विवाह सोहळ्यात पर्यावरणपूरक संदेश

मेधा पाटकर यांच्याहस्ते उपस्थितांना अक्षतारूपी झाडांच्या बिया

लग्न पद्धतीला फाटा

लग्न समारंभात नेहमीच्या पद्धतीला फाटा देत अक्षदा म्हणून तांदळाऐवजी पाच वृक्षांच्या बिया नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या हस्ते वाटप केल्या. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा चोपडा येथे शुभारंभ करण्यात आला.विवाह सोहळ्यात पर्यावरणपूरक संदेश

प्राची संग अविष्कार

घोडगाव ता. चोपडा येथील प्रा. प्रदीप लिंबा पाटील यांची कन्या प्राचीचा विवाह मंगरूळ, ता. अमळनेर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक जयवंतराव सखाराम बागुल यांचा मुलगा अविष्कार याच्याशी रविवारी चोपडा येथील यावल रस्त्यालगत असलेल्या एका मंगल कार्यालयात झाला.

वधू-वरास खऱ्या अर्थाने शुभाशीर्वाद मेधा पाटकर

पाच बियांपैकी एक झाड जगवले आणि वाढविले तरच वधू-वरास खऱ्या अर्थाने शुभाशीर्वाद असतील असेही वधूचे पिता प्रा. प्रदीप पाटील यांनी उपस्थितांना विवाह सोहळ्यात आवाहन केले. मेधा पाटकर

रूढी परंपरा यांना फाटा विवाह सोहळ्यात पर्यावरणपूरक संदेश

यावेळी समाजातील अनेक रूढी परंपरा यांना फाटा देण्यात आला. याप्रसंगी मेधा पाटकर आणि माजी पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित होते. पाटकर यांच्या हस्ते या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या विवाह समारंभात, अक्षता न टाकता पुष्प पाकळ्यांची उधळण करण्यात आली. पाटकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून उपस्थितांना झाडे लावण्याचे व जगविण्याचे आवाहन केले.

Maratha Soyrik…………………Khandeshi Maratha Soyrik

1 thought on “विवाह सोहळ्यात पर्यावरणपूरक संदेश”

Leave a Comment