बायको साठी दोन शब्द
बायको शायरी
बायको म्हणजे
परीवाराच्या कठीण काळात भोवतालच्या अंधारात उमेदीचा उजेड होऊन नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी बायकोच असते!
रोजच्या जगण्याला नवा उत्साह,नवी उभारी देत परीवाराच्या रुक्ष आयुष्याला नवसंजीवनी देणारी बायकोच असते!
ऊबदार विसाव्याचं ठिकाण,आस्थेचं महिरपी तोरण, आदरातीथ्याचं एक परीमाण बायकोच असते!
बायको यशाचे शिखर चढताना हात देणारी, अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारी अर्धांगिनी असते!
बायको कशी असते?
उसळणाऱ्या लाटांसारखी!
स्वच्छंद फुलपाखरासारखी!
खळळत्या पाण्यासारखी!
थोडीशी वेडी थोडीशी हळवी!
प्रेमळ आणि स्वच्छ मनाची!
स्वत:वर प्रेम करत नाते जपणारी!
आपल्यातच आपलेपणा जपणारी!
इतरांच्या आनंदासाठी स्त:लाही विसरणारी!
सुखाच्या रस्त्यावरुन जातांना आयुष्य सजवणारी!
नवऱ्याची साता जन्माची सोबतीण बायकोच असते!
बायको साठी दोन शब्द
5 thoughts on “बायको शायरी”