What is marriage? लग्न लग्न म्हणने काय असतं ?
लग्न
लग्न लग्न म्हणने काय असतं ?
त्याच्या मनातील विचारांचे
तिच्या चेहरयावरच प्रतिबिंब असतं!!
तिच्या प्रश्नाआधी त्याचं
उत्तर तयार असतं!!
लग्न लग्न म्हणजे काय असतं ?
त्याला लागताच ठसका
तिच्या डोळयात पाणी तरळतं!!
तिला लागताच ठेच
त्याच मन कळवळतं!!
तिने चहा केला तरी
त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं
तिला फुल हवं असतं!!
लग्न लग्न म्हणजे काय असतं ?
त्याच्या बेफिकीरीला
तिच्या नाणीवांच कोंदण असतं!!
त्याच्या चुकांना
तिच्या पदराचं पांघरूण असतं!!
लग्न लग्न म्हणजे काय असतं ?
कधी समझौता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिने शांत रहायचं असतं
कपातल्या वादळाला
चहाबरोबर संपवायचं असतं
लग्न लग्न म्हणजे काय असतं ?
प्रेमाचं ते बंधन असतं
कधी दोन मनांच मिलन असतं
तर कधी दोन जीवांच भांडण असतं
घराचं घरपण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसरयाने सावरायचं असतं
विध्यात्याला पडलेले
ते एक सुंदर स्वप्न असतं!!
रोहिणी रणदिवे

5 thoughts on “What is marriage? लग्न लग्न म्हणने काय असतं ?”