🌹
****************
…. नानाभाऊ माळी
लग्नगाठ ईश्वरी असतें असं मानलं जातं!हा अनाकलनीय,हुरहूर लावणारा विधी आहे!जोडीदार कोण? कुठला? कुठे भेटेल याचं काहीही गणित नसतं!ही मोहमयी जोडी स्वर्गातूनचं बांधली जात असतें अशी श्रद्धा आहे!तरीही हालचाल केली तरच ही स्वर्गातील जोडी विश्व साकार करू शकते!हात बांधून बसलो तर कोण येणार आहे स्थळं शोधतं?आपण स्थळं पाहतो!शोधतो!पळापळ करतो!कधी काही कारणास्तव पसंती होतं नाही!कधी जमलें जमलें म्हणतो अन मध्येचं फिस्कटतं!कधी पसंती होऊनही लग्न जुळून येतं नाही!खूप फरफट होतें!कधी कुतरहोड होतें!कधी तर एखादं स्थळं जवळ असतं!जवळ असूनही लक्षात येत नसतं!सोनं जवळ असूनही शोध उशिरा लागतो!लिंक लागते!चालता बोलता सगळं काही जमून येतं!योग जुळून येतात!बोली बंधन साखरपुडा होऊन लग्नाची तारीख देखील पक्की होतें!एक दिव्य पार पडल्याचं समाधान काही वेगळेच असतं!
लग्नाची तयारी सुरू होतें!नाते संबंधातील मंडळी तारखेची वाट पाहू लागतात!यजमान दिवसांगनिक लग्न तयारीसाठी पळू लागतो!हे बुक कर!तें बुक कर!या वस्तू घ्या!त्या वस्तू घ्या!या वस्तू राहून गेल्या!अहो!!! हे राहून गेलं!तें राहून गेलं!खरेदी!खरेदी अन तयारीतं दिवस पळू लागतात!पैसा, वेळ आणि नातेवाईक पळत असतात!पायाला भोवरा, डोक्यात लग्न, नातेवाईकांच्या चकरा… नुसतीचं पळापळ सुरू असतें!
लग्न तारीख जवळू येऊ लागते!खरेदी सुरूचं राहते!हृदयात धडधड सुरू होतें!अपूर्ण काही राहिले का?काही देणं घेणं चुकून नजरेतून सुटून जातं!अगदी जवळच्या व्यक्तीलाही लग्नपत्रिका द्यायला विसरून जातो!राग, लोभ नंतर कळतोच!लग्नाचा ड्रेस, साडया, आहेराच्या साडया, सोनं-नाणं..खिसा तळाला जाईस्तोवर पिच्छा सोडत नाही!काही जाणकार, जेष्ठ,अनुभवी मंडळी मार्गदर्शन करीत असतात!खरचं हातभार लावणाऱ्या अशा व्यक्तींच्या बद्दल कृतज्ञता भाव जपावा तेवढा कमीच असतो!
लग्न तारेवरची कसरत असतें!नाजूक नात्यांची बांधणी असतें!ताजे ताजे नाते असतें!सुटता सुटता बांधणे असतं!नाते जपण्याची कसरत असतें!काहींना पाहुण्यासं काहीतरी दाखविण्याची,पैसा ओतून शोबाजी देखील असतें!लग्न कठोर परीक्षा असतें!यजमान सर्वांचं समाधान करण्यासाठी पळत असतो!तळ हातावर ठेवून सर्वांना जपत असतो!फोडासारखं जपत असतं!शुल्लक नाराजी सुद्धा चालणारी नसते!नाराजीचा स्फोट असहनीय असतो!परिणाम काहीही होऊ शकतो!इम्पॅक्ट काय होईल सांगता येतं नसतं!इम्पॅक्टच्या आधीचं जळणारी वात विझवावी लागते!सर्व काही आलबेल होऊन जातं!
लग्न….स्थळं पाहण्यापासून अक्षदा पडेपर्यंतचा अतिशय अवघड प्रवास असतो!जबाबदारी पेलण्याची वेळ असतें!लग्न संस्कार दानासाठी हवाहवासा वाटणारा प्रवास आहे!कन्या अन सुपुत्र पवित्र वेदिवर चढणारा क्षण लग्न असतं!मातृ-पितृ कर्तव्य पूर्तीचा क्षण असतो!लोकसाक्षी, अग्नी, ब्राम्हण साक्षी मान्यतेचा क्षण असतो!लग्न हा तिखट,मीठ,साखरेचा स्वाद देणारा अनुभव असतो!नवं नातं जवळ येतं जातं!जवळचं घट्ट होऊ लागतं!घट्ट एकजीव होऊ पाहतं!लग्न नाते विनत असतं!सुंदर धागे विनत असतं!आनंद अन कर्तव्याची जाणीव करून देणारा पवित्र सोहळा लग्न असतं!नवदेव नवरीस एकमेकांविषयी ओढ असतें!आतुरता असतें!तारुण्यावस्थेतील स्त्री-पुरुष,आरोग्यसंपन्न सुदृढ स्त्री अन पुरुष एकजीव होण्यासाठी लग्न संस्कार अतिशय महत्वपूर्ण असतात!पुरुषार्थ अन स्रित्व मिलनासाठी महत्वपूर्ण क्षण लग्न असतं!वारस वेल वाढीसाठीचा अतिशय महत्वपूर्ण क्षण लग्न असतं!
नवीन नात्यांचा गोतावळा माणसं विनत असतात!लग्न संबंधांची नाजूक, भावनिक घट्ट जाळी तयार होत जाते!नको असलेलं गळून पडतं!जुळलेलं नवं वेलिंवरील आयुष्य फुलवू लागतात!फुलता फुलता हसत अश्रू पूसायचे असतात!भावनिक ओलेपणा जपत राहायचा!डोळे भिजवत संसार पायरीवर पाऊल ठेवणारा क्षण लग्न असतं!
नात्यांचा गोतावळा अनेक अनुभवांचं फुकट दान देऊन जातात!
सूर्यदेव लग्नाचा दिवस घेऊन उगवतो!लग्नसोहळा श्रमाच्या, भावनेच्या,आनंदाच्या, नात्यागोत्यांच्या, मित्र, मैत्रीण, जेष्ठांच्या साक्षीने पार पडतो!श्रमाचं उत्तम फळ गोडवा देऊन जातं!कर्तव्यपूर्तीचा दिव्य सोहळा पार पडतो!माता पित्यांच्या परम कष्टातून वधू-वर विवाह संस्कारीत होतात! अन लग्न पार पडतं!कर्ज असो, उसने असो पैशांची मदत होतें!लग्न खेळ नव्हे कर्तव्य अन जबाबदारी सोपविणारा संस्कार पूर्ण होतो!कर्तव्यपूर्ण झाल्याचं आत्मिक सुख आनंद देत असतं!सून घरात आणून लक्ष्मी स्थान देण्याचं,सुपुत्री लग्न संस्कारातून दान देण्याची पारंपरिक प्राचीन विधीचा सन्मान राखला जाऊन जन्म सिद्ध झाल्याचा परमानंद वेगळाच असतो!अनुभवांची समृद्ध शिदोरी जीवनदर्शक असतें!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************
… नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०५ फेब्रुवारी २०२५