लग्नातील उखाणे

लग्नातील उखाणे

लग्नातील मराठी उखाणे, लग्नातील उखाणे.

1. शुभवेळी शुभदिनी आली आमची वरात… रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात

2. जिवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते सगळ्यांचा मान राखून नाव ••• चे घेते.

3. खणखण कुदळी मण मण माती मण मातीच्या उभारल्या भिन्ती, चितारले खांब; सासुबाईंच्या पोटी आक्काबाईंच्या पाठी उपजले राव, राव नाही म्हटलं, नाव नाही घेतलं; ३२ पानं ३२ सुपारी तोंडात विडा बोलु कशी? सदर दाराची, नजर पुरुषाची सदरेला उभी राहू कशी?येत होते जात होते घड्याळात पाहात होते; घड्याळात वाजले तीन ची वाट पाहातेची सुन्

4. सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले….. रावाचे नाव घेउन मी सौभाग्यवति झाले

5. जशी आकाशात चंद्राची कोर ……. . पती मिळायला माझे नशीब थोर

6. एक दिवा दोन वाली एक शिपला दोन मोती अशीच राहु दे माझी व … रावांची प्रेम ज्योत…….

7. भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता…..चे नाव घेते तुमच्या आहार

8. रुसलेल्या राधेला कान्हा म्हणतो हास….रावांना भरवते… चा घास

9. श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य आणि माझ्या संसारात होईल तुम्हा सगळयांचे नेहमी आदरातिथ्य.

10. सोन्याच्ये दागिने सोनाराने बनविले * रावाचे नाव घेण्यासाठी तुम्हि सर्वानि अडविले

11. आजच्या सोहळ्याचा थाट केलाय खास– ला भरविते जिलेबिचा घास

12. आजच्या सोहळ्याचा थाट केलाय खास- ला भरविते जिलेबिचा घास

13. निळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्र-तारे; … रावांच्या संगतिने उजलेल् माझे जिवन सारे

14. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकुन्… नाव घेते सर्वांच मान राखून

15. काचेच्या बशित् आम्बे ठेवले कापुन रावान्च नाव घेते सर्वान्चा मान राखुन

16. मंद वाहे वारा, संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो *****ची जोडी

17. आंब्यात आंबा हापुस आंबा – चे नाव घेते तुम्हि थोड थांबा.

18. पुरनपोलि वरण साजुक तूप भातात च्या आवडिचे पदार्थ वाढले चान्दिच्या ताटात

19. गजाननाच्या मन्दिरात सन्गिताचि गोडि सुखि थेवा गजानना – चि जोडि

20. जाईजुईचा वेल पसरला दाट.. बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ

21. अलिकदे अमेरिका पलिकदे अमेरिका नाव घ्यायला सान्गु नका मि आहे कुमारिका

22. एक होति चित्र एक होता काऊरावान्चे नाव घेते दोके नका खाउ

23. ताजमहाल बान्धायला कारागिर होते कुशल रावान्च नाव घेते तुमच्यासाथि स्पेशल

24. साता जन्माच्या जुळल्या गाठी, ..रावांच नाव घेते चालताना सप्तपदि

25. राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा…च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा

26. सांजवात लावताना येते माहेरची आठवण रावांसाठी झाली सासरी पाठवण.

27. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने चे नाव घेते पत्नि या नात्याने.

28. काव्य आनि कविता सागर आणि सरिता …चे नाव घेते तुमच्या करिता

29. राजहंस पक्षी मोति पोवल भक्षि…चे नाव घेते सर्व आहेत साक्षि

30. बन्स कि धुन पे नाचती है गन्गन … नम से बनि में सुहगन

31. मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली श्रीखंडाचा घास देताना…..मला चावली.

32. अत्रावळीवर पत्रावळि, पत्रावळिवर भात, भातावर वरण, वरणवर तुप, तुपसारखे रूप, रूपसारखा जोडा. ……..चे नाव घेते वाट माझी सोडा

33. काचेच्या बशित बदामचा हलवा…..रावाचे नाव घेते सासुबाईना बोलवा

34. तुळजा भवानीचि क्रुपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद माहेरचे निरान्जन आणि सासरची फूलवात

..रावान्चे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात

35. जेजुरीचा खन्डोबा तुळजापुरची भवानी रावाची आहे मी अर्धागीनी

36. हिमालाय पर्वतावरा बर्फाच्या राशी,…चे नाव घेते लग्नाच्या दिवशी

37. मुबईची महालक्ष्मी, कलकत्याची कालिका, .चे नाव घेते ….चि बालिका

38. नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू…. चे नाव घ्यायला मी कशाला लाजू

39. नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा च नाव आहे लाख रुपये तोळा

40. चिवड्यात घालतात खोबरयाचे काप रावां समवेत ओलांडते माप

41. पाव शेर रवा पाव शेर खवा…चे नाव घेते हजार रुपये ठेवा.

42. बंगलौर, म्हैसूर, उटी म्हणशील तिथे जाऊ घास घालतो……. बोट नको चाउस

43. दही, साखर, तुप राव माला आवडतात खुप

44. कामाची सुरवात होते श्रीगणेशापासून ……. नाव घेयला सुरवात केली आजपासून

45. मैत्रिणी नात्यात नसावा स्वार्थ मुळेच माझ्या जीवनाला अर्थ

46. मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे …माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे

47. सूपभर सुपारी निवडू कशी, गळ्यात माळ वाकु कशी, पायात पैंजण चालू कशी बसले मित्रपाशी, कपाटाची चावी मागू कशी..?

मराठी विवाहसोळा उखाणे मराठी उखाणे



48. ग्लीश मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर नाव घेते … ची सिस्टर

49. साडीत साड़ी परागची साडी… अमुकरावांना बाबानी दिली मारुतीची गाडी !!!

50. जेथे सुख शान्ति समाधान तेथे लक्ष्मिचा वास ..रावान्ना भरविते श्रीखंडाचा घास

51. लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास..चे नाव घ्यायला आजपासुन करते सुरवात

52. काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून

53. वाकडी तिकडी बाभुळ तिच्यावर बसला होला, सखा पाटिल मेला म्हनणुन तुका पाटिल केला.

54. कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास मि देतो…… ला श्रिखद चा घास

55. हिरव्या शालूला जरिचे काठचे नाव घेते, सोडा माझी वाट

56. रोज सकाळी उठुन पितो भरपुर पाणी, आसावरी चे नाव घेता येते डोळ्यात पाणी.

57. एक होति चिऊ, एक होता काऊ… ना घास भरवला तर मि काय खाऊ?

58. लग्नात लागतात हार आणी तुरे… च्या नाव घेण्याचा आगृह आता पुरे

59. कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार… आमुकरावांचे नाव घेऊन सर्वाना करते नमस्कार ।।।

60. आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास ला भरविते जिलेबिचा घास

61. अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा आणि असेच सदैव आणि च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा

62. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान…चे नाव घेते राखते तुमचा मान

63. कळी हसेल फुल उमलेल, मोहरून येईल सुगन्ध, … च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद

64. गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास, … चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास

65.मंगळसुत्राचे २ डोरले, एक सासर अन दुसरे माहेर -रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर

66. हंसराज पंक्षी दिसतात हौशी, रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी

67. सुखद वाटते हिवाळ्यातले ऊन, रावाचे नाव घेते ..ची सुन

68. भाजित भाजि पालक, माझि मालकिन अन् मि मालक !

69. बारिक मणी घरभर पसरले, साठि माहेर विसरले.

70. निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट…. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास

71. पाव शेर रवा पाव शेर खवा ….चे नाव घेते हजार रुपये थेवा.

72. तुमच्यापावलांवर पाउल ठेवून मी सप्तपदी चालले आणि. ..नाथा मी तुजीच जाहले.

73. शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने



74. श्रावणात पडतात सरीवर सरी रावांचे नाव घेते …. हि बावरी

75. अर्जुनाच्या रथाचे श्रिकुश्न करतो सारथ्यच्या ससारात होइल सर्वाचे आदरतिथ्य

76. अमुआ कि डाली पर बोले कोयलीया के संग बिते सारी उमरिया

77. चान्दिच्या ताटात गाजराचा हलवा – रावांच नाव घेते सासुबाईना बोलवा..

78. हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे …….. .चे नाव घेते सत्यनारायणापुढे

79. गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट… नाव घेते सोडा माझी वाट

80. आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले… चं नाव घ्यायला अडवले

81. हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात बसले दारात मी जाऊ कशी घरात

82. रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित मागते आयुष्य ….. च्या सहीत

83. हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात परातीवर ठेवला भात, भातावर वाढले तुप ते झाले खुप, म्हणून नेले पंढरीला, पंडुरंगाच्या दर्शनाला येताना आणले खण ३, आई म्हणे मला, नणंद म्हणे मला … म्हणे मी तुझ्यासाठी आणुन केला गुन्हा

84. संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती देवा सुखी ठेव ची जोडी

85. साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला- नाव घ्यायला आग्रह कशाला

86. वड्यात वडा बटाटावडा, … मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.

87. कुंकु लावत ठसठशीत, हळ्द लावते किंचित आहेत माझे पूर्व संचित

88. लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,… च्या जीवावर कर्ते मी मजा.

89. भाजीत भाजी मेथीची …माझ्या प्रितीची.

90. दुधाचे केले दहि, दहयाचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा, …चे नाव घेतो …. रावान् चा पठ्ठा

91. सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी, पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

92. भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन, ना करीते मी रोजच वंदन.

93. तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूलना आवडते गावठी गुलाबाचे फुल

94. हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना . हाच माझा खरा दगिना.

95. पनिपुरि खाताना लागतो जोरदार यसका … ला आवडते बिस्कित ब्रितानिया मस्का चस्का

96. हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना, हाच माझा खरा दगिना.

97. श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार, सह केले मी हरिद्वार किंवा आहेत दिलदार.

98. पुण्यात औन्ध मधे बन्गला उभा आहे ऐटित जलु नका लोकहो…. राव आहे आय् टीत

99. झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी आयुष्यभर सोबत राहो….ची जोडी

100. अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड़

101. सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड…. चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड

102. भारतीय नारी पतिला देते उच्च स्थान चे ठेवीन सदोदित मान.

103. कपाळावर लावले कूंकू लाल लाल… च्या जीवावर आहे मालीमाल

104 पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक आहेत आमचे फार नाजुक,

105. थोरातांच्या दुधावर येते जाड साय ना जन्म देणरी धन्य ती माय

106. फुलासंगे मातीस सुवास लागे . नि माझे जन्मोजन्मिचे धागे.

107. जाईच्या वेलीला आलाय बहार, ना घातला २७ फेब्रुवारीला हार

108. मुर्तीकाराने घडवली सुंदर मुर्ती, विलासरावांची वाढो सर्वदूर किर्ती

109. ग. दी. माडगुळकरांचे रामायण सुधीर फडक्यांनी गायिले सुरेशरावां करिता मी पुणे पाहीले

110 मानवाने करु नये कुणाचा हेवा, प्रकाशराव म्हणतात करावी सर्वांची निस्वार्थाने सेवा

111. चंदनासारखे झिजून करावी सर्वांची सेवा, म्हणतात करु नको कधी दुसर्याचा हेवा

112. घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल, प्रवेश करते गृहलक्ष्मी, वाजवून…च्या घराची बेल

113. रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास, ना भरवते मी श्रीखण्ड पुरीचा घास

114. सुहासिनीने करावे नेहमी सोळा श्रृंगार, आहे माझे प्रेमळ भरतार

115. मंथरेमूळे घडले रामायण….. चे नाव घेते आज आहे सत्यनारायण

116. जीवन आहे एक अनमोल ठेवा आणतात नेहमी सुकामेवा.

117. अजिंठा-वेरुळची जगप्रसिद्ध आहे कोरीव लेणी…. नी आणलीये सुगंधी वेणी,

118. गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास ..चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास

119. सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे

120. माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले, म्हणून. रावांची मी सौभाग्यवती झाले

121. ओssम या शब्दात आहे दिव्य शक्ती, रावांवर करते मी अमर प्रीती

122. गृहप्रवेश करताना साठविले मायेचे मोती भरभर….. च्या हातात हात देऊन झाले मी निर्भर

123. दैनंदिन जीवनात सुद्धा भगवतगीतेला आहे महत्त्व रामरावांसह मी करीन काहीतरी दिव्यत्व

124. विवाह म्हणजे सुरुवात एका नव-जीवनाची…. चे नाव घेउन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची

125. उखाणा घेउन भगिनिंच्या सुप्तगुणांना मिळतो वाव, आज आहे मंगळागौरी…..चे घेते मी नाव.

126. सौभाग्याचे काळे मणी घातले गळा, नी लावला गुलाबांचा मळा, किंवा च्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा

127. जाऊनिया काश्मिरला साजरे केले हनिमुन… चे नाव घेते …..ची सुन…

128. देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे, चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे

129. दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठीचे नाव घेते / घेतो तुमच्या आग्रहासाठी

130 फुलले गुलाब गाली, स्पर्शात (डोळ्यात) धुंद झाली प्रीती….ची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती

131. अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला….चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला

132. शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले, च्या प्राप्तीने मम भाग्य उदयाला आले

133. मनोकामना झाल्या सफल, आकांक्षांची होईल पूर्ती, रावांना मिळो तुमच्या आशीर्वादाने कीर्ती

134. अधिकमासात आईने दिली चांदिची परात, सखींनो २७ फेब्रुवारीलाची आली होती हत्तीवरून वरात.

135. संकेताच्या मीलनाकरीता नयन माझे आतुरले, ची मी आज सौभाग्यवती झाले

136. वर्षाकाठचे महिने बारा… या नावात सामवलाय आनंद सारा..

लग्नातील उखाणे
लग्नातील उखाणे


137. एक तीळ सातजण खाई….ना जन्म देणारी धन्य ती आई.

138. संतांच्या वाणीत आहे ‘सोनियांच्या (ज्ञानाच्या खाणी आहेत माझे कुंकूवाचे धनी

139. लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

140. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे, सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.

141 गोरया गोरया हातावर रेखाटली मी सुबक मेंदी, …चे नाव घेण्याची वारंवार येवो संधी

142. मंगळसुत्राच्या दोन वाट्या, एक माहेरची एक सासरची खूण… ची अर्धागिनी जाहले, भाग्य कुठले याहुन.

143. चान्दीच्या तबकात तुपाच्या फूलवाती … रावाच नाव घेते …च्या राती

144. अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण करतो सारथ्य, सोबत… करतो तुम्हा सगळ्यांचे आतिथ्य.

145. मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न- ११, घराला लावलि घंटी, वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी

146. मात्यापित्यांच्या छायेत फुलासारखी वाढले, आजच्या दिनी….. च्या चरणावर जीवनपुष्प वाहिले..

147. संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले, प्रत्यक्षात चे आज मी जीवनसाथी झाले.

148. अंतरिचे गीत उमटले, शतजन्मीचे नाते जुळले ..सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले).

149. नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणीतुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवित, ……..च्या अंगणी

150. पाच बोटातून होते कलेची निर्मीती ची व माझी जडली प्रिती

151. चिमुकल्या ओट्याची झाली विशाल नदी च्या बरोबर केली सप्तपदी

152. दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या रेशिमगाठी……चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.

153. साथीने रंगते गाणे, गाण्याने रंगते मैफल, सखींनो…च्या संगतीन संसार करीन सफल

154. संसाराच्या सारीपटावर पडले सौभाग्याचे पान…चा राहो चोहीकडे मान

155. नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृतीची झाले आज मी सौभाग्यवती.

156. प्रथमभेट ती नजरांची दोन ध्रुवांच्या मिलनाची मुळे त्रुप्त (धुंद) जाहले, अंतरी फुले फुलली प्रीतीची

157 सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न…च्या सोबत झाले आताच माझे लग्न

158 गावठी गुलाबाला सुगंधी सुवास….ना भरवते मी श्रिखंड-पुरीचा घास

159. कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे, सह घेतले मी सप्तपदीचे फेरे

160. आदर्श पती-पत्नी म्हनुन सांगतात नल दमयंती. नी घास घ्यावा ही माझी पहिलीच विनंती

161. सांगीतलेल्या कामात मी सदैव राहीन दक्ष ना भरवीते गोड घास, तुम्ही भरा साक्ष

162. आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी…ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी

163. प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा…नी लाडु खावा एक सोबत सगळा

164 मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रुपाचा… ना घास घालते श्रीखंडपुरीचा

165. फुल आहे गंध भाव आहे अंतरी सह चालले सातपावलांवरी

166. संतांच्या अभंगात आहे अमूतवाणी, म्हणते मधूर गाणी

167. भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ… रावांशिवाय माझे जीवन व्यर्थ

168. संतांचे वाङमय म्हणजे ‘सारस्वताचा सागर… आहेत प्रेमाचा आगर

169. श्रीकृष्णाने लिहिली भगवतगीता.. माझे राम तर मी त्यांची सीता

170. श्रीकृष्णाने भगवतगीतेतून जगाला केला उपदेश .. नी माझ्या जीवनात केला २७ मे ला प्रवेश

लग्नातील उखाणे
लग्नातील मराठी उखाणे

1 thought on “लग्नातील उखाणे”

Leave a Comment