मराठा सेवा संघाचे वधू वर सूचक नोंदणी भित्तीपत्रकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

मराठा सेवा संघाचे वधू-वर नोंदणीच भित्तीपत्रकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

मराठा सेवा संघाचे वधू वर सूचक नोंदणीचे भित्तीपत्रकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

नोव्हेंबर अखेरीस होणार भव्य खान्देशस्तरिय वधुवर परिचय मेळावा

धुळे (प्रतिनिधी)-धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या  वधु वर परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणी करिता पूर्ण खानदेशभर प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने गावागावात भीतीपत्रक लावली जाणार आहेत,जास्तीत जास्त पालकांना वधू-वर नोंदणी करणे सोयीचे व्हावे या उद्देशाने त्या त्या जिल्ह्यातील तालुक्यातील प्रतिनिधींचे संपर्क नंबर सदर भित्तीपत्रके व पाॅम्लेट मध्ये देण्यात आलेले आहे.

मराठा सेवा संघाचे वधू-वर नोंदणी
मराठा सेवा संघाचे वधू-वर नोंदणी

त्यांचं प्रकाशन काल दिनांक ९ आक्टोबर रोजी अधिष्ठाता अभियंता बांधकाम विभाग अनिल पवारसाहेब, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळेसाहेब, डॉ. पूनम सतीश पाटील, कार्यकारी अभियंता अनिल सूर्यवंशी, केमिस्ट्री क्लासेसची संचालक प्रा. उमेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भितीपत्रक प्रकाशन सोहळा  संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वधू वर कक्षाचे जिल्हाध्यक्ष पी एन पाटील होते. सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी प्रास्ताविक करताना वधुवर कक्षाचे कामकाज व परिचय मेळाव्याचे नियोजन , वधुवर सुचीचे महत्त्व या संबंधित माहिती दिली.

मराठा सेवा संघाचे वधू वर सूचक नोंदणी भित्तीपत्रकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न
मराठा सेवा संघाचे वधू वर सूचक नोंदणी भित्तीपत्रकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

अधीक्षक अभियंता अनिल पवार यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की सामाजिक बांधिलकी जोपासत आपण विवाह योग जुळून येण्यासाठी चांगल्या पद्धतीने परिचय मेळावे घेत आहेत अभिनंदनिय उपक्रम मराठा सेवा संघ राबवत आहे . नियमित वधू-वरांच्या लग्नासोबतच विधुर घटस्फोटीत विवाह जमवण्यावर व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणे यावर देखील भर द्यावा असे आवाहन श्री पवार यांनी केले.

लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईसाठी काही विचार

प्री-वेडिंग शूटच्या निमित्ताने एक धक्कादायक घटना

मुलां-मुलींच्या लग्नापूर्वी: काय विचार करायला हवे?

अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की मराठा सेवा संघाने  वधुवर समुपदेशन केंद्रामार्फत जास्तीत जास्त समुपदेशनाचे काम करावे .जेणेकरून न्यायालयीन कामकाज कमी होण्यास मदत होईल व दोन कुटुंब जवळ येतील. विवाह सोहळा हा इव्हेंट न होता संस्कार सोहळे व्हावेत तसेच ऑफलाईन नोंदणी व पुस्तिके सोबतच ऑनलाईन नोंदणी आणि वेबसाईट डेव्हलपमेंट यावर देखील भर द्यावा ही अपेक्षा देखील  श्री काळे यांनी  व्यक्त केली.

मराठा सेवा संघाचे वधू वर सूचक नोंदणी भित्तीपत्रकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

डॉक्टर पुनम पाटील यांनी सांगितले की  दिवसेंदिवस विवाह योग्य वय वाढत जात असल्याने भविष्यात त्या जोडप्यांना लहान बाळ जन्मताना अनेक अडचणी येत आहेत. दोघं जण नोकरीला असल्यामुळे पाळणा देखील लांबवण्याचा प्रयत्न करतात.संपूर्ण फोकस नोकरीच्या कामकाजाचे टार्गेट पूर्ण करणे यावर असतो ,युवक युवतींना प्रिवेंडिंग शुटिंग पेक्षा प्रिवेडिंग समुपदेशन  होणे गरजेचे आहे. इतर गुण जुळण्यासोबतच रक्तगट व इतर गोष्टींवर देखील पालकांनी लक्ष द्यावे. विवाहपूर्व देखील समुपदेशन व्हावे असे विचार व्यक्त केले.

सर्व पाहुण्यांचा सन्मान कार्याध्यक्ष विजय ढोबळे, संचालक कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, मधुकर पाटील फागणे एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष नितीन पाटील संचालक राज कॉम्प्युटर्स, सहसचिव राजेंद्र मोरे, दिवाण पवार यांनी केला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील पवार यांनी केले. आभार प्रा. बी. ए पाटील यांनी व्यक्त केले. साहेबराव देसाई, डॉ. संजय पाटील ,एस एम पाटील ,व्याख्याते प्रा. सदाशिव सूर्यवंशी, हेमंत भडक, डॉ. सुलभा कुवर ,नूतन पाटील सौ.मनिषा पवार, अविनाश पवार , विनोद शिंदे,डी टी पाटील,पी सी पाटील ,रंगराव पाटील, गुलाबराव पाटील, डॉ संजय पाटील, राजेंद्र पवार,नवनित पाटील,ए पी खैरनार,सतिष पाटील,जे बि भामरे, एच व्ही पाटील,शाम निर्गुडे,यांच्यासह नोंदणी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment