वधु वर परिचय पुस्तिका मेळावा संदर्भातील समाजमनाची मानसिकता बदलणे गरजेचे
जय जिजाऊ…!!! जय शिवराय….!!!
वधु -वर परिचय पुस्तिका /मेळावा वधु वर परिचय मेळावा
समाजमनाची मानसिकता बदलणे गरजेचे
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाजोपयोगी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पहात आहोत
त्यापैकीच एक म्हणजे “वधुवर सुचक व सामुदायिक विवाह कक्षाच्या” माध्यमातून वधुवर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा आयोजन
सध्या बरेच दिवसात धुळ्यात सामुदायिक विवाह सोहळा पार पडला नसला तरीही पदाधिकारी असा सोहळा घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत
मात्र वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन दरवर्षी होत आहे आणि दिवसेंदिवस त्याची मागणी वाढत आहे, सदर प्रसंगी प्रकाशित करण्यात येणारी वधुवर पुस्तिका/सुची ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी ठरते.
सदर पुस्तक हस्ते-परहस्ते हजारो समाजबांधवांच्या घरी पोहोचते त्यामुळे त्यात ज्या ज्या उपवर मुला मुलींचे बायोडाटा असतात, त्यांची नावे एकाचवेळी हजारो समाजबांधवांच्या नजरेखालून जातात व त्यामुळे ताबडतोब कोणाला कोणतं स्थळ उपयुक्त ठरले यांचा अंदाज लावुन बरेच जण आपापल्या नातेवाईक, मित्र परिवाराला,ओळखितील व्यक्तींना स्थळ सुचवतात आणि मग सदर पुस्तिका साधारणतः वर्षे दोन वर्षे याविषयी उपयुक्त ठरते,, वर्षभरात वधुवर पुस्तिकेच्या माध्यमातून शेकडो विवाह जुळवण्यासाठी पदाधिकारी, नातेवाईक प्रयत्न करतात व त्यामुळे विवाह जुळवण्यासाठी खुप खुप मोलाची मदत होते असा फिड बॅक मंडळाचे पदाधिकारी यांना समाजबांधवांकडुन मिळतो.
व्हॅट्सॲपचे हजारो गृप आहेत पण तेच तेच बायोडाटा इकडून तिकडे होत असतात,त्यापेक्षा पुस्तिका अधिक उत्तम प्रकारे कामात येते वर्षभर त्यामुळे अनेक व्यक्तींना ती हाताळता येते, घरातील, नात्यातील, मित्र परिवारातील सदस्य एकच पुस्तिकेच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करून एकमेकांना अनेक स्थळांची माहिती पाहिजे तेंव्हा देतात त्यामुळे पुस्तिकेचे महत्त्व व्हॅट्सॲप गृप पेक्षा कितीतरी पट अधिक असल्याचे समाजबांधव बोलुन दाखवतात.
परंतु परिचय मेळाव्याचे आयोजक म्हणून आम्ही रात्रंदिवस राबून मेहनत घेऊन खुप चांगला कार्यक्रम घडवून आणण्यासाठी व अतिशय उपयुक्त पुस्तिका समाजबांधवांना ऊपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतांनाच
समाजमनाच्या काही संकुचित व चुकीच्या गृहितकावर आधारित संकल्पना/ मानसिकता मात्र मनाला खटकणाय्रा आहेत
१) माझ्या मुलाचं/मुलीचं नाव का नोंदवावे ? मला का स्थळ मिळणार नाही का?
२) मला नाव नोंदणी करायची नाही पण तुम्ही चांगले स्थळ सुचवा.
३) मी माझ्या मुला /मुलीचं नाव नोंदणी करणार नाही पण मला तुमची पुस्तिका तयार झाली की सांगा मी विकत घेऊन जाईल.
४) मला तुमच्या व्हॅट्सॲप गृपवर ॲड करा परंतु माझ्या मुला मुलींचे बायोडाटा गृपवर शेअर करु नका. मला फक्त गृपवर आलेले बायोडाटा बघुन घेवु द्या मी नाव नोंदणी पण करणार नाही आणि गृपवर बायोडाटा पण शेअर करणार नाही.
५) शेवटी शेवटी नोंदवून घेऊ आम्ही नाव आतापासूनच काय घाई?
वर नमूद केलेल्या दिलेल्या मानसिकता
बदलविणे खुप खुप आवश्यक आहे.
कारण आमच्या आजवरच्या अनुभवानुसार ज्यांनी पुस्तकात नावनोंदणी केली आहे त्यांचं स्थळ आपोआप किमान २०००ते५००० हजार लोकांना माहिती पडतं आणि हे दोन ते पाच हजार लोकं फक्त वाचण्यासाठी पुस्तक हाताळत नाही तर ज्यांना आपल्या मुलांना/मुलीला/नातेवाईकांना
लग्नाच्या दृष्टीने योग्य स्थळ ते शोधत असतात तेच लोकं वधुवर पुस्तिका काळजीपूर्वक वाचता आणी एकमेकांना आवश्यक ते स्थळ सुचवतात.
आपण आणि आपले नातेवाईक कितीही केले तरी ५०-१०० च्या पलिकडे संख्या नसते ज्यांना आपलं स्थळ माहिती आहे पण पुस्तकात नावनोंदणी केली की आपोआप २०००ते ५००० लोकांना माहिती होते आणि लग्न जुळवण्यास मदत होते हे पालकांना लक्षात घेतलं पाहिजे.
पुस्तकात नावनोंदणी का करावी?? आमचं काही जमणार नाही का??एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे का?? ही चुकीची मानसिकता बदलण्याची गरज आहे.आपलाच समाज आहे,आपलेच सर्व भाऊबंद आहेत पण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने सर्व इतरत्र विखुरलेले आहेत , पुर्वीच्या काळात समाजातील प्रामाणिकपणाने काम करणारे लगिनमास्टर आता शिल्लक राहिले नाहीत त्यामुळे वधुवर मंडळाचे पदाधिकारी जे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या कार्यात जास्तीत जास्त समाजबांधवांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.
अजुनही मराठा सेवा संघाच्या “रेशीमगाठी” या अतिशय सुंदर व उपयुक्त अशा वधुवर पुस्तिकेची छपाई सुरू आहे १५ जानेवारी २०२४ पर्यंत नावनोंदणी करू शकतात कारण २८ जानेवारी २०२४ रोजी
“हिरे भवन” स्टेशन रोड धुळे येथे भव्य वधुवर सुचक व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यावेळी सदर पुस्तकाचे प्रकाशन केले जाते.
आपल्या उपवर मुली मुलींचे, नातेवाईकांची त्वरित नावनोंदणी
करून निश्चिंत व्हा ही विनंती
जय जिजाऊ…!!! जय शिवराय….!!!
आपला स्नेहांकित
पी एन पाटील,
अध्यक्ष,
मराठा सेवा संघ , वधुवर सुचक व सामुदायिक विवाह कक्ष, धुळे जिल्हा
मो नंबर 09421431020