विवाह कक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी प्रदीप नथ्थु पाटील नियुक्ती
मराठा सेवा संघ प्रणित प्रणित वधू-वर सूचक व सामुदायिक विवाह कक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी प्रदीप नथ्थु पाटील यांची मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार व वधू-वर सूचक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन पाटील यांनी नियुक्ती पत्र देवून केली आहे.
पी.एन. पाटील हे मराठा सेवा संघाच्या पत्रकार कक्षाचे सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी होते. सध्या ते वधू-वर सूचक कक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष असून, त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षापासून सलग भव्य-दिव्य स्वरुपात मोठे वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्या माध्यमातून ग्रामीण भागात विवाह जोडण्यातील अडचणी, जुन्या रुढी परंपरा, अनावश्यक खर्च व प्रथा संदर्भात जनप्रबोधनाचे कार्य केले आहे, तसेच रक्तदान, नेत्रदान, तंटामुक्त गाव, निर्मल ग्राम, स्वच्छता अभियान, शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत, या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
तंत्रनिकेतन येथे निदेशक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रा. पी.एन. पाटील सर यांचे ‘सा. एकला चालो रे’ तर्फे हार्दिक अभिनंदन.