वधूपक्षाच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करताना वरपित्याची होतेय दमछाक शेतकरी मुले लग्नासाठी काठावर पास

वधूपक्षाच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करताना वरपित्याची होतेय दमछाक शेतकरी मुले लग्नासाठी काठावर पास

गेवराई घळाटा तालुक्याला बारा वाटा मागासलेला तालुका म्हणून ओळख आहे. तालुक्यातुन नाथ धरणाचे पाणी काही भागातुन वाहात आहे तर काही ठिकाणी अल्पशा प्रमाणात सिंचनाची व्यवस्था आहे. औद्योगिक क्षेत्र नाही, पर्यटन स्थळे नाहीत शेकडो गावे असलेला आणि लाखो लोकसंख्या असलेला हा तालुका. येथे शेती हा प्रमुख व्यवसाय असून आता अलीकडच्या काळात आधुनिकतेकडे वाटचाल सुरू करण्यासाठी तालुक्यातील जनतेचे प्रयत्न सुरू आहे.

सध्या वडिलोपार्जित शेती व शेतीला पूरक असे जोडधंदे करून उदरनिर्वाह करण्याचे प्रमाण आता वाढत आहे. असे असले तरी सध्या प्रत्येक गावात ३० ते ३५ वर्षाचे तरुण लग्नाविना आहेत. याला कारण म्हणजे वधूची वाढती अपेक्षा पूर्ण न झाल्याने लग्नात अडसर निर्माण होत आहे. Marathi Matrimonial

शेतकरी मुलगा नको ग बाई’ अशी गाठच जणू काही मुलींनी बांधली आहे. चांगली नोकरी असावी, स्वतः ची शेती, गावात घर असावे अशा अपेक्षा वधू व नातेवाईक यांच्याकडून मांडल्या जात आहे. मुलाच्या लग्नासाठी चार ते पाच वर्षांपासून मुलगी शोधूनही लग्न जमत नसल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्येक गावात विवाहाचे वय उलटून गेलेले तरुण दिसत आहेत.

मुले अल्पशिक्षित, मुली उच्चशिक्षित तालुक्यात शिक्षणाच्या उत्तम सोयी नाही, तालुक्यातील बऱ्याच मुली उच्चशिक्षित होऊन यशाची शिखरे गाठत आहे. काही अपवाद वगळता मुले मात्र अल्पशिक्षित असून गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध ठेवत आहे. व्यसनाधीनता, बेरोजगारी या कारणास्तव त्यांना लग्नासाठी वधू मिळत नसल्याचे चित्र येथे आहे.

लुटीचा धंदा

लोकांच्या याच अडचणीचा फायदा घेऊन बोगस विवाह संस्था निर्माण होत आहे. स्थळे व बोगस लग्न लावण्याचे अनेक प्रकार तालुक्यात उघड झाले आहे. तालुक्यातील काहींनी बोगस लग्न जुळवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. तरुणांची आर्थिक लूट करून दिशाभूल करणाऱ्या ठगांचा एक प्रकारे घेऊन त्याला सुरू झाला असून एकाच मुलीचे तीन तीन चार चार विवाह करणारे व पोलीस केस झालेले प्रकरण आतापर्यंत झालेले दिसून येत आहेत. Maratha Matrimony

4 thoughts on “वधूपक्षाच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करताना वरपित्याची होतेय दमछाक शेतकरी मुले लग्नासाठी काठावर पास”

Leave a Comment