लग्नानुभूतीचां वेचिला क्षण
नानाभाऊ माळी
स्त्री पुरुष ओढ ही
सुगंधी वेल आहे
मोह त्याचा सुटेना
क्रिकेटचां झेल आहे!
हुरहूर मनी लावतो
हा मायाजाल आहे
धावण्याचा खेळ हा
घोड्याची नाल आहे!
निकट येतं क्षणोक्षणी
हुरहूर मनी लागते
मुहूर्त येतो साक्षीला
अक्षदा हाती मागते!
शब्द सूर म्हणतांना
मंगलाष्टक येई कानी
दोन जीव एक होता
ऐकू येई लग्नवाणी!
काटेरी ही वेल आहे
हळुवार ती चाल आहे
गुंडाळते झाडालांही
लग्न हे फुल आहे!
२६ मार्च रोजी लग्नात अशाचं एका वधूपित्याला पाहात होतो!मार्च महिन्यातील लग्न कार्यात उन्हाच्या साथीनें घाम गाळतानां आमच्या हातात हात घेत विचारीत होतें ,’नानासाहेब काही कमी तर नाही ना पडलं?’ हृदयाची श्रीमंती घेऊन हिंडणारा हा बाप मी पाहात होतो!एक वधू पिता पाहात होतो!वधूसं, आपल्या कन्येसं विवाहाच्या पवित्र मंगल विधीतून कन्यादानास सज्ज असणारा बाप पाहात होतो!बाप स्वतः सर्वांना सामोरा जात होता!
नवरदेव-नवरी मुख्य भूमिकेत होते!इतर नातेवाईक, मित्र,आप्त सर्व साईड भूमिकेत होते!प्रत्येकाच्या भूमिका भिन्न भिन्न होत्या!दोन जीवांच्या मिलनासाठी लोकसाक्षीचा हा मंगलसोहळा लग्न समारंभ होता!आम्ही लोकसाक्षी भूमिकेत होतो!आमच्या अंतरीचे आशीर्वाद वधू वरांच्या पाठीशी होते!आम्ही अक्षदा घेऊन उभे होतो!आदल्या दिवशी नवरदेव नवरीचां साखरपुडा, हळद समारोह पार पडला होता!वधु पित्याच्या चेहऱ्यावर पहिलं दिव्य पवित्र कार्य पार पाडल्याचं समाधान दिसत होतं!वधु मातेची धावपळही पाहात होतो!उद्याच्या लग्नासाठी, नियोजनासाठी, व्यवस्थेसाठी वधू-वरांच्या माता पित्यांना रात्री झोप आली असेल?
खर्च करून, माणसं जोडून लग्नानंदाचीं वेळ क्षणाक्षणांनी समीप येत होती!!बराचसा आनंद खर्चावर अवलंबून असतो का मग?तसं काहीही नसतं!लग्नावर कितीही खर्च करा कमीच पडतो!पैशांवर लग्नाचा आनंद अवलंबून असतो, ही समजूतही चुकीची आहे!माणसं तुमच्या स्वभावानुसार जोडली जातात!कमी ऐपतीतही लग्नानंद मोजता येत असतो बरं!!!समजूतदार व्याही ब्याही, नवरदेव-नवरी असले कि सर्व शक्य होत असतं!ऍडजस्टमेंट शब्द कधी कधी भाव खाऊन जातो!वारेमाप खर्चाला कात्री लावून जातो!काटकसरीतून लग्नाचा आनंदानुभव घेता येतो!
लग्नातून नवं नाजूक नातं प्रेम धाग्यांनी विनावं लागतं!सगळा खेळ नाजूक नात्यापाशी येऊन पोहचतो!खर्च +नाजूक नाते+आनंद +तडजोड =लग्न समारोहापाशी आपण येऊन पोहचतो!!आम्ही ज्या लग्नाला गेलो होतो, प्रत्येकाच्या हाती अक्षदा होत्या!प्रत्येक मंगलाष्टका शेवटी वधु-वरांच्या डोक्यावर अक्षदा पडतं होत्या!दोन जीवांच्या मिलनासाठी लोकसाक्षी समारोह *लग्न सोहळा* पार पडत होता!नात्या गोत्यातील मंडळी वेगवेगळ्या भूमिकेत होते!आम्हीही अक्षदा हाती घेऊन आशीर्वाद देत होतो!सकाळीचं उगवत्या सूर्यदेवाच्या साक्षीने वैदिक विवाह पार पडला होता!भटजींच्या मुखातून मंगल ध्वनी कानी पडत होते!वधू-वर एकमेकांच्या गळ्यात सुंदर अशी पुष्पमाला घालीत होते!पाहुण्यांच्या साक्षीने,टाळ्यांनी वैदिक विवाह पार पडला होता!
पुन्हा दुपारी ठरलेल्या मुहर्तावर पवित्र मंगलाष्टक साक्षीला ठेवून विवाह सोहळा संपन्न झाला होता!वधुपिता लोकसाक्षीचा सुखद अनुभव घेत होते!त्यांच्या मुखकमलावर प्रसन्नतेचा भाव दिसत होता!विवाह सारखं महापुण्य पदरी पडल्याचं आत्मिक सुख होतं!माता पित्यांनी ज्या कन्येला,पोटच्या गोळ्याला जन्मदिला!वाढवलं!शिक्षण देऊन स्वतःच्या पायांवर उभं केलं त्याचं सुपुत्रीला विवाह नंतर दूर जातांना पाहात होते!डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते!लग्न आनंदात पार पडले होते!विदाई अश्रू मोजीत होती!अश्रूतं मुलगी दिसत होती!भिजत होती!मुलगी माहेरपण सोडून सासरी चालली होती!माहेरी जन्मलेली तुळशी मोठी होऊन दुसऱ्या दारीं निघाली होती!लग्न आनंद अन भावनावेगाचा क्षण होता!लग्नानंतर संध्याकाळी मोठया थाटामाटात नवऱ्या मुलासोबत सासरी निघून गेली!माहेरपण सोडून मुलगी सासरी गेली होती!या आयुष्याचं पुण्य वाटीत निघून गेली!
नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०९ एप्रिल २०२५
